"केळीचे शिक्ररण"

सहर्ष सादर करीत आहे-
विचार मंथन 
"शिक्ररण"

परवा रेडिओवर मामाच्या गावाला जाऊया... पळती झाडे पाहूया... मामाची बायको सुगरण... रोज रोज पोळी शिकरण!, हे गाणे ऐकलं आणि मनात विचार आला, या गाण्यात किती काही दडलेलं आहे, केळ्याविषयी. हे गाणं किती  प्रसिद्ध झालेल आहे. 

"केळीचे शिकरण "
आजकालच्या मुलांना कदाचित परिचित नाही. आपण जे पूर्वी एक पदार्थ म्हणून खाल्लेले गोड आणि चवीष्ट झटपट बनणार गोड पदार्थ त्याबद्दल थोडे काही. आणि आज तर अष्टमी आहे. दिवाळीची सुरुवात म्हणून खास.
शिकरण हा पदार्थ काय भारी आहे ना, जो आपण लहानपणी बघितलेलाही नसतो किंवा खाल्लेला नसतो पण अगदी लहानपणापासून तर समजायला    लागेतोपर्यंत तो आपल्या अवतीभोवती फिरतो. हे गाणं ऐकून ते किती स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे, हे जवळून कधी कळत नाही .

हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनवले जात होते, आता हे सहसा बनत नसावेत, असे वाटते.
हे अगदी लवकर बनणारे हेल्दी चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारे व आवडीने खाल्ले जात होते. केळीचे  शिकरण आमच्याकडे "करअष्टमीच्या" दिवशी खास बनवत होते. आठ तांबे ठेवून त्याला कच्च सूत बांधायचं व पूर्ण स्वयंपाक करायचा आणि चंद्रोदयाला झाला की नैवेद्य दाखवायचा तर रात्रीच्या जेवणात हे  स्वीट डिश,असायची

याला जेवणाचं साम्रसंगीत लागत नाही. साधं एक कोरडी भाजी, चटणी असली तरी चालते. आणि अचानक पाहुणे आले स्वीट डिश कोणती करावी तेव्हा हे झटपट होते .
नवीन शिकणाऱ्यांना येत नसेल त्यांनी हे शिकरण जरूर शिकून ताटाची शोभा वाढवावी.

दररोज एक दोन केळी खाणे आरोग्यासाठी चांगले असते त्यातून आवश्यक ते पोषक घटक मिळतात. ते प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नये. केळीने चरबी वाढत नाही, हे एक बहुमुखी फळ आहे. हे वजन कमी करण्याकरिता व वजन आटोक्यात आणण्याकरिता मदत होते,

यामध्ये कार्बन डाय-ऑक्साइड कार्बोहायड्रेट खूप प्रमाणात असतात खूप जण व्यायाम करण्याआधी खातात. कोणी मेडिकल करायला जायचे तेव्हा वजन वाढवण्यासाठी अधिक केळ खात असंत. 
मजा म्हणजे "मुंबईची केळेवाली" हे गाणं इतके प्रसिद्ध झले होते.

 मुलांना कधी भूक लागली की दुधात साखर घातली आणि एक केळ कुस्करले की झाले शिकरण तयार.
केळी बाजारात बारा महिने मिळतात, ही सहसा सगळ्यांच्या घरात असतात .
गरिबाचे स्वस्त असे मेवा फळ आहे बाकी फळे  त्याना परवडणारे नसत. कामगारलोक सुद्धा दोन केळी खाऊन दुपारचे जेवणाची भूक भागवत असे .
भुसावळ गाव तर केळीसाठी जगप्रसिद्ध आहे. पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा एक रुपया डझन मिळायचे आणि आमच्याकडे मोठी फॅमिली होती. तर काका, वडील केळीचे घडच आणायचे. आई ते पिकवायला पोत्यात घालून हवा बंद असे ठेवायची मग ते पिकले की रोज जसे पिकले तसे काढायचे .

