तुप

सहर्ष सादर करत आहे
 "विचार मंथन " 
   🌷साजूक तूपाचे महत्व🌷
               
साजूक  तूप माझे खुप आवडतं खाद्य आहे ,प्रत्येक पदार्थावर घेतले की खूप खाण्या ची चव औरच येते व आनंद मिळतो. जसे थालपीठ, दशमी, ई.लोणी पण खूप च छान चवीष्ट लागत. तूपा साठी खास आकाराचे चांदीचे भांड वापरतात .

लोणी पासून तूप पूर्ण पणे वापर होतो. लोण्याचे तूप तुपाची बेरी, बेरी चा शिरा, किंवा मिठाई.हे सात्विक  बुद्धीवर्धक असते.
लोणी कढत असले की सुंदर एक सुगंध येतो खूप छान वाटते लगेच समजते. रवाळ असे पांढरे शुभ्र तूप .देशी गाईचे तूप पिवळसर असते .
गरम,गरम पहिल्या वाफेचा मऊ वरण भातावर तुपाची धार तर स्वर्गानंद.

जेवण कोणते ही असो, पंगतीला  तूप वाढले की मगच जेवायला सुरुवात करायची अशी आपली परंपरा आहे. पंगती त चांदीच्या भांड् हातात घेऊन वाढणे म्हणजे औरच शान असते.पूर्वी एक 
ओतीव पितळी भांड वेगळ्या आकाराचे संपुट म्हणायचे त्याला त्याच्याने तूप वाढायचे खूप मोठी धार पडायची त्याची. आता तर आपण चमच्याने घेतो एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे.

आयुर्वेदात औषध म्हणून जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. गाईचे तूप तर जेवढे जुने तेवढे गुणकारी. याचा वापर डोळ्यात अंजन म्हणून  पण घालतात.नकात सुद्धा दोन थेंब टाकतात खूप हितकारक असते.

 घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे. 

तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते.मेंदूवर तुपाचे चांगले कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते.
अग्निवर्धक म्हणून तुप हे श्रेष्ठ कार्य करते .

 तुपामुळे "स्वरयंत्र " सुधारन्यास आणि आवाज उत्तम होतो तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे. 

तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज,विकारात वापरतात. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी चाटण बनवले जातात. 

डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत  तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.  किंवा दुख-या कपाळावर हलकेच मालीश करावे. तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी पण थांबते.

शंभर वेळा धुतलेले तूप (शतधौत घृत) त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात हे औषध म्हणून अत्यंत गुणकारी आहे.

रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळे मूळव्याध बरा होतो. 

तूप खाल्ल्याबरोबर रूप लगेच येत नसले, तरी तूप खाल्ल्यावर लगेच चरबी (कोलेस्ट्रॉल) वाढते हे चूक आहे.जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे. 

कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे.

आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे "खाईल तर तुपाशी नाहीतर राहील उपाशी"😀🙋

                     सुलहर 🖋️

Comments

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"