रेडिओ
सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन"
13 फेब्रुवारी वर्ल्ड (विश्व)रेडिओ डे
या दिवशी रेडिओ बद्दल काही लिहावे असे मला वाटले म्हणून दोन शब्द लिहिले.
आत्ताच रेडिओ दिन साजरा झाला
आकाशवाणी केंद्र भारतीय प्रसारवाणी यांची स्थापना 13 जुलै 1927 साली झाली याचे नाव भारतीय प्रसारण सेवा होते ते नंतर 1957 ला (आकाशवाणी )केंद्राचे ऑल इंडिया रेडिओ नाव केले गेले आकाशवाणी केंद्रावरून
ये आकाशवाणी है! असा आवाज प्रसारित झाला याचा अर्थ आकाशापासून मिळालेला संदेश ह्याची पंचतंत्र कथे मध्ये माहिती आहे देश स्वतंत्र झाल्यावर ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी च बोलायला लागले. सूर्य उगवायचा तो आपली सकाळ, रेडिओवरील भूपाळी ,बातम्या, याच्याने च व्हायची आणि त्याचे गोड सुमधुर धुंद (म्युझिक) ऐकायचे ते अजून तसेच आहे १) जेव्हा आकाश वाणीला सुरुवात झाली तेव्हा ड्रायव्हर, विद्यार्थी, मजदूर, यांच्या करिता विविध कार्यक्रम होते.
आज जसे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तसेच एकेकाळी शहरापासून खेड्यापर्यंत प्रत्येक माणसाच्या घरात व हातात रेडिओ दिसायचा. एवढेच काय नवरदेवला लग्नात हौशीने रेडिओ देण्याची पद्धत सुद्धा होती.
आत्ताच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या नक्कीच जुन्या आठवणी जाग्या होतील ,सकाळी उठल्यावर सहा वाजताची धुंद लागते ती खूपच मनमोहक असते मग ऐकू येते की हे आकाशवाणी केंद्र आहे. सुधा नरवणे आपल्याला बातम्या देत आहे तर तेव्हापासून नंतर रात्रीचे दहा वाजता हवा महल पर्यंत रेडिओ चालू असे. फर्माईश गीतेचा कार्यक्रम पण छान व्हायचा भारतातील सामान्यातील सामान्य माणसाच्या तनामनाशी जोडलेला आहे कुणाच्या कानाशी, कुणाच्या शेतातल्या बांध्याशी झाडावर सायकलीवर, लोहारच्या भात्या जवळ ,गृहिणीच्या स्वयंपाक घरात, आर्थिक दृष्ट्या सर्वांना सहज परवडणारा पण तितकाच विश्वासनीय असा हा रेडिओ क्रिकेट मॅच, राष्ट्रीय बातम्या, मनोरंजनासह कृषी, आरोग्य
संपदा ,ऐतिहासिक ,सामाजिक, व सांस्कृतिक, आणि राष्ट्रीय भावना जोपासणारा धकाधकीच्या जीवनात आपला मनोरंजना सह ज्ञान देणारा हा श्राव्य साधन नभोवाणी, आकाशवाणी या नावाने ओळखला जातो. पूर्वी मनोरंजनाचे काही साधन नव्हते तेव्हा हा खूप लोकप्रिय होता. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आली तरी तसे त्याचे महत्त्व कमी झाले नाही. किंवा यापुढे होणार नाही .आता तर सारेगामा- भगवद्गीता डिजिटल रेडिओ निघाले आहे लोक हौशीने घेतात. त्यात हजारो गाणे आहे तो युट्युब वर पण लावू शकतो. प्रवासात नेण्याकरता खूप चांगली सोय आहे ,पहिले छोटे ट्रांजिस्टर मिळायचे मर्फी कंपनीचा खूप फेमस होता दुसरी सोनी कंपनी आली, विविध आकारात आणि विविध प्रकारात(मॉडेल) मिळू लागला . आमच्याकडे मर्फीचा रेडिओ होता.
त्याला एक छोटासा कोनाडा होता त्यात तो बरोबर बसायचा त्याच्या मापाचा मी त्याला कापडी कव्हर करून पुढे भरत काम केले होते हंसाचे खूप सुंदर ! रेडिओ ला
आमच्याकडे फक्त वडील काकाच चालू करणार बाकीच्यांना परवानगी नव्हती , आमच्या शेजारच्या काका, काकू पण बातम्या ऐकण्यासाठी खास यायचे आमच्याकडे आणि ते जरा उंचावर ठेवलेला होता घरात बरेच लहान मुलं असल्यामुळे खराब होईल म्हणून असेल कदाचित. त्यावेळेस बातम्या, सुगम संगीत आणि क्लासिकल संगीत लावायचे आणि दर बुधवारी अमीन सहानी चा आवाज( बिनाका गीतमाला)खूपच लोकप्रिय कार्यक्रम होत . कोणत्या आठवड्यात कोणते गाणे पहिले आले किंवा पुढच्या आठवड्यात येणार याची नोंद करून ठेवायची सर्वचां आवडता छंद होता कोणी तर गाणे लागले की ऐकून पाठ करायचे व मग वही त लिहून ठेवायचे . खूप कार्यक्रम असायचे त्याच्यावर नाटक व गोष्ट भरपूर कार्यक्रम असायचे.
आता टीव्ही आला, तरी रेडिओची
सर नाही. तो एका जागेवर असला तरी कुठूनही ऐकू येत होत. आता टीव्हीचे तसे नाही एका जागेवर त्याच्या समोरच बसा आणि रिमोट हातात घ्या. त्यावेळेस अकरा वाजले की व्हिडिओ चे म्युझिक वाचायचे म्हणजे मुलांची शाळेत जाण्याची वेळ झाली हे असे समजायचे संध्याकाळी पाच वाजता पण तसच सकाळी बातम्यांच्या वेळी सर्वजण आपल्या घड्याळात टाईम लावायचे . खूप मस्त होते ते दिवस आणि तो रेडिओ.
असो, तसे तर खूप काही लिहिण्यासारखे आहे.
आकाशवाणी ला सलाम🙏
सुलहर, 🖋️
Very good information about radio
ReplyDelete