तेल

सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन"
      
     🌷तेलाचे प्रकार व त्याचे महत्त्व 🌷
 
तेल हा शब्द आपल्या भौतिक जीवनात खूप वापरला जातो, तुपापेक्षा तेल बरे अस बहुतेक जण म्हणतात आजकाल तर सर्व तळण पदार्थ तेलात च तळतात कारण तेल फिल्टर असतं तुपातले पदार्थ तळल्यानंतर गार झाले की त्याच्यावर तूप साठत ते जास्त तेलकट  वाटतं खायला म्हणून तेल बरे
आपण ज्या हवामान व प्रदेशात राहतो तेथे जे पिकवले जाते ते आपल्या शरीराला पोषक असते.
उदा. उत्तरप्रदेश मधे -सारसो चे तेल
            केरळ - खोबरेल तेल
           कर्नाटक - सूर्यफूल तेल
           महाराष्ट्र  - शेंगदाणा तेल

1) सरसो तेल:-
हे यूपीमध्ये रोजच्या खाण्यास लोणच्यात सर्रास वापरतात, आपल्याकडे याचा सहसा वापर होत नाही त्याचा एक वेगळा सुगंध येतो व घट्ट 
असते हे तेल व अतिशय उष्ण असते. ठराविक भाज्यांना  याची फोडणी देतात . लहान बाळांची मालीश करता पण वापरतात.
यामध्ये ओमेगा 3 असते , कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, यांना प्रतिबंध होतो.
पचनशक्ती सुधारते, शौचाला साफ होते, प्रतिकार शक्ती वाढवते, 
या तेलाने मसाज केल्यास अंगदुःखी थांबते.

 2) खोबरेल तेल:-
हे तेल तर जग प्रसिद्धच आहे यामध्ये आता नव नवीन कंपन्या निघालेल्या आहेत पण सर्वात चांगले हे तेल साउथ इंडियन लोक जास्त वापरतात अगदी स्वयंपाका पासून तळणा पर्यंत म्हणजे त्या तेलात केळा वेफर, फणसाचे काप, छान असतात खोबरेल तेलाचा सुगंध येतो त्याला, याचे वैशिष्ट्य म्हणजे हे तेल दोन-तीन वेळेस तळले तरी त्यातील विटॅमिन टिकून राहते  या तेलात ला नाष्टा शिरा, पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ खूपच चविष्ट लगतात खोबरेल तेलाचे अनेक उपयोग आहेत.
 बाळाच्या टाळूवर  हे नियमित टाकले तर टाळू भरण्यास मदत होते.थंडीत चागला वापर होतो
हे अँटीसेप्टीक म्हणून खूप रामबाण उपाय आहे शरीराला जखम झालेली असेल भाजलेले असेल तर ह्या जखमा लवकर भरतात खूप थंड असते.पण नियमित रोज लावल्याने हे नक्की लवकर बरे होते . केस गळत असतील तर यामध्ये अनेक प्रकारची सामुग्री टाकून याचा वापर करतात .उदा. आवळा, मेथी, जास्वंद फुल वडाच्या झाडाच्या मुळ्या,कपूर  अमृतधारा असे वेगवेगळे पदार्थ टाकून तेल बनवतात .वडाच्या झाडाच्या मुळा ईतर अनेक
पोटाचा घेर कमी करून शरीर स्लिम करते. चरबी पण कमी करते.हे सर्व प्रमाणात टाकावे.
 याचाने केस काळे व दाट होऊन केसांच्या समस्या पण दूर होतात.
सूर्याच्या कोवळ्या उन्हात वरील मिश्रण केसांना लावल्यास कोंडा जातो.शरीराला थंडावा ठेवते.

 3)शेंगदाणा तेल:- 
हे चवीला गोड असतो म्हणून त्याला गोडेतेल पण म्हणतात हे एकदा दोनदा तळले की त्याच्यात जीवनसत्व निघून जातात व तेल काळा पडत, हे सहसा वापरत नाही दुसऱ्यांदा 
हे पदार्थांची रुची वाढवते,आमच्या कडे जेवणा त पदार्थांमध्ये वरतून तेल घेण्याची पद्धत होती. आवडी ने खात .चटणी, पिठले, मसाले भाजी 
 यांना वरतून तेल वापरलेजात. आता ते कमी झाले  तेलातून जीवनसत्व मिळतात. व पचन सुधारते, तळण , वरून फोडणीसाठी चालते,
गुड कोलेस्ट्रोल वाढवते.
बॅड कोलेस्ट्रोल कमी करते.
स्किन सॉफ्ट होते.
जीवनसत्त्वे - A, E, C, D

 4)करडई तेल:-
जुने लोकं स्वयंपाक घरात तळण्यासाठी जास्त वापर करायचे भाजीला फोडणी साठी
पदार्थ तळण्या करीता वापरतात
रक्तातील साखर नियंत्रणात राहते. उच्च रक्तदाब व हृदय रोग यावर नियंत्रण येते.
चरबी कमी करण्यास उपयुक्त.

 5 )सूर्यफूल तेल :-
हे पण तसेच वापरता आजकाल सूर्यफूलाची शेती खूप करतात .त्याच्या बिया भाजून पण खातात स्वयंपाक करण्यासाठी वापरतात. वेगळा वास येतो. हाडांसाठी चांगले, संधिवात कमी करते, अस्थमा प्रतिबंध होतो, कर्करोगाला प्रतिबंध होतो.कोणी हे तेल योग्य नसल्याचे
म्हणतात असो.