 जळगाव जिल्ह्यात केळीच्या बागा भरपूर प्रमाणात आहेत. हे झाड प्रत्येकाच्या परिचयाचे आहे .हे 
उष्ण व दमट भागात  वाढते.  वरून पिवळ्या रंगाचे आणि साल काढल्यावर पांढरे लांबट असते. याचा आतला गाभा खूप मऊ असतो. लहान मुलं व म्हातारी माणसं सहज खाऊ शकतात. असे  गोड स्वादिष्ट फळ यात बी, ए, आणि सी मॅग्नेशियम पोटॅशियम आणि लोह यासारखे घटक असतात. कच्ची केळ हिरवीगार असतात याची वाफवून कोरडी भाजी करतात. बटाट्यासारखी आणि कच्चे केळ्यांचे वेफर्स करतात, याच्यामुळे हाडं बळकट होण्यास मदत होते. 
भारत हा केळीचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे महाराष्ट्र, तामिळनाडू ,गुजरात, आणि वेस्टन आफ्रिका मध्ये पण  ही उत्पादन होते. त्याचे लोहाचे प्रमाण जास्त असते. हे अशक्तपणा घालवते. आजारी लोकांसाठी पण चांगले असते.
हे भारतीय स्वयंपाकामध्ये अनेक पद्धतीने वापरले जाते- जसे ज्यूस, पुऱ्या, चिप्स, पंचामृत, केक, कुकीज आणि ब्रेड बनवण्यासाठी पण वापरतात. केळाला भारतात धार्मिक सांस्कृतीत देखील महत्त्वाचे स्थान आहे ते म्हणजे सत्यनारायणाच्या प्रसादात आवर्जून घातले जाते त्यामुळे प्रसाद चविष्ट बनतो.    " केळीचे शिकरण" बनवण्याची पद्धत ठराविक सोप्पी. आकाराचे  स्टीलचे भांडे घ्यावे ते पितळी भांड्यात नको ते कळकट होतं. दूध एक लिटर, दोन लिटर. घरात किती माणसे त्याप्रमाणे घ्यावे छान उकळून घ्यावे आटवायचे  नाही. त्यात साखर घालून विरघळावी दूध थंड होऊ द्यावे. एका ताटात केळी सोलून ठेवावी व गोल, गोल बारीक चकत्या कराव्या दूधत घालून चमच्याने छान एकजीव करावे. नंतर त्यात विलायची पूड टाकावी मग खोल ताटली घेऊन पोळी बरोबर खावे. दोन-तीन पोळ्या सहज खाल्ल्या जातात. इतके सोपी साधी रेसिपी. 

कोणी केळ व तूप  घेऊन पोळीबरोबर खातात. उपवासाला तर पहिले केळी  लागतातच. आनंदी प्रसंगी वास्तुशांती घरगुती कार्यक्रम असो पहिला मान केळीचे खांब केळीचे घडाचा व जेवायला पानांचा सहज उपलब्ध व परवडणारे केळीच्या पानात जेवण म्हणजे अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट लागते.
भुसावळला तर मुबलक केळीचे पान मिळायचे  श्रावण महिन्यात पूर्ण श्रावणमहिना भर केळीच्या पानावर च जेवण करायचं खूप छान वाटायचे, हिरव्यागार पानात.
जसे आता पत्रावळी म्हणून आपण प्लास्टिकची, कागदाची पत्रावळी वापरतो तसे आम्ही केळीचे पान वापरायचो. त्यात गरम गरम अन्न पदार्थ वाढतात तेव्हा ते पान काळ होतं. म्हणून पदार्थ खूप रुचकर आणि स्वादिष्ट लागत.
  
याची आयात रेल्वे मार्गाने खूप जागतिक पातळीवर उलाढाल होते. जगातील सर्वात महत्त्वाचा अनेक फळांपैकी एक आहे. हे हिरवे, लाल तर सोनेरी पिवळेही असते. यात जंगली केळीची पण जात आहे.
केळी हा शब्द बोट या अरब शब्दांमधून आला आहे  याची फुलांची पण भाजी आमच्याकडे आई करायची. याला केळफुल म्हणतात. केळीच्या आकाराची छोटी छोटी केळीच्या फणीच्या आकाराची पांढरी फुले असतात. हे लाल रंगाचं बंद मक्याच्या कणसाप्रमाणे असते. केळकमळ म्हणतात. याची भाजी खूप छान लागते. हे फुल वरून जमिनीच्या दिशेला निमुळत्या आकारात वाढते. त्याचा एक भरगच्च गुच्छ तयार होतो. ऊबदार वातावरण  मिळाल्यावर त्या फुलांचे केळीच्या घडात रूपांतर होते. एका घडात साधारण १० फण्या असतात. आणि एका फणीमध्ये पंधरा ते वीस केळी असतात. हे झाड वाटत असेल तरी ते वनस्पती या गटात मोडते. याचे रोप त्या त्या  प्रदेशातील हवामानानुसार पाच ते पंधरा फूट लांब विस्तारते. या झाडाचे पूर्ण वापर होतो जसे खोड पान, साल, फुल सर्व उपयोगात येते. केळीचे बागायतदार सर्वात श्रीमंत माणूस असतो. उपयुक्त असे हे फळ आहे .

                       सुलहर 🖋️

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"