भांड्यांनचा मेळावा
सहर्ष सादर करत आहे" विचार मंथन"
🌷बहुगुणी भांडे🌷
भांडे हा महिलांचा अत्यंत आवडीचा विषय तो असा ह्या भांड्यांचे नाव, आकार प्रकार किती, हे बघू
प्रत्येक महिला आपल्या कुटुंबाचे पोटाची खळगी भरण्यासाठी स्वयंपाक शिजवण्यासाठी भांडे जरुरी लागते. पूर्वी फक्त मातीचे भांडे वापरायचे मग एक एक धातूचे व अनेक आकारत, प्रकार निघाली पितळाचे भांडे , कासे धातू चे ,तांब्याचे भांडे ,चांदीचे भांडे ,काचेचे ,चिनीचे, त्यानंतर स्टीलचे भांडे खूप प्रचलित झाले प्लॅस्टिकचे तर विचारू नका आत्ता टप्पर वेअर चे डबे तर सर्रास वापरतात पूर्ण किचन टप्पर वेअर चे असते.
पूर्वी स्टीलचे भांडे कोणाकडे असले म्हणजे तो खूप श्रीमंत.तसं मागे जाऊन बघितले तर राजे, महाराजे गर्भ श्रीमंत लोकांन कडे चांदीच्या भांड्यांचा च वापर असायचा रोज वापरा पासून शोकेस पर्यंत .आता आपण संग्रहालयात बघतो काही लोक आता हौसेने चांदीचे भांडे खरेदी करतात. देवाचे उपकरणे, जेवणाचे ठराविक भांडे प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे घेतात काही लोकांकडे त्यांच्या वडलोपार्जित असतात.
मातीचे भांडे - आपले पूर्वज जास्त वापर करायचे आपल्याकडे मातीचे भांडे माठ, रांजण, नंदाळ ,अन्न झाकून ठेवण्यासाठी ते पराती सारखे होते त्याच वापर करत आता तवा, काही हंडी सारखे झाकणाचे कडी चे भांडे, असे बरेच प्रकार निघाले. काही लोक फॅशन म्हणून परत मातीचे भांडे वापरायला लागले आहेत.
पितळी भांडे - हे सर्व गरिबांनपासून श्रीमंतांनपर्यंत सर्रास वापर होत रोजच्या वापरा पासून शोकेस पर्यंत खूप आकाराचे प्रकारचे प्रत्येक ओकेजन साठी वेगवेगळे. पण त्याचे असे विशेष होते की चांदी तांबे पितळ याची मोड यायची जुने झाले की मोडून नवीन भांडे घ्यायचे स्टीलची मोड येत नव्हती पण आता घेतात पण किंमत पीतळ किंवा तांब्या सारखी येत नाही. आता मात्र मुद्दामून परत पितळी तांब्याचे भांडे वापरण्याची प्रथा आलेली आहे हाऊस म्हणून. पहिले लग्नकार्यात खूप वापर असायचा .
लग्नात स्वयंपाका साठी वापरासाठी - तांब्याचे व पितळी दोघं प्रकार मोठ मोठी भांडी असायचे त्यामध्ये डेग, परात, झारे, वरणा साठी वगराळ ,मोठे चौपाळ, मीठ लिंबू चटणी कोशिंबीर साठी तूपा साठी खूप वेगळ्या आकाराची असायची खूप छान आकार होता. छोटेसे झाकन वरती आणि पुढे तोटी तुप वाढी ,सम्पुट, भात वाढणि, तव्या सारखे गोल व थोडे खोल आणि त्याला दांडी असायची, पातळ वरण पातळ भाज्या वाढायला
सार पात्र ,असायचे बास्केट सारखी त्याला दांडि आणि पुढे चोच असे ना होते वाढायच्या
भांड्यांचे आता मोठे मोठे भांडे संग्रहालयात बघायला मिळतात .आता ते घरी बघायला मिळत नाही. आमच्याकडे जॉईन फॅमिली असल्यामुळे हे सर्व भांडे आमच्याकडे होते .
घरात रोजचे वेगळे ,सणावाराला लागणारे
वेगळे ,ठेवणीतले वेगळे ,कोणी पाहुणे आले तर वेगळे, बाजारात नवीन आकाराचे नवीन भांडे आले की महिलांना खुप हौस असते घ्यायची अगदी चमचे वाट्या ई.घरात पहिले असले तरी आता काय तर त्याचा आकार वेगळा आता काय तर त्याची कंपनी वेगळी, आता काय खूप आवडले म्हणून, असे म्हणून खूप भांडे , मांडणीत मांडून ठेवायचे स्वच्छ करून ठेवायचे खूप हौस असते ते खूप मेहनतीचे काम आहे. दिवाळी दसऱ्याला स्वच्छ करा वे लागत.
आता मात्र सर्व काही कपाटात ट्रॉली मध्ये असते .म्हणजे स्वयंपाक घर एकदम स्वच्छ आणि नीटनेटके दिसले पाहिजे ,पसारा अजिबात नको आणि पूर्वी एवढा पसारा होता पण तेवढे मोठे घर पण होते . आणि एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे लागायचे पण तेवढे भांडे बायकांमध्ये चिकाटी होती.
