फुगेवला

सुलहर "सहर्ष सादर करत आहे 
* विचार मंथन* 

                 🌷फुगेवाला 🌷 

'फुगा' म्हटलं की लहान मुलांचा सर्वात आवडता. रंगीबेरंगी फुगे बघून मुलं घ्यायलाच लावतात पण फुटला की घाबरतात.
आम्ही लहान होतो तेव्हा रोज संध्याकाळी पाच वाजता आमच्या गल्लीत  एक फुगेवाला यायचा त्याची येण्याची चाहूल लगली म्हणजे तो फुग्याला टिचकी वाजवून वेगवेगळे आवाज काढायचा किंवा पिंगाणी वाजवायचा. त्याच्यावर गाणी म्हणायचा. हळूहळू सर्व बालगोपाल मग एकामागून एक असे जमा व्हायचे, विचारायचे, 'तुला हवा होता ना...  घड्याळ किंवा इतर वस्तू ये ना लवकर, तो आपला फुगेवला आला आहे ! बघ त्याच्या आवाज येत आहे.' 
आम्ही फक्त त्याच्याकडे जाऊन उभे राहायचं कारण रोज रोज घ्यायला घरून पैसे मिळत नव्हते ते फक्त श्रीमंत मुलांना रोज मिळत असे. एखादे वेळेस आई चुपचाप घ्यायची पण घेतला म्हणजे एक तर फुटायचा किंवा हवा कमी व्हायची. मग रडारडी. आई समजावयाची, ' असू दे फुगा फुटतोच म्हणून.' त्याच पैशाची खाण्याची वस्तू घ्यावी चॉकलेट-बिस्कीट तर त्यावेळी आतासारखे पन्नास शंभर रुपये मिळत नव्हती. पाच पैसे किंवा दहा पैसे मोठ्या मुश्किलीने मिळायचे. एक एक रविवारी एकेकाला , त्या फुगेवाल्याजवळ दुकान असायचे, ते खूप बघण्यासारखे. आता बघायलाही मिळत नाही. आता फक्त डोळ्यासमोर मात्र चित्र दिसतं एक चौकोनी काडीची मोठी चौकट त्याला एक मध्यभागी बांबू असायचा ते खांद्यावर घेऊन गल्ली गल्लीत फिरायचा. जिथे उभा राहिली त्याला एक काठीचे स्टॅन्ड असायचे, ते लावून उभा राहायचा. त्याच्या जवळ काय नसायचे म्हणून सांगू? फुगे किती रंगाचे आणि किती प्रकारचे -उदाहरणार्थ सुट्टी फुगे , मोठा फुगा, दांडीचा फुगा, माकडाचा आकाराचा, द्राक्षाच्या घडाचा आकार, एप्पलच्या आकाराचा, काकडीच्या आकाराचा फुगा तो जरा स्वस्त असे. बरेच प्रकार वेगवेगळे किंमत असायचे. रंगीत चष्मे, चेहऱ्याचे मुखवटे, प्लॅस्टिकचे घड्याळ , गाडी छोटी बाहुली , शिट्टी ,बारीक-बारीक खूप सामान असायचे. पूर्ण दुकानच म्हटले तरी चालेल. अगदी छान पद्धतशीर रचलेले असायचे. काही मुलं जमायचे ते फक्त फुटलेला फुगा घेऊन त्याची चिंगाटी करायची ती हातावर घासली की त्याचा ची ,ची , असा आवाज यायचा तर कधी एकमेकाच्या डोक्यावर आपटून फोडायची. खूप गंमत यायची. काही मुलं आपल्या अंगावर फुटेल म्हणून दूर पळायचे पण त्यातच किती आनंद घ्यायचा आणि मजा यायची . कधीतरी काका -मामा यांनी दिलेल्या पैशाची आवडीची वस्तू घ्यायला मिळायची पण त्यावेळी जास्तच जास्त एक रुपया द्यायचे पण ते खूप मोठी रक्कम वाटायची. तो फुगेवाला जात नाही तोपर्यंत तिथे जमाव असायचा. चांगले 1, 2 तास त्यात अगदी मनसोक्त रमून आनंदाने मज्जा लुटायची. जास्त पैसे असले तर एखाद्या महिन्यातून एक मोठा फुगा, बासरी घ्यायची. कमी पैसे असतील तर काकडी घ्यायची. एक छोटीशी आपल्या हाताएवढी असायची. ती त्याचे पण खूप वेगवेगळे रंग असायचे. काकडी म्हणजे लांब थोडी वाकडी, कधी भिंगरी,  प्लास्टिकची छोटी जमिनीवर फिरवायची आणि एक कागदाची त्याला छोटी एक काडी असते आणि वरती फुलाच्या आकाराचे  हवा आली की  फिरायचे ते.
सोरट सुद्धा असायचे. त्याच्याजवळ सोरट म्हणजे दहा पैसे द्या तो चिट्ठी काढतो तुम्हाला त्यावर  जी वस्तू लिहिलेली असेल ती मिळायची. खूप मज्जा यायची. केसावर सुद्धा फुगे मिळायचे तेव्हां. कधी कधी गॅसचा फुगेवाला पण यायचा. तो महाग असायचा. आम्हाला नव्हता मिळत तो. हातातून  सुटला की डायरेक्ट वर आकाशातच. मग पैसे वाया जातील म्हणून घ्यायचे नाहीत घरात. अगदी लहान असेल कोणी तर त्याला त्याच्यासाठी आणायचे. तो उडू नये म्हणून दोरा मनगटाला बांधून ठेवायचा म्हणजे उडायला नको म्हणून घरातच रहायचे. दिवाळीत आकाशात खूप रंगीबेरंगी दिवे सोडतात गॅसचे बघायला खूप मजा वाटते. आता सगळं घेऊ शकतो पण काय ती मज्जा च नाही पाच-दहा पैशाचा फुगा घेताना जो आनंद वाटत होता तो नाही कमी पैशात जास्त आनंद. 

