"जीभ"
"सहर्ष सादर करत आहे
* विचार मंथन*
🌷जीभ🌷
आपल्या शरीरातला एक हाड नसलेला अवयव तो म्हणजे "जीभ" कोणी काही बरे वाईट उलट सुलट बोलले तर म्हटलं जाते, तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही ? म्हणून काही वाटेल तसं बोलायचं.
जिभेच्या मध्यभागी सरस्वती असते, म्हणून काही वेळेस जे आपण बोलतो ते खरे होते. आजाराचे मूळ कारण सुद्धा हीच आहे कारण आपले खाण्याचे लाड पुरवले जातात. माणसाला चटक-मटक मसालेदार पदार्थ खाण्यास फार मनापासून आवडतात. आपले पूर्वज म्हणायचे मूळ कारण हीच आहे म्हणून जिभेचे चोचले पुरवू नका.
अति खाल्ल्यामुळे किंवा चुकीच्या आहार घेतल्यामुळे डायबिटीस , बीपी, डायरिया ,असे आजार होण्याचा संभव असतो या जिभेवर ताबा मिळवणे म्हणजे एक दिव्यच आहे ती चूप राहू शकत नाही सारखी वळवळते कारण हाड नसते.
जरा आवर घाला, जिभेला लगाम लावा. नाहीतर खरं नाही किती बोलणार आणि किती खाणार असे आपले मोठे नेहमी सांगत असतात , आपल्या शरीराचा प्रत्येक अवयवा नुसार कमी अधिक कार्य करण्यास कुरकुर ते जर मोठा आजार झाला तर जसा अर्धांगवायू या आजारात मनुष्य अगदी निकामी होतो. पण आपल्यातला अवयव जीभ एक आहे तिला
दुखापत, जखम जरी झाली तरी ती तोंडातल्या लाळेमुळे लवकर बरी होण्यास मदत होते तर अशी ही जीभ. तोंडात म्हणजे जागेवर राहते पण तोंड उघडले की सटर-फटर खाण्यासाठी वखवख ते नाहीतर समोरच्यावर तोंड सुख घेण्याचा आस्वाद घेते देवाने तिला न थकण्याचा आशीर्वाद दिला आहे , यावर कंट्रोल करणे म्हणजे एक दिव्यच असते.
कोणी अरेरावीने बोलले किंवा शिव्या दिल्या तर जूने लोक म्हणतात काय तुझ तोंड गटारीच्या झाकणसारखे आहे का उघडले की जसा दुर्गंध येतो तसे तुझं तोंड उघडले की वाईट बोलायलाच लागत का?
दुसरे असे की माणूस कितीही वृद्ध झाला किंवा देहावर सुरकुत्या पडल्या डोळ्यांना दिसत नाही उत्साह नाश पावले पण जीभ कधीच म्हातारी होत नाही, तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच राहतो.
जिभेचा आकार लहान आहे पण मुख्य म्यानेत राहणारी ही दुधारी तलवार आहे .ती ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दात रुपी 32 चौकीदार बसवलेले आहेत. पण जीभ जबरी आहे ती कालांतराने दातांना देखील पाडून टाकते. कधी तोडून टाकते. तर कधी जहाल विष देखील निर्माण होते .तर कुणाच्या मनाला घायाळ करून जखमाही करून टाकते .तिच्यातून खर तर अमृत देखील निर्माण होते. तर तिथे प्रेमाचे फुले फुलता ,तसेच काटेही उगवतात.
अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो , ज्ञानतंतू सुद्धा थकतात . पण तिला कधीच थकवा जाणवत नाही अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याश्या जिभेवर ताबा मिळवणे हे कठीण काम आहे त्याला कुशाग्र बुद्धी ने विजय मिळवावा लागतो.
आणि जे लोक जिभेवर ताबा मिळवू शकतात. ते तितक्याच प्रमाणात चांगले खरे जीवन जगू शकतात.
सुलहर 🖋️
Very nice 👌👌 description of tongue
ReplyDeleteफार छान जीभेचा विविध बाजूंनी अभ्यास 👌
ReplyDeleteमोनाली जाधव.
Khup chhan
ReplyDeleteअरुण चौधरी..आपला जिभेवरील नियंत्रणाचा लेख वाचला.उत्तम असून वैज्ञानिक दृष्ट्या बरोबर आहे.जिव्हाबंध आवश्यक असतो.त्या शब्दाचे उल्लेख नसला तरी प्रक्रिया दिलेली आहे.दुधारी तलवार ची उपमाही सार्थक आहे.आपले अभिनंदन.
ReplyDelete🙏 धन्यवाद सर
ReplyDeleteMastach aahe g lekh 😜
ReplyDelete