आवळे अष्टमी


सहर्ष सादर करत आहे" विचार मंथन" 


आत्ताच 'आवळे अष्टमी' होऊन गेली. त्याबद्दल जुन्या आठवणी आठवल्या . आवळा अष्टमी म्हटले की आमचे काका तिघी आत्यांना आमंत्रण द्यायचे की उद्या आपल्याला बागेत जायचे आहे जेवणासाठी. त्या दिवशी आई खूप स्वयंपाक करायची.  करत करत एक वाजायचा. त्यानंतर बागेत जायचं. जेवायला शेजारचे वाड्यातले सगळे मिळून श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बागेत . प्रत्येकजण आप आपल्या घरून वेगवेगळे पदार्थ डब्बे भरून भरून आणायचे मुलं-बाळं सगळे, सगळे जण सोबत यायचे सर्व तयारी व्यवस्थित असायची केळीचे पानापासून तर मीठ लिंबूपर्यंत , डब्यात कोणी गोड दशम्या , तिखट दशम्या ,भाताचे प्रकार मसाल्यांची चमचमीत भाजी, चटण्या, कोशिंबिरी, कोणी गोड पदार्थ असे  आणायचे खूप खूप मजा यायची चार वाजेपर्यंत अगदी वनभोजन चालायचे. मुलांना खूप मजा यायची. झाडावर चढायचे. खाली सतरंज्या टाकायचे. त्यावर सर्वांना वाढायचे. आधी देवळात जाऊन दर्शन घ्यायचे. झाडाची पूजा करायची हे कधीही  विसरू शकणार नाही, असं वनभोजन असायचे. दोन तीन ग्रुपबरोबर वेगवेगळ्या दिवशी जायचे. मैत्रिणींबरोबर,  त्या आठड्यात दोन-तीन वेळा डब्बा पार्टी व्हायची.
त्या वेळेस डब्बा पार्टी करायची आणि झाडाखाली बसून जेऊन मजा लुटायची, एवढेच फक्त माहिती होते पण या दिवसाच काय महत्त्व आहे हे माहिती नव्हतं .ते आता थोडी माहिती मिळवून लिहीत आहे .  काही लोकांना माहिती असेलच तर हिंदू पंचांगाप्रमाणे कार्तिक महिना हा वर्षातील आठवा महिना येतो त्या शुक्ल चतुर्दशीला पण आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवतात. त्या जेवणाला 'आवळी भोजन' पण म्हणतात. कोणी 'आवळानवमी'  पण करतात. त्याला 'अक्षय नवमी' पण म्हणतात या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण करण्याला विशेष महत्त्व आहे .या दिवशी विष्णु भगवाननी कुष्मांडूक नावाच्या दैत्याला मारले होते या दिवशी श्रीकृष्णाने कंसाचा वध करण्याच्या पहिले तीन वनांची परिक्रमा केली होती. बरेच कृष्णभक्त या दिवशी मथुरा वृंदावनाची परिक्रमा करतात .अशी पण माहती आहे . संतानप्राप्तीसाठी सुद्धा या दिवशी पुजा केली जाते. भगवान विष्णूचे भजन गाऊन जागरण  करतात .आवळ्याच्या झाडाची दूध पाणी दिवा लावून मनोभावे पूजा करतात. वडाच्या झाडासारखे कच्चे सूत पण गुंडाळतात. आठ किंवा  108 फेऱ्या  मारतात. पूजा झाल्यावर परिवार व मित्राबरोबर वनभोजन म्हणून जेवण करतात . शास्त्रात सांगितले आहे की झाडाखाली जेवताना ताटात आवळ्याचे पान पडले तर ते शुभ असते. कारण ते आरोग्यासाठी खूप चांगले असते. आयुर्वेदात चमत्कार समजल्या जाणाऱ्या आवळ्याची उत्पत्ती कशी झाली ते बघा_ 
जेव्हा संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडाली आणि पृथ्वीवर जीवनच नव्हते तेव्हा ब्रह्म कमळाच्या फुलात बसून निराकार परब्रह्माची तपश्चर्या करीत होते त्यावेळी ब्राह्मणांच्या डोळ्यातून ईश्वरी भक्तीचे अश्रू गळत होते. या अश्रूंपासून आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली त्यापासून आवळ्याचे चमत्कारी औषधी फळाची प्राप्ती झाली आयुर्वेदात आणि विज्ञान नुसार आवळा एक अमृत फळ आहे. त्यात विटामिन 'सी' मुबलक प्रमाणात आढळते आपल्या शरीरातील पेशींची निर्मिती वाढवत शरीरास निरोगी ठेवते. आवळ्याच्या झाडात निरनिराळ्या देवदेवता वास्तव करतात अशी समजूत आहे. या झाडाच्या मुळात विष्णू तर खोडात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे . अशी श्रद्धा आहे त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय आहे कार्तिक महिन्यात आवळ्याला बहार येतो म्हणून कार्तिक शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन करतात. भोजनापूर्वी झाडाला श्रीफळ युक्त अर्ध्य देऊन झाडाखाली श्रीविष्णूची यथासांग पूजा करतात झाडाच्या चारही बाजूला तुपाचे दिवे लावतात .आवळ्यासंबंधी श्लोक किंवा गाणी म्हणून सर्वजण जेवणाचा आस्वाद घेतात .आवळ्यावर वात लावून या आवळ्याचा विशिष्ट पद्धतीने दिवा बनवून झाडाला ओवाळतात. या सोहळ्याला आवळी भोजन म्हणतात. कार्तिक महिन्यात केल्या जाणार्‍या तुळशी विवाहानंतर च आवळा  खाल्ला जातो.  आवळा, बोर ,ऊस, यांना फार महत्त्व आहे वनस्पतीचा सहवास मिळावा म्हणूनही हे आवळा भोजन केले जाते. यासारखे कार्यक्रम  आपल्या संस्कृतीत याच कारणास्तव वृक्ष पूजेचे महत्त्व आहे .आवळा तुळशीच्या लग्नापूर्वी खाऊ नये असा समज आहे. त्या झाडाखाली देवाचे वास्तव्य आहे कोणी  घराच्या दक्षिणेला दक्षिण दिशेला आवळ्याचे झाड लावतात. या महिन्यात रोज आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यास ती व्यक्ती विष्णुप्रिया होते या पासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. सुपारी, सरबते ,मोरावळा ,  आवळा कॅन्डी असे आरोग्यवर्धक औषधी पदार्थ बनतात .अशा उत्पादनामुळे अनेक व्यक्तींना रोजगार मिळालेला आहे या झाडाच्या सालीत आणि पानात टॅनिन भरपूर असल्यामुळे त्याचा उपयोग चामडी बनवण्यासाठी होतो. आणि झाडाच्या लाकडाचा उपयोग इमारतीच्या बांधकामात आणि शेताची अवजारे बनवण्या साठी होतो पाला आणि फळे जनावर चारा म्हणून उपयोगी होतो. झाडाचा
सरपण म्हणूनही चांगला उपयोग होतो. याच्या पानापासून तपकिरी आणि पिवळे रंग द्रव्य निघते असा बहुगुणी आवळा गुणकारी ठरतो.
अगदी नारळाच्या झाडा सारखा बुंध्यापासून शेंड्यापर्यंत सर्व झाड उपयोगात येतं, 
अशा झाडाला सहस्र वंदन करून या
या दिवसाचा आनंद लुटुया👏👏🌝🙋
                                                  सुलहर🖋️

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"