सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन"
🌹पूर्वीच्या मध्यमवर्गीयांच्या घरातील गमती जमती🌹😊
आपण ऐकलेल्या आहेत आणि अनुभवल्या पण आहेत त्याचे एक एक प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे ते वाचून आपले बालपण आठवायचे.
प्रत्येकाची घरे तसेच लहान. तीन रूम, दोन रूमचीच होती. तेव्हा आता सारखा टापटीत पणा नव्हता पण शिस्त मात्र जरूर होती.घरात असे वेग वेगळे रूम पण नव्हते
ड्रॉईंग रूम, किचन, बेडरूम, मास्टररूम, गेस्ट रूम, असो...
1)दारावर टॉवेल, पंचा वाळत टाकलेल्या असायचा.
2 )गोदरेजच्या कपाटाला आणि त्याच्या आरशावर टिकल्या चिटकलेल्या.
3) प्रत्येकाच्या घरात दोन प्रकारचे कॅलेंडर असायचे
एक महालक्ष्मी आणि कालनिर्णय हे घरोघरीच होते.
4) रविवारी सकाळी आई, आजी लवकर उठून मुलींचे न्हाणे करायचे व कर्ता पुरुष बाजारहाट करायचा. घरातील महिला चारीठाव जेवण करीत. बाकी सारे दुपारी मस्त झोप काढायचे आणि रात्रीच्या जेवणात पण मनसोक्त आवडीचे पदार्थ.
5) दुधाच्या पातेल्यातील लागलेली साय खरवड चमच्याने काढून खायची कधी कधी त्यात चहा सुद्धा करायचा आपसात भांडण करून
6) थंडी जरा कुठे कमी झाली की घरात सगळ्यांना गार पाण्याने अंघोळ करायला सांगायचे सक्तीने.
7) पूर्वी रेशनिंगचा तांदूळ मिळायचा त्याच्या रविवारी इडली, डोसा, ढोकळा बनवायचे आणि मुले टीव्हीपुढचे कार्यक्रम बघत खायचे. त्यावेळेस खूप सुंदर सिरीयल असायच्या उदा. शक्तिमान, कच्चीधूप, अडोसपडोस, रामायण, महाभारत इत्यादी. आपल्याकडे टीव्ही नसेल तर शेजारच्यांकडे जाऊन बघायचा, अगदी घरच्यासारखं.
8) कोणाच्या घरी लग्न झाले की त्या रात्रीच आहेर म्हणून दिलेले पाकीट फोडून कोणी किती दिले ते डायरेक्ट लिहून ठेवायचे. तो एक कार्यक्रमच असायचा.
9) हाताशी आलेल्या मुलींना आजी, काकूला दिवाळीत फराळ करायला मदत करायला लावायचे. बरं ते करताना चुकीला माफी नाही. करंज्याच्या पारीमध्ये सारण कसे भरतात, चकली न तुटता कशी गोल करायची, लाडू कसे वळायचे, हे तिला सक्तीने शिकवायचे. पण आई, आजीचे,आमच्या (काकांचे) ठरलेले डायलॉग हाताला जरा कामाचे वळण नको का? बाईच्या जातीला स्वयंपाक आला पाहिजे नुसती शाळा शिकून काय उपयोग? उद्या सासरी गेल्यावर काय करशील सोबत आईला नेणार का?
मुलगा मोठा असेल तर आई मुलाला म्हणायची, मी आहे म्हणून सगळा फराळ घरी करते, उद्या तुझी बायको आली की काहीसुद्धा करणार नाही, सगळं विकतच आणेल! मला मुलगी असती तर? हाताखाली मदतीला तरी आली असती. तू पोरगा! काहीच कामाचा नाही नुसते मस्ती करायची खोड्या करायच्या आणि गावभर फिरायला सांगा याला.
10) एखाद्या दिवशी बाबांसाहेब संध्याकाळी सहकुटुंब ठरलेल्या हॉटेलमध्ये जाऊन आनंद घ्यायचा. मग आजी म्हणणार आल्यावर म्हणणार याच्यापेक्षा चांगल्या पोळ्या सुनबाई घरी करते. अशा बीन तेलाच्या पोळ्या खायच्या पण काय करणार तुम्हाला बाहेरचेच चांगले लागणार!
11) कपडे घेताना आधी प्राईस टॅग शोधून किंमत बघायची. वय वाढते असल्याने एक साईज मोठी घ्यायची आणि परत ते पाठच्या मुलांना घालता येतील अशीच पद्धत.
13) परत तेच वापरलेल्या कपड्याचे एक चांगले गाठोडे बांधून ठेवायचे आणि बोहरीण आली की तिच्यासमोर ते रिकामे करायचे ती आणि आई दारातच एक एक कपडा काढून ती बाई त्याचा पंचनामा करायची 'ओ' ताई ही साडी किती विरली आहे... फाटकी पण आहे बगा!
आई -अगं मग काय तुला नव्या साडी देऊ का?
मग ती हा शर्ट जुना वाटतो. खूप पॅन्ट पण थोडी फाटकी आहे.
अगं जूना कशाला फक्त मुलाला आता लहान होतो म्हणून तुला देते.