फुगेवाला बघितला की लहान-मोठ्या सर्वांना आनंद होतो आणि एकदा तरी घ्यावासा वाटतो. असा हा छोटासा फुगा आज-काल सर्व कार्यक्रमात हवा असतो वाढदिवसाला तर त्याच्याशिवाय मजाच नाही. आज-काल वेगवेगळ्या कलरमध्ये ज्या रंगाची थीम असेल त्या रंगाचे फुगे लावून डेकोरेट करतात. खूप खूप छान दिसतात. 

त्यावर ते गाणं  लिहिलंय -
आला आला फुगेवाला आला 
लाल, गुलाबी , पिवळा, पांढरा हिरवा, निळा
वेगवेगळ्या आकाराचा वेगवेगळ्या रंगाचा
माकड घ्या, कोणी ससा घ्या, एप्पल घ्या...
या या भरभर या सारे या फुगे घ्या फुगे 
काय घ्यायचं ? पळा लवकर लवकर सारे 
या एक फुगा घेतला खूप खूप फुगवला 
उंच उंच आभाळात गेला आणि फटकन फुटला.
मग बाळाला आले रडू 
तिकडून आली आजी 
फुगा🎈घेऊन बाळाला👋🤗 

                                सु ल ह र 🖋️

Comments

  1. Very nice 👌👌. Amarnath Jangale.

    ReplyDelete
  2. 🙏👍 खूप खूप धन्यवाद नेहमी प्रमाणे पहिला अभिप्राय तुमचाच असतो 😊

    ReplyDelete
  3. आता हातात पैसे पण ती तेव्हाची मज्जा आता नाही ह्या रंगीबेरंगी फुग्यांनी बालपणीच्या आठवणी परत रंग भरून फुगवट्याच्या आणि काही क्षणातच आठवणींचा फुगा फुटूलाआणीआपण लेखात किती रमलो होतो याची जाणीव झाली........ 🧶🧶👌मस्त लेख🧶🧶👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"