*पतंग*
सुलहर "सहर्ष सादर करत आहे * विचार मंथन*
🌷 "पतंग" 🌷
नवीन वर्षाची सुरुवात मकरसंक्रांतीच्या सणाने होते या सणाचे विशेष म्हणजे पतंग! (पतंग उडवण्याचा सण) अतिशय उत्साह घेऊन येतो तो आत्ताच येऊन गेला म्हणजे मकर संक्रांत 14 जानेवारी.
याला 'उत्तरायण' पण म्हणतात हा सण विषम संख्येच्या वर्षी 15 ला येतो आणि समसंख्या ला 14 ला येतो. भारतात दर वर्षी आंतरराष्ट्रीय पतंग दिवस मनवला जातो, गुजरात मध्ये हा सण खूप मोठ्या प्रमाणावर होतो तिथे प्रत्येक जण गच्चीवर टेपरेकॉर्डर डीजे लावतात व पूर्ण दिवस गच्चीवर सहपरिवार मित्र मंडळासह ग्रुपने पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. तिथे दहा रुपयांनपासून पाचशे हजार रुपयांपर्यंतच्या पतंगी मिळतात. प्रत्येक जण जवळ दोन चार डझन किंवा अधिक पतंगी आणतात. तसेच मांजाची चक्री पण खूप रंगात व खूप प्रकारात मिळतात त्यादिवशी जेवण खावन सर्व विसरुन बेफान होऊन पतंगी उडवतात. किती पतंगी काटल्या जातात काही अडकून पडतात तरी प्रत्येक जण मोठ्या उभारीने व आवेशाने उडवतात. खाणे म्हणजे गरम गरम भजी चा नाश्ता फरसाण रंगीत गोड पोहे ड्रायफूट टाकलेले असतात ते दुधात घालून खातात ढोकळे ,एक नाही अनेक प्रकारचे नास्ते गरम-गरम असतात. सगळे आकाश रंगीबेरंगी पतंगीने छान भरलेले असते प्रत्येक पतंग वेगळ्या रंगाचा असतो पूर्वी पतंग रेशमी कापड ने बनवायचे अशी पण मान्यता आहे .
प्राचीन काळी एक शेतकरी त्याची टोपी उडू नये म्हणून त्याने दोऱ्याने बांधल्याचे सांगतात. त्याचा शोध चिनी मोजो तत्त्ववेत्त्यांनी पाचव्या शतकात लावला. पतंगीचा वापर अंतर मोजण्यासाठी व वाऱ्याची चाचणी घेण्यासाठी केला होता पतंग कागद व बांबूच्या कामट्या च्या काड्यांनी बनवले जातात. पतंगावर विविध प्रकारचे चित्र काढलेले असतात व खूप आकार पण असतात आजकाल त्याचे कागद पण वेगवेगळे येतात. त्यांची बांधण्याची पद्धत पण ठराविक असते ते मोजक्या लोकांना येते (मुलांना) ती नीट बांधली नाहीतर उडत नाही, त्याला( कन्नी )बांधणे असे म्हणतात .
मांजा " पण वेगवेगळ्या रंगाचा व धाग्याचा असतो दुसऱ्याची पतंग कटायला पाहिजे म्हणून खूप पक्का काच लावलेल्या दोरा वापरतात पण आता त्याच्यावर बंदी आली आहे .त्यामुळे खूप नुकसान होते पक्ष्यांची मान कापली जाते. रस्त्यावरून गाडीवर जाणाऱ्यांच्या गळ्याभोवती अडकला तर कापले जाते. खूप लोकांचे मानहानी होते, त्यामुळे तरी काही मुले वापरतातच .
तीपण एक नशा आहे ही पतंग उडवणे म्हणजे एक दिव्यच आहे! आमचे मुलं लहान होते तेव्हा तर ते घरी अक्षरशा काच कुठून त्यात सरस मध्ये भिजवून किंवा खळ लावून दोरा तयार करायचे .पतंगीसाठी रंगीत कागद घडी घालून चौकोनी कापायचा व बांबू भिजत घालून त्याच्या बारीक काड्या करायच्या आठ दिवस हाच प्रोग्राम चालायचा . मित्राकडून त्या कशा बांधायचा त्याच्या कडे जायचे मग गच्चीवर उडवायचे, गच्चीला जीना पण नसायचा खिडकीच्या भिंतीवर चढून जायचे अशी कसरत असायची तसेच या पतंगी मुळे खूप मुलांचे खाली पडून जीव पण गेलेले आहे असे दरवर्षी ऐकायला येते मुलगा पतंग उडवताना पडला कोणाच्या गळ्यात दोरा अडकून जीव गेला कोणाच्या हाताचा अटकुन कापला तरी पण हा खेळ काही बंद होत नाही. पतंगीला ढील देता देता त्या नादात मागे सरकतात व तोल जातो.