काशाचे भांडे - ठराविक लोकच वापरायचे पण पारोळा गावामध्ये हे भांडे वापरण्याची प्रथा होती त्यात स्वयंपाक करत नाही वाढण्या करता वापरतात आता काशाचे ताट ते देवाची पूजा कुळ धर्माचा नैवेद्य काढण्यासाठी जरूर असते. काही ठिकाणी मोठमोठे डिजाईन चे ताट पण असते ते वापरायला तसे कठीण असते ते पडले की फुकटे आणि त्यात आंबट पदार्थ ठेवला तर तो खराब होतो म्हणून आंबट पदार्थ करता वापरत नाही. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या घरात मुलगा झाला तर काशाच्या थाळी लाटण्याने वाजवायची अशी प्रथा होती. काश्या ला खूप महत्त्व आहे सोन्यासारखे.
तांब्याची भांडी - हे पण तसे ते काश्याच्या भांड्यात सारखे आंबट पदार्थ ठेवू शकत नाही ठराविक काम करता वापरले जातात वरतून खराब होतात ,जास्त करून त्याचा वापर म्हणजे फ्रीजमध्ये पाणी पिण्याच्या बाटल्या, पाण्याचा माठ , ग्लास, त्यांत पाणी पिणे चांगले असते म्हणून बहुतेक ठिकाणी वापरता. पूर्वी मोठे हंडे पाणी तापवायला असायची त्यात पाणी लवकर तापते जसे बंब, त्याचा घासला खूप त्रास होतो. म्हणून कंपनीने आता त्यावर वेग वेगळ्या रंगाने डिझाईन पेंटिंग केलेले आहे तसे मिळतात. वरून छान दिसतात आत मध्ये तांब असत त्यामुळे वापरायला ते सोयीस्कर जाते स्वच्छ पण राहते.
चिनी चे- पहिले मोठ्या लोणच्या च्या बरण्या गोलाणी उभ्या आकाराच्या छोट्या सुद्धा त्यात मीठ काढायचे नंतर दही, साय, ठेवण्यासाठी सट म्हणायचे त्याला ते छोट्या पासून मोठ्या पर्यंत असायचे ताकाला वापरायचे त्यात आंबट वस्तू खराब होत नाही लोणचं काढण्यासाठी वाट्या,डिश, ईतर .
काचेचे -पहिले फक्त कपबश्या आणि काही डीश,ठराविक च वापरत होता पण आता येरा , लो-पाला असे बरेच कंपनीचे डिनर सेट 🍽️ टी सेट☕🍥स्वयंपाकासाठी पण वापरतात.ई. कंपनीचे खूप आहेत. ओव्हनमध्ये वापरायची वेगळे स्टील आणि काचेचे ते दिसायला सुंदर आकर्षक दिसतात पण सांभाळायला अतिशय नाजूक आणि शोकेस मध्ये तर खूपच सुंदर दिसतात. अगदी तटस्थ बसलेले असतात.
प्लास्टिक - प्लास्टिकचा तर वापर आता खूपच असतो स्वयंपाक घरापासून बेडरूम पर्यंत अगदी चमच्या पासून किचन डब्बे पर्यंत ब्रँडेड कंपन्यां चे खूप छान आहे हे वापरायला सोपे व बेधडक सर्व जण वापरतात. 🥣🥘🍱
टपरवेयर - डब्याचे विशेष म्हणजे त्यात वस्तू खराब होत नाही व कीड लागत नाही थोडे महाग असतात अगदी चमच्या पासून गाळणी पर्यंत पूर्ण किचन सेट मिळतात .
वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक भांड प्रत्येक वेगळ्या कामा साठी उदाहरणार्थ ,जेवणाची भांडी वेगळी उरले अन्न काढून ठेवायची वेगळी, अन्न शिजवायचे वेगळी, कोरड्या व ओल्या वस्तू भरून ठेवायची वेगळी. स्वयंपाकासाठी तर अजून वेगळे आता तर कुकर सुद्धा वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे मिळतात नॉनस्टिक काळा रंग लाल रंग स्टीलचे मीटर लावलेले राईस कुकर सुद्धा वेगळा मिळतो स्टीम कुकर सुद्धा वेगळा मिळतो प्रत्येक धातूमध्ये प्लेट्स परात पातेले
पूर्वी वरण शिजवायला बटलोई एक असे गोल आकाराचे काशाचे किंवा पितळी असायचे त्यातच वरण शिजवायचे.
मी माझ्या मैत्रिणीकडे (सरस्वती) कडे बघितले एक भांड आहे ते दक्षिण भारतात तामिळनाडू प्रांतांमध्ये विशिष्ट प्रकाराने बनवले जाते आणि रस्सम व सुप करता वापरतात हे शुद्ध टीन धातू ने बनवलेले असत. चांदी आणि शिस एकत्र धातु ने बनवलेले असते .त्यात टमाटो रस्सम केला जातो त्यात केलेल्या टमाटो रस्सम खूप चविष्ट लागतो आणि आरोग्यदायी मानले जाते . हा धातू खूप महाग असतो.
