पोळी

सहर्ष सादर करत आहे "विचार मंथन " 

                 🌷 * पुरण पोळी *  🌷
आत्ताच होळी येऊन गेली होळी रे होळी पुरणाची पोळी म्हटले की आईचा चेहरा समोर उभा राहतो ,कारण की पोळी खावी  ती फक्त माझ्या आईच्या च हातची गरम, रेश्मा सारखी मऊ, ती बनवायचे म्हणजे एक कलाच आहे खर, आता कोणी म्हणेल की पोळी सारखी पोळी  त्यात काय? पण त्या पोळीच आपल्या सर्व भगिनींची माया आहे मुलांना म्हणतो अरे गरम गरम पोळी खाऊन घे पोळी हा पदार्थ असा आहे की तो गरमच छान लागतो एक पोळी च्या ऐवजी दोन पोळ्या खाऊन
 गरम असते तर.
जेवणात पोळी चांगली असली तरच जेवण पोटभर होते .बाकी सगळे पदार्थ असतात पण जेवण हे पोळी वरच फुलका,रोटी पण म्हणतात तिला, भुकेला मागणारा येतो तेव्हा मला जेवण द्या, असं म्हणत नाही तर मला एक रोटी किंवा एक पोळी द्या, असेच म्हणतो म्हणजे ही पोळी जेवणाचा एक अविभाज्य आहे. ती कशाही सोबत खाल्ली तरी आपण पोट भरू शकतो. उदाहरणार्थ भाजी ,चटणी, लोणचं, तिखट , मीठ मसाला. तेल, तूप मीठ असले तरी चालते. 

1) पोळ्यां करताना पीठ चाळून घेतो मग भिजवतो. तसे न करता तशीच भिजवावी
 कारण त्यात कोंडा ,म्हणजे त्यात फायबर असते ते टाकू नये. कणिक भिजवताना त्यात थोडे मीठ ,तेल घालून मऊ अशी भिजवावी अर्धा-एक तास झाकून ठेवावे .पोळ्या करताना छोटे छोटे गोळे घेऊन छोटे गोल लाटून त्यात तेल आणि पीठ लावावे चार घडी करून, पोळी अगदी हलक्या हाताने लाटावी. पोळी एकदम पातळ लाटावी छान फुगते कोणी दोन चाडी करतात तर कोणी फुलका करतात. प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या आणि भाजण्याची पण एक कला आहे ती खूप कडकड, व्हायला नको आणि कच्ची पण राहायला नको. कोणाला एकही काळा डाग पडलेला नको. कोणाला थोडी लालसर भाजलेले पाहिजे. हे सर्व सांभाळून गृहिणीला पोळ्या भाजाव्या लागतात. आत्ताच्या मुलींना पोळी करायला जरा कठीण वाटते कारण त्या नोकरीला जात असतात. आणि लग्नाआधी फारशी सवय नसते. ती गोल व मऊ झाली पाहिजे , सरावाने जमते ती बनवायला पण खूप वेळ लागतो. आणि एका जागेवर जास्त वेळ उभे राहावे लागते ना, त्यामुळे कंटाळतात. कोणाला ते नको असते म्हणून आजकालच्या मुली पोळी वाली लावतात. अर्थात सर्विस मुळे, वेळ नसतो .कारण सर्व स्वयंपाक करायला जितका वेळ लागतो  तितकाच वेळ पोळ्या करायला  लागतो. असो!

2) पुरणपोळी तव्यावरच्या , आणि मांडे  खापरा वरच्या पोळ्या दोघांची चव खूप वेगळी लागते तव्यावरच्या पोळीला भरपूर पुरण असतं खापराच्या पोळीला पुरण कमी घालतात. पसरायला पाहिजे त्याचे खूप एक तंत्र असते ज्याला जमतात त्यालाच छान जमतात. होळी, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला तर पुरणपोळीचाच नेवैद्य असतो.आमच्याकडे आई पुरणाचे मांडे करायची, ती एक सुगरणच करू शकते. त्याच्या साठी गहू आणण्यापासून तर पोळी पर्यंतची प्रक्रिया, स्टेप-बाय-स्टेप कशी ! 
बघू तर पहिले गहू हा चांगल्या प्रतीचा पाहिजे. सरबती, बन्सी गहू, लोकवन असे जातीचे 
 नाव आहे. बहुतेक हेच वापरतात. मैद्याची पण करतात. कोणी अर्धा मैदा अर्ध पीठ असे पण करतात. गव्हाला थोडे ओले करून घ्यायचे मग फडक्यात बांधून ठेवायचे मग दळायचे नंतर वस्त्रगाळ करायचे त्याच्या कोंडा वेगळा आणि पिठी वेगळी करायची.
चांगल्या गव्हाची चांगली पोळी बनते पूर्वी तर घरी जात्यावरच दळायचे. पूरण सुद्धा खूप मऊ हवं म्हणजे पोळी त ते पसरले पाहिजे आणी पोळी फाटत नाही .