( एक गंमत म्हणजे पतंग कटली असे म्हणतात तर मला वाटते पतंग अटकते , फाटते कटते तर त्या दोऱ्या मुळेच ना? दोरा जर पक्का असता तर कटलीच नसती) असो ती संथ, डोलत डोलत आकाशात शांत उडत असते.
पतंग उडवणे सोपे नाही ती जेव्हा उंच उंचच आकाशात उडते तेव्हा जड होते त्याला खूप मेहनत लागते. दुसऱ्याजवळ चक्री द्यावी लागते हातात दोरा धरायला ही खूप ताकद लागते ही पण एक कलाच आहे. पतंगीवर खूप गाणे पण आहेत (चली चली रे पतंग उडी उडी रे)ती आकाशात जाते तेव्हा मुलं खूप आनंदी होतात. तिचा डौल पाहून खूप भारी वाटते.
आता अशा पतंगी वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या , त्याला दिवे लावतात शिट्ट्या लावतात. त्याच्या शेपटे पण खूप खूप लांब लांब असतात .
आपल्याकडे मुलीचे किंवा मुलाचे लग्न झाले की पहिला संक्रांत सण म्हणून करतात त्यावेळेस या पतंगाचे खूप कौतुक असते हलव्याचे दागिने ,काळी साडी, एकमेकांनकडे देवाण-घेवाण होते तसेच लहान मुलांचे बोरन्हाण म्हणून करतात तेव्हा पण पतंगी चे डेकोरेशन करतात.
पूर्वी एक कार्ड मिळायचे छोट्या पाकिटात रंगीत हलवा त्याच्या वर पत्ता लिहून तिळगुळ पाठवायचे आपल्या नातेवाईकांनकडे आता ती प्रथा बंद झाली.
मकर संक्रांतीला चा सर्वात महत्त्वाचा सण आजही भारतात अस्तित्वात आहे हा सण तसा खूप जुना आहे इंडोनेशियातील मुना बेटावरील गुहेतील एका ठिकाणी सुमारे 12 हजार वर्षापूर्वीच्या चित्रांमध्ये पतंग पाहायला मिळते चीनमध्ये सुमारे सात हजार वर्षापूर्वी अस्तित्वात आला तीथे पतंगाचा वापर दोन ठिकाणा मधले अंतर मोजणे, वाऱ्याची दिशा पाहणे, सैन्याला गुप्त संदेश पाठवणे, अशा कामगिरीसाठी केला जाई, दिशा दाखवणारे फुग्या सारखे लांब पट्टे माहीत होते पण पतंगा विषयीची माहिती मार्कोपोलो यांना प्रथम युरोपला नेली आणि अफगाणिस्तानात गुढी परन बाजी म्हणून तर पाकिस्ताना मध्ये गुढी बाजी किंवा पतंग बाजी म्हणून हे पतंग उडवणे प्रसिद्ध आहे. जगभर विविध सैन्यदलनां कडून हेरगिरी गुप्त संदेश पाठवणे, छायाचित्रण करणे काही हलक्या प्रकारची शस्त्रे पाठवणे, अशासाठी केला जात असे, पोलो स्टाईन च्या सैनिकांनी इज्राईल व्याप्त गाझा प्रदेशात पतंग बॉम्ब वापरुन तेथील पीके जाळली होती त्यामुळे इज्राईल चे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते.
भारतात पतंग कधी आला हे निश्चित सांगता येणे कठीण आहे पण देशभरातील पूर्वीच्या अनेक संत कवींच्या रचना मध्ये पतंगाचे वर्णन आणि उल्लेख आढळतात. संत एकनाथ संत तुकाराम वैष्णव कवीनांदास यांच्या रचनांमध्ये पतंगाचे वर्णनही बाराशे 70 ते तेराशे 40 या काळातील संत नामदेव यांनी लिहिलेल्या मराठी आणि इंग्रजी भाषेतील काव्य मधील पतंगाचा उल्लेख महत्त्वाचा आहे .त्यांनी लिहिले आहे "आणिले कागद साजीले गुडी, आकाश मंडल छोडी पाचजनासो बात बताडो, चीतसो दोरी राखीला. "
भारतात पतंग या शब्दाचा प्रथम वापर कवी मझंर याने चौदाशे 42 मध्ये लिहिलेल्या मधुमालती या रचनेत आढळतो. त्यांचे शब्द असे आहेत .