🤦♀️खरंतर आधी मोठ्याने आणि नंतर लहान भावंडाने तो वापरलेला असतो, पण काही कपडे अजिबात विटत नाही फाटत नाही फाटले तर त्याची पायपुसणी होते आणि आणि काही नवीन दिसतात म्हणून तिला दिले जातात.
तू घ्यायला नकार केला तर त्याची पाथोरली आणि गोधडी साठी वापर करील .
हे सगळे करून झाले की शेवटी ती बाई तिच्या पाटीतून लहान भांड काढते. इकडे आईने आधीच एक मोठासा डब्बा बघायला सुरुवात केलेली असते मग परत त्यावरून जुगलबंदी सुरू होत.
आई डब्बा देशील का ठेवू परत कपडे बांधून?
या वाक्यावर संपते. चहाच्या पातेल्याचा तह दोघांमध्ये होतो मग आई तिला चहापाणी विचारते. घरात काही खायचे असेल तर ते देऊन बोळवण करते. आईच्या डोळ्यापुढे अजूनही तो डब्बाच असतो पण जाऊ दे किती दिवस झाले त्या गाठोड्याची अडचण झाली होती त्यापेक्षा हे पातेले तरी मिळाले अशी स्वतःची समजूत घालून घेत असे.
14) मुलांना (भावांचे ) केस कापायला जातानाच्या सुचना अगदी बारीक कापून ये ह! आई सांगतेच आणि दाढी वाढली की आपलं सारखंच 'मवाली' या विशेषणाने उद्धार करत राहायचे.(काका )
15) हातातून काही फुटले की काळजात धस्स होते आणि आपण ऑटो पायलट मोड मध्ये जाऊन मार खायला सज्ज आणि पुढचे आठ दहा दिवस काय धांदरट आहे एक काम बरोबर करत नाही. लक्ष कुठे असते, हे मार खाल्ला तरी चालूच असायचे.
16) महिनाअखेर आला की वरचे खाणे (टोस्ट, खारी, बिस्किटे, ई.)सर्व बंद होत असे (नवीन वस्तू उदा. कपडे चप्पल किरकोळ देखील घेणे बंद.
17) संध्याकाळी देवाला पटकन दिवा लाव मग टीव्ही सुरू मग आईच्या सूचना मध्ये मध्ये ब्रेक झाला की कुकर लावणे,भाजी निवडणे दूध तापवणे, गॅस बंद करायला सांगणे, अशी कामे केली जायची.
18) एखादा नवीन पदार्थ केला की आधी देवापुढे ठेवायचा मग मागच्या वेळी शेजारच्या काकूंनी काहीतरी पदार्थ करून दिलेल्या वाटीतून त्यांना द्यायचा. कधी नास्ता अशी देवाणघेवाण शेजारी व्हायची. घराचे दरवाजे कधीच बंद नसत आणि 'येऊ का?' हे तर विचारायचे नाही कोणी.
19) फ्रीज जास्त वेळ उघड्या ठेवायचा नाही लाईट बिल जास्त येते म्हणे.
20)एशियाड चे तिकीट महाग असते म्हणून लाल परीने प्रवास करायचा. जाताना उसळ चपाती बांधून घ्यायची... चटणी लोणचे इत्यादी.
मध्यमवर्गीय घरात फक्त केळी विकत आणली जायची ती खाऊन संपली नाही तर त्याचे शिकरण करयांचे. बाकी सफरचंद वगैरे गोष्टी सहसा पाहुण्यांना भेटायला जाताना बसस्टँडच्या बाहेर विकत घ्यायचे त्यामुळे मध्यमवर्गीय घरात सफरचंद फक्त आपल्या घरात कोणी आजारी पडेल तर नाहीतर दुसरे कोणी आजारी असेल तर भेटायला आल्यावर दिलेले बस.
21) सर्वांचे जेवण एकत्र बसून पंगतीत असाचे रात्रीचे जेवण हे सकाळचे जेवण किती आणि काय शिल्लक आहे यावर. आतासारखे लगेच हॉटेल, किंवा पार्सल नाही नसायचे
22)सिनेमाची तर नावच नाही मात्र वर्षातून फक्त एकदा घेऊन जात (काका)तो पण मराठी सिनेमा लागला तरच बघायचा सर्व मिळून सतीचे वाण, संत ज्ञानेश्वर,असे. परत वर्षभर नाव नाही हा! मध्ये सर्कस आली तर ती दाखवायची आवर्जून .तसेच मुलांचे खेळ म्हणजे बिनाखर्चाचे गोट्या, चेंडू फळी, सायकलची चक्री, ई.तरी सर्व मुलं अगदी खुश असायची!
23) आणि सगळ्यात महत्त्वाचे मी म्हणून इतकी वर्ष संसार केला. कधी स्वतःची हौसमौज भागवली नाही... तसे पाहिले तर आपण दुर्लक्षच करतो या वाक्याकडे पण त्या शब्दामागे लग्न करून आलेली मुलगी ते एक जबाबदार गृहिणी. म्हातारं होईपर्यंतचा प्रवास दडलेला असतो. आपल्या जुन्या रूढी परंपरा आणि घरचे आईवडील, बहिणभावंडे यांची आठवण!😊
अनुभवातून हा लेख तयार झाला आहे 🙋♀️
सुलहर 🖋️
Comments
Post a Comment