 2) पुरण:-  त्या करता पाहिले हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन पाण्यात भिजत घालायचे. ज्याला ह.डाळ पचत नाही  ते मुगाच्या डाळीचे पण करतात . म्हणजे भिजल्यावर पुरण लवकर शिजते, पहिले भांड्यात शिजवायचे आता कुकर च्या पाच- सहा शिट्ट्या घेऊन एकदम मऊ शिजवायचे मग चाळणीत काढायचे म्हणजे पाणी निघून जाते.  त्याचे पाणी वेगळे काढायचं ,मग त्या डाळी मध्ये साखर किंवा गूळ प्रमाणात घालून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. पूर्वी तर पाटा वरवंट्या वर वाटायचे. प्रत्येकाची पुरण करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कमी गोड जास्त गोड कोणी दूध , खवा घालून सुद्धा करतात. मिक्सरमध्ये बारीक झाले की नंतर एका कढईत काढून घ्यायचे त्यात थोडं तूप टाकायचं छान एक जीव झाले की त्यात विलायची, पावडर सुंठ पावडर, जायपत्री टाकायचे, ते झाले की नाही बघण्याची एक पद्धत आपली खुरपणी उभी ठेवायची. ती तशीच उभी राहिली तर झालं असे समजा, खूप घट्ट कोरडे पण नको, मऊ पाहिजे.
आता पीठ भिजवताना त्यात थोडे मीठ, तेल घालायचे मिठाचे पण त्याला प्रमाण असते थोडी हळद टाकावी , आणि मऊसर भिजवायची. मग एक दोन तास आधी गोळे करून ठेवायचे  एका पाटावर पांढरे कापड घालून त्यावर पीठ घालायचे गोळ एकमेकाला चिटकुन नये, म्हणून वरतून थोडी कणीक टाकावी  खूप मऊ (सैल )भिजलेली असते.
वरून ओलसर कापड झाकून ठेवायचे हवा लागून कोरड व्हायला नको. मोठ्या परातीला एक पांढरा कापड बांधायचा ती उलटी करून त्यावर पोळी लाटायची एक गोळा घेऊन त्यात वाटलेले पुरण भरून  पोळी  थोडी अलगत लाटायची. मग दोन्ही हातावर झटकायची नंतर हातावर आपल्या बोटा पासून  ते कोपरापर्यंत गोल मोठी मोठी करायची, चुलीवर ठेवलेल्या खापरावर टाकायची.

 (खापर  म्हणजे मातीचे. माठाचा अर्धा भाग या आकाराचे असते ). ते कुंभाराकडे मिळते . याची सुद्धा खूप कलाकारी व खुबी आहे. पोळी उलटवताना दोन कपड्यांमध्ये धरून तिला उलटी करायची व शेकायची त्याची घडी सुद्धा एक विशिष्ट प्रकारची असते. दोन बाजूंनी  थोडी आत घडी करायचे व दुसर्‍या बाजूने थोडी मग आयता कृती घडी तयार होते. 
वाढताना त्याचे दोन-तीन तुकडे करून वाढायची. सहसा पूर्ण पोळी कोणी खाऊ शकत नाही. कारण ती खूप मोठी असते. त्याबरोबर आंब्याचा रस , तांदळाची खीर , गावरानी तूप. वा!वा! काय खमंग एकदा खाल तर थक्कच व्हाल. पूर्वी तर एका वाटीत पिठीसाखर आणि तूप एकत्र कालवून त्यासोबत खायचे . आता एवढे गोड कोणी खात नाही, पुरणपोळी, हे खास पारंपारिक महाराष्ट्रात खानदेशी पदार्थ आहे. अश्या खास पोळ्या करणाऱ्या माझ्या आई ,काकू, वहिनी, यांना माझा खूप मनःपूर्वक सलाम. त्या खूप एक्सपर्ट आहे याच्यात. खूप मेहनतीचे आणि पेशन्स चे काम आहे. आजकल  विकत पण मिळतात. वाणी लोक जास्त व्यवसाय करतात याचा एक पोळी 60,70 रुपयाला ऑर्डर प्रमाणे मिळते. पण घरच्या पोळीची सर नाही . पुरणपोळीचे जेवण म्हटले की डोळ्यासमोर केळीचे पान, त्यापुढे रांगोळी दिसते व पानात भाताची मूद, त्याच्यावर वरण, साजूक तुपाची धार, एका बाजूला कोरडी भाजी, कटाची आमटी , कुरडया, पापड ,भजी, हे सर्व असते. 
*********
कटाची आमटी:-
म्हणजे हरभऱ्याची डाळ शिजवल्यावर त्याचे जे पाणी राहते त्याची करतात त्यात खडा  मसाला  वाटून आमटी तयार करतात. असा झक्कास बेत असायचा आमच्याकडे पाहुणे- व्याही लोक आले की आवर्जून करायचे. सणाच्या वेळी असायचीच खास पोळी उरली तरी नंतर दुसऱ्या दिवशी, तूप टाकून छान लाल भाजून किंवा दुधाबरोबर खायचे. आता हे करण्याचे प्रमाण कमी होत आहे. 

"एक गहू प्रकार बहु " अशी एक म्हण आहे.
गव्हापासून दलिया, रवा ,सांजा, गव्हाची खीर असे अनेक प्रकार बनवतात. याच  पोळीला पुरणाचा (मांडा ) हा पण शब्द आहे आणि  त्यात फायबर असते. शरीराला, चांगले पौष्टिक आहार, म्हणून खूप चांगले असते.

                                           सु ल ह र 🖋️ 

Comments

  1. Very nice article 👌👌. AMARNATH JANGALE

    ReplyDelete
  2. अरुण चौधरी. जळगाव.आपला लेख उशिरा वाचण्यात आला पण वाचून आनंद झाला. डाएत चा क्लास सुरू करायला हरकत नाही.उत्तम रसिपिबद्दल वर्णन सत्वयुक्त आहे. पुरण पोळी ची लज्जत वेगळीच असते तेसांगुन तुम्ही चवीत भर घातला आहे.नवीन मुलींना सूनाना ही माहिती गरजेची असून जुण्याना सुधारणेसाठी संदर्भ आहे.आपल्या सूक्ष्म निरीक्षणाने लेखाचिकिनार दृढ केलीय.आपले धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"