6)जवस तेल:-
पूर्वी याच्या भाकरी करायचे स्वयंपाकात जास्त वापरत नसत पण हल्ली जवस खूप प्रचलित झालेली आहे याची चटणी करतात बडीशोप सारखे भाजून मुखवास म्हणून वापरतात हे थोडे चिकट असते त्याला फारशी चव नसते खरपूस भाजले की छान लागते औषध म्हणून याचा वापर करतात डायबिटीस ला हार्ट ला खूप चांगले असते उष्ण औषधी आहे 
हार्ट ब्लॉकेज वजन कमी करण्यास  रक्तातील गाठी कमी होतात याची तीळ घालून चटणी पण करतात.
स्त्रियाच्या रजोनिवृत्ती नंतर निर्माण होणाऱ्या इस्ट्रोजन संबंधित हार्मोन्सवर गुणकारी आहे.ओमेगा 3 मुळे पेशींची लवचिकता वाढते.
या तेलात 6 जीवनसत्त्वे आहेत त्या मुळे , ऑस्टिओपोरासिस, ऑस्टिओआर्थयटीस, अस्थमा, कॅन्सर यामध्ये हे तेल गुणकारी आहे. या तेलाचा वापर योग्य प्रमाणात करावा.

 7)तीळ तेल:-
हे थंडीत जास्त वापरतात कारण शरीर असंतुलित करते स्नेहन करण्यासाठी वरतून खाण्यासाठी तळण्यासाठी स्वयंपाकासाठी इत्यादी देवासाठी तर हेच तेल वापरतात हे तेल लवकर खराब होत नाही 
तीळ तेल हे शरीर संतुलित करते व स्नेहन
करण्यासाठी ,वरतून खाण्यासाठी चांगले
स्वयंपाकासाठी चालते पण  तळण्या साठी वापरू नाही.हे तेल मुळात लवकर खराब होत 
नाही हाडे मजबूत करते, रक्तदाब नियंत्रित करते, ब्रेनसाठी चांगले, यामध्ये
ओमेगा 6, इ, क, ब6 हे जीवनसत्त्वे आहेत.

8)एरंडेल तेल:-
हे ज्याला पोट साफ होत नसेल त्याने हे रात्री गरम पाण्यात दोन चमचे घ्यावे, याचे बी पण मिळते पूर्वी घरी पाट्यावर वाटून खीरे साठी वापरयचे  एरंडेल तेल हे धान्याला कीड लागू नये म्हणून वापरतात .एका पसरट भांड्यात धान्य घेऊन थोडे थोडे एक एक दोन दोन चमचे तेल टाकून ते पूर्ण हाताने घासायचे आणि बाजूला ठेवायचे मग दुसरं घ्यायचे असं करून पूर्ण ध्यान्याला लावुन घ्यायचा नंतर डब्यात भरून ठेवले तर एकही धनोर किंवा किडे होत नाही, वर्षानुवर्षे तचेच राहते उदाहरणार्थ तुरीची डाळ, तांदूळ ,कडधान्ये ,तिखट ,हे आम्ही स्वतः वापरतो तांदळाला बोरिक पावडर लावली तर त्याचा सुगंध निघून जातो.

9)बदाम तेल:-
हे तर सर्वात पौष्टिक ई जीवनसत्व असलेल् डोक्याला लावा, मालिश करा, दोन थेंब नाकात टाका हे चेहऱ्याला सुध्दा लावतात मसाज करण्यासाठी. 
शनिदेवाला व मारुतीला पण तेल प्यारे आहे 
दर शनिवारी शनीला तेल वाहतात .
आणि तेलाचा अभिषेक पण करतात .

10) आमसूल तेल:- 
याचा तूपा सारखा घट्ट गोळा मिळतो  हे थंडी मध्ये  गरम करून तळ पायाच्या भेगा ना लावतात तसेच थंडी मध्ये आपले अंग पण उलते, हे तेल लावल्याने स्किन मऊ होण्यास मदत होते.

 तेल हे स्वयंपाक घरातला राजा आहे याशिवाय कुठलाही स्वयंपाक होऊ शकत नाही.

तसे तर अजून बरेच तेल आहे राईस तेल , ई.

याच्या वरून आपल्याकडे एक दोन म्हणींचा पण वापर होतो ह्याच्या पाठी ला  तेल लावून ठेव म्हणजे समजेल जर कोणी ऐकलं नाही तर मुलांना म्हणतो. 
कोणी आपले नुकसान केले तर म्हणतात यांनी मला खूप तेल लावलं होते बर.

आपल्याला दुसऱ्याला तेल लावायचे नाही 😊 आपल्याला आरोग्यासाठी योग्य वापर करून 
आयुष्य संतुलित ठेवायचे.

                                       सुलहर🖋️


 

Comments

  1. Very nice article 👌👌&different types of oils, it's uses. Amarnath Jangale.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद दादा
      तुमच्या अभिप्राय मुळे आम्हाला लेखना लिखाणाला उत्साह मिळतो🙏😊

      Delete
  2. अरुण चौधरी .ताई तेल संदर्भातील तुमचे उत्तम विज्ञाननिष्ठ लेखन वाचले.सर्व सामन्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गर्जेपैकी ती एक महत्वाची बाब आहे.बहुत्येकानात्यंद्दल पुरेशी जाणीव नसते.तुम्ही गृहिनिसाठी अनमोल खजिना सादर केला आहे. रीफाइंड तेला पेक्षा फिल्टर्स उत्तम.दीर्घायुषी सेवेबद्दल तुमचे अभिनंदन.लेखन सुरू ठेवा

    ReplyDelete
  3. खूप खूप धन्यवाद सर
    तुमचा अभिप्राय वाचला की लिखाणाला
    उत्साह येतो 🙏😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"