आता काही वर्षा पासून डॉक्टर लोकांचे म्हणणे आहे की यात केलेल्या पदार्थांची कोणाला ऍलर्जी होऊ शकते .तर वापरण्यास मनाई करतात असो . हे एक पुरातन काळातील भांडे
हे तिकडे च्या लोकांची वापरण्याची परंपरा आहे याचा आकार गोल व मोठ्या तोंडाचे उभे भांडे . त्यात फक्त फोडणी दिल्यानंतर त्यात ते उकळायचे जर ते डायरेक्ट गॅसवर ठेवले तर वितळते ,त्याच्यातली, सांबार, ई. पदार्थाची चव खुप छान लागते . त्याचे फोटो आहे
भातासाठी वेगळे ,पातळ पदार्थ, ताका साठी गंज, पोळी साठी चप्पट गुंडी असलेल्या झाकणाचा, डब्बा, मसाल्याचा डब्बा वेगळा पूर्वी लाकडी पण होते आता वरती पारदर्शक काच असलेला हि मिळतो. चहाची किटली, पोळपाट लाटणं, खलबत्ता, सोऱ्या, ई.
नंतर जेवणाच ताट खोल गुजराती थाळी टाईप पारंपारिक काठा असलेले ताट ,वाट्या, पातळ भाजीच्या खोल डिश🍽️ ताटल्या , चमचे तर लहानापासून मोठ्यापर्यंत किती प्रकारच वेगवेगळ्या आकार त नंतर पळी, डाव, चमचा, सराटा, इत्यादी बरेच आहे
पाणी पिण्यासाठी- ग्लास ,तांबे , जग,भरपूर काही आकार आणि प्रकार .
आता उरलेले अन्न काढण्यासाठी - सर्व धातूमध्ये आणि आकारामध्ये प्रकारा मध्ये
लहान-मोठे झाकणाचे छान आकाराची सुंदर मिळतात. असे वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी वेगवेगळे भांडे लागतात. 🍲🥗
असे हे भांडी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या प्रसंगात वापरायची प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक जाती जमातीत वेगवेगळ्या पद्धतीचे भांडे वापरण्याची पद्धत आहे असो.
शेतकरी लोकांकडे पूर्वी धान्य भरण्यासाठी कणग्या काड्या पासून बनवायचे त्याला शेणाने सारवून ठेवायचे . आता पत्र्याचे,प्लॅस्टिक , स्टीलचे चौकोनी टाक्या आहे त एकदम वापरायला दणकट कधीही खराब न होणारे .
यात पुरुषांचा एकही सहभाग नसतो त्यांनी जर म्हटले ती एवढी भांडी घरात आहे कशाला आता नवीन तर म्हणतात. ते तुम्हाला समजणार नाही असे म्हणून त्यांना समजवतात. अशी गंमत 😀
आणि एवढे भांडे गोळ्या गोविंदाने स्वयंपाक घरात नांदतात पण कधीतरी आवाज होतो एकमेकाला लागणार आणि आवाज होणार च म्हणून एक म्हण पण आहे. घरात भांडे आहे ते "भांड्यांना-भांडे लागणारच" असो.😊🙋
असे हे भांडे स्वयंपाक घरातले महिलांचे भूषण आहे ते घरोघरी चमकतात.
सुलहर🖋️
Khup chaan. Sunder mahiti prastut kelis. Mahilanche ani bhandyan che naate phaar ghatt aste. 👌👌🙏🙏
ReplyDeleteखुप छान लेख
ReplyDeleteमंगला 👍
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 😊
अरुण चौधरी दादा 🙏
ReplyDeleteभांड्याला भांड लागणार हे गृहीत धरून लिहिलेला सुंदर लेख मनापासून आवडला.अनुभवाची शिदोरी गाठीशी ठेऊन केलेले स्पष्टीकरण अप्रतिम आहे.भांड्यांची रचना आकार मूलद्रव्ये शास्त्रीय आहेत.त्यातील कलात्मकता स्पृहणीय आहे.अभिनंदन ताई.
खूप खूप धन्यवाद चौधरी दादा
ReplyDeleteआपल्यासारखे वाचक आणि
आपले अभिप्राय मुळे लिहिण्यास अजून उत्साह येतो
खरच मनापासून धन्यवाद 🙏👍
भांड्याला भांडे लागणार हे गृहीत धरून लिहिलेला सुंदर लेखमनापासून आवडला.अनुभवाची शिदोरी गाठीशिथेऊन केलेले स्पष्टीकरण अप्रतीम आहे भांद्याची रचना आकार मूलद्रव्ये शास्त्रीय आहेत त्यातील कलात्मकता स्पृ हनिय आहे.अभिनंदन ताई...अर्चना अरुण चौधरी.जळगाव
ReplyDelete