"पाती बांधी पतंग उतराई दियो तोही ज्यो
पियमह जाई "पतंगाचे उंच आकाशात विहरणे आणि तरीही त जमिनीशी धाग्याने बांधलेले असणे
पतंग कापली गेल्यावर आकाशातच गटांगळ्या खात भरकटत जाणे या गोष्टी साहित्य क्षेत्राला खूप भावल्या ,त्यामुळे अगदी आज सुद्धा भारतीय भाषातील काव्यात चित्रपटात कविता गीते आहे कविता आहे. गीतेमध्ये पतंगाची उपमा फार लोकप्रिय आहे .
गुजरात मध्ये सरकारी पातळीवरून आंतरराष्ट्रीय पतंग स्पर्धेचे 7 जानेवारी पासून 15 जानेवारीपर्यंत इंटरनॅशनल पतंग फेस्टिवल आयोजित केल्या जातात. त्यात कितीतरी देश सहभागी होतात .तेथे विविध ठिकाणी अनेक वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात रस्त्याच्या ठिकठिकाणी रंगीबेरंगी विविध आकाराच्या असंख्य पतंगाचे स्टॉल लागतात. दुसरे असे की अगदी ताजा खाद्यपदार्थ बनवून घ्यावा तसा तेथे ताजा ताजा मांजा बनवून दिला जातो. तिथे दुकानाचे स्वरूप बघून असे वाटते की तेथील लोक पतंग आणि मांजा बहुतेक किलोच्या भावात घेत असतील, अनेक व्यापारी कंपन्या ऑफिसेस मध्ये पतंगाची सजावट केली जाते इतके काय मंदिरांमध्येही पतंग पाहायला मिळतात. देवाच्या मूर्तीभोवती सुद्धा छोट्या मोठ्या आकारातील रंगीत पतंग आणि त्याच बरोबर फिरकी त्यांची सजावट पाहायला मिळते .
आता नवीनच ऐकले की मांजापासून होणाऱ्या धोका टाळण्यासाठी एक युक्ती गुजरातमध्ये आणलेली आहे ती म्हणजे वाहनाच्या पुढे दोन हँडलला जोडणारी एक उंच लंबवर्तुळाकार इंग्रजीत उलटे यु (U)अक्षर बनवून बसवले जाते गाडी वर बसलेल्या माणसाच्या उंचीपेक्षा अधिक असते ती व्यक्तीला अगदी जवळ असते त्यामुळे तुटलेल्या पतंगाच्या मांजा अचानक जरी समोर आला तरी तो थेट गळ्याला लागत नाही त्या तारेवर अडकून मागे टाकला जातो .
बेजबाबदारपणामुळे किंवा घडणारा जीवघेणा अपघात टाळला जातो. असा हा पतंगी सण सर्वांना खूप खूप आवडतो. सर्वजण त्याचा भरपूर आनंद लुटतात. परत येणार्या वर्षाची वाट बघतात.
पतंग आणि तुमचे जीवन यात एकच साम्य असते विशिष्ट उंचीवर असेपर्यंतच कौतुक आणि किंमत असते.🙏👍😊
सुलहर 🖋️
Very nice description of Kite.Amarnath Jangale 👌👌.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 🙏
ReplyDeleteNice information
ReplyDeleteKhup chaan 👌👌🙏🙏
ReplyDeleteपतंग उत्सव वर्णन हुबेहूब केलेले असून सत्याला अनुसरून आहे.त्याउत्सवाचा इतिहासही मजेशीर आणि खरा आहे.या निमित्ताने सर्वांना त्याची जाणीव होते.वेगवेगळ्या आकाराचे रंगाचे आणि दोऱ्याचे पतंग त्यामागील उत्साह आनंद वाखाणण्यासारखा आहे.उत्तम लेखनाबद्दल ताईंतुमचे अभिनंदन.प्रतिक्रियेला वेळ झाला पण आनंद कायम आहे..अरुण चौधरी
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
ReplyDelete🙏👍चौधरी सर