कान 👂,👃,

 सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन"

            "कान"नाक "
             *👂 *👃*
आपल्याकडे काही म्हणी प्रचलित आहे कान, नाक,हात,पायअसे त्याच्यातला एक कान या विषयावर थोडं काही.

कान म्हटले की हे काही ऐकण्यासाठी काही ऐकवण्या साठी याचा आपण उपयोग करतो. पण खर म्हणजे 
मनुष्याच्या जन्मापासून तर 
मृत्युपर्यंत त्याच्यावर एकूण सोळा धार्मिक संस्कार केले जातात. त्यामधील हा पहिला संस्कार म्हणजे कान टोचणे. मुलगा असो का मुलगी काही अपवाद वगळता अजूनही कान टोचतात.ते टोचण्या साठी सोनाराचीच गरज (पडते)असते .कारण 
 म्हणजे ते सोनाराकडूनच टोचून घ्यावे लागतात .म्हणून एक म्हण प्रचलित आहे. (कोणी आपले म्हणणे ऐकलं नाही )तर आपण त्याला म्हणतो सोनारानेच कान टोचलेले बरे.
बाळ जन्मल्यानंतर बाराव्या दिवशी कान टोचावे अशी पद्धत आहे. बहुतेक घरांमधून तो अजूनही पाळला जातो. हिंदू धर्मातील हा एक संस्कार आहे . बाळ खूप लहान कमी वजनाचा असेल तर बाराव्या दिवशी टोचत नाही, तर मग साधारण पहिल्या सव्वा महिन्यात कान टोचले जातात. पाटील समाजामध्ये म्हणजे हे कान टोचण्याचा  मोठा कार्यक्रम असतो.  नातेवाईक सर्वे भाऊबंद बोलतात, घरात एक मंगल कार्य म्हणून मोठा विधीच असतो. आणि कान टोचण्याचा  होतो. मग तो पाच वर्षापासून ते लग्ना पर्यंत त्याचे लग्नात पर्यंत कान टोचले गेले नसतील तर लग्नाचे  आदल्या दिवशी कान तोचतत. जसा मुंज असते. आणि वरण बट्टीचे जेवण देतात . अगदी लहान असतानाच कान का टोचायचे?तर त्या वेळी कानाच्या पाळ्या ह्या खुपच पातळ असतात. म्हणजे बाळाला कान टोचताना त्रास होत नाही, आणि सोनारालाही. अजूनही काही घरांमध्ये पंचांगात मुहूर्त पाहून कान टोचण्यासाठी सोनाराला बोलावले जाते. सोनार पहिले 
सोन्याची अतिशय बारीक तार घेऊन त्याचे (सुंकले )बनवतो त्याला बाळ्या म्हणतात. साधारण कमीत कमी अर्धा ग्रामची जोडी असे याचे वजन,ह्या शुद्ध सोणन्यातच  करतात . म्हणजे जखम होत नाही
लवकर सावळतात
 २२कैरेट सोने वापरले तर  त्याला कडकपणा येतो. 
या कान टोचण्याच्या विधीमध्ये खोबऱ्याच्या वाटी ची खूप महत्वपूर्ण भुमिका असते. सुंकल्याला टोक व्यवस्थित झाले हे तेव्हाच कळते  ते खो.वाटीत व्यवस्थित टोचले गेले म्हणजे याचा अर्थ त्याचे टोक एकदम बरोबर झाले आहे. कारण जर टोकच व्यवस्थित नसेल तर कान नीट टोचले जाणारच नाही. 

दुसरे कारण म्हणजे..सुंकल्याला जे खोबऱ्याचे तेल लागते ते कान टोचताना तेलाचे  काम करते. कोणत्याही इतर तेलापेक्षा हे तेल अधिक शुद्ध असते.
कान टोचण्याची एक पद्धत
डावी तर्जनी कानाच्या पाळी खाली हातात धरून एकाच दाबात कान टोचणे आणि कान टोचताना थेंबभरहि रक्त न येणे हे कौशल्याचे काम असते. क्षणभर बाळ रडते आणि मग शांत होते. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे त्या बाळी ची व्यवस्थित गाठ मारणे. ही गाठ मारताना बाळाने जर जास्त हालचाल केली तर तेथून थोडे रक्त येऊ शकते, ही गाठ नीट बांधली गेली नाही तर बाळाच्या टोपीत, कपड्यांमध्ये अटकण्याची खूप संभावना असते .

कान टोचून झाल्यावर बाळाच्या आईने खोबरे आणि मीठ एकत्र चावून, बाळाच्या कानाच्या पाळीला लावायचे असते. याचे दोन उद्देश. एक म्हणजे त्यामुळे कानाची पाळी जरा नरम रहाते, आणि मीठ हे जंतुनाशक असल्याने तेथे जंतुसंसर्ग होण्याची भीती नसते. काहीजण तेलात हळद टाकून किंवा कुंकू लावतत. पुर्वी ही प्रथा होती, हळदीपासुन बनवलेले कुंकू कदाचित चांगला परिणाम देऊन जात असते. पण अलीकडे बाजारात उपलब्ध असलेल्या कुंकवात काही भेसळ असते तर ते  न लावलेले बर.

कान टोचण्यासाठी जेव्हा सोनाराला घरी बोलवले जाते,तेव्हा त्याला मोठी आदपूर्वक  बोलवतात. कान टोचण्यासाठी  घरात मंगल कार्य असल्यासारखी गर्दी गोडा जेवण बाळाला नवीन कपडे घालतात  हॉलमध्ये मध्यभागी समोरा पाट टाकले जाते. एका पाटावर सोनार व समोरच्या पाटावर एक वयस्कर बाई, बाळाला घेऊन बसते. कान टोचताना बाळाची आई शक्यतो तेथे रहात नाही. कारण तिला बाळाचे रडणे बघवत नाही. त्यामुळे बाळाची आजी, किंवा आत्या बाळाला घेऊन बसते. कान टोचण्या साठी सोबत बसल्यावर आजुबाजुला घरातील लहान मोठे कुतुहलाने गर्दी करतात. मग त्याचे खूप प्रश्न.
"अहो, खूप दुखेल का?"
"रक्त तर नाही ना येणार?"
"किती दिवसात बरे होईल?"
प्रश्नांची सरबत्ती सुरू होते मग बाळ  घाबरून रडून रडून दमतो. आजू बाजुला हवा येण्यास जागा नाही. शेवटी सर्वांना जरा बाजूला व्हायला सांगितले जाते, आणि मग व्यवस्थित कान टोचले जातात. मग कुठे आईला आहेस वाटते तोपर्यंत आईचा जीव घाबरा होत असतो.

पूर्वी कान टोचण्यासाठी ठराविक रक्कम  द्यावी असा आग्रह नसायचा  एक सन्मान समजून खोबऱ्याची वाटी अकरा रुपये असे द्यायचे ,पण आता एकशे एक रुपये दोनशे रुपये असे घेतात . मग कधी खुपच आदरातिथ्य असेल तर मोठी दक्षिणा मिळते.
मग मोठे झाल्यावर नाक पण टोचण्या बरोबर  प्रसंग येतो. कारण नाकात नथ घालय ची असते मुलींना, त्यावेळी मुलगी मोठी झालेली असते. आता अलीकडे तर कानात बुगडी घालण्याची फैशनही परत मुळ धरु लागली आहे. कानाच्या वरच्या भागात किती तरी ठिकाणी  टोचतात, मुली व महिला उत्सुक असतात. या भागात टोचण्यासाठी सुंकले जरा जाड करावे लागते. कारण कानाचा तेथील भाग खुपच कडक आणि जाड झालेला असतो.काही जणींना त्यामुळे खुपच वेदना होतात. काही काळ त्या सहन करायची तयारी ठेवावी लागते .आजकाल  फॅशन म्हणून कॉलेजचे मुलं  पण कान टोचून  कानात  बाळ्या व भीग बाळ्या घालतात.
एक प्रसंग आठवला म्हणून सांगते माझ्याकडे मी  शाडू मूर्तीच्या गणपतीच्या मुर्त्या आणल्या होत्या तर त्याच्या कानात भिगबाळी नव्हती मला असे वाटले की आपण भिगबाळी करून घालावी पण हे करणार कोण ? मी मूर्ती कारायला फोन केला तर तो म्हटला एकदा मूर्ती तयार झाल्यानंतर आम्ही काहीच करू शकत नाही मग मला आठवले माझ्या भाचीच्या मुलीचे कान स्वाती वानखेडे (ज्वेलर्स) हिने टोचले होते  तिला बोलऊ आणि तिच्याकडून गणपतीचे कान टोचून घेऊ भिग बाळी तर घालायची च होती गणपतीच्या कानात मग तिला मी फोन केला ती म्हणाली मी याच्यापूर्वी तर असे काम केले नाही तुमची मूर्ती खराब होईल मी म्हटले नाही ते काम तू करशीलच मग  ठीक आहे म्हणाली तिला बोलवले आणि तिने चक्क तब्बल पाच गणपतींचे कान टोचले. गणपतीचं रूप इतकं लोभस आणि सुंदर दिसायला लागले ,आणि गणपती बाप्पाही सुखावले😊 
की माझे कान सुद्धा सोनारांकडून टोचून घेतले म्हणून, खूप वेगळाच अनुभव होता तसा  स्वाती खूप छान कान आणि नाक टोचते तिचे टोचलेले कधीही खराब होत नाही .

अलीकडे  ऐतिहासिक सिरीयल टीव्हीवर बघायला मिळते तशीही जुनीच फॅशन आहे.
 तसेच पौरोहित्य करणारी मंडळी पणकान  घालतात.
खेडेगावात अजून ही काही ठिकाणी बारीक सुई दोऱ्याने क टोचले जातात. आजकाल बंदुकीने पण कान, नाक ,टोचले जातात.
(काळा दोरा घालून )

अखेरीस काय तर कान टोचणे हा एक संस्कार आहे. पण आता तो फॅशन म्हणून पण टोचतात.

                         सुलहर 🖋️

Comments

  1. खूप छान वर्णन केलेय संपूर्ण चित्र डाेळ्या समाेर येते. अभिनंदन व
    हार्दिक शुभेच्छा 💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"