वाढते आयुष्यमान

 सादर करत आहे 
"विचार मंथन" 

"वाढते आयुर्मान लाभदायक की तापदायक" 🌷

'वाढते आयुर्मान लाभदायक की तापदायक?' हे आपण आपले च ठरवायचे आहे. तसे म्हटले तर वाढत्या आयुर्मान खूप सुख:द अनुभव देतो व भूतकाळातल्या राहिलेल्या आपल्या सर्व इच्छा आकांक्षा यावर उजळणी करून पुढील आयुष्य आपण किती चांगला वेळ देऊन वर्तमानात जगू शकतो, हा प्रयत्न करायचा सेक्सपियर म्हणतो,
'नावात काय?' तसंच  मी पण म्हणते वयात काय ?आज मी 67 वर्षाची आहे... पण मला अजिबात झुकते वय दिसत नाही. मी मनाने नेहमी फ्रेश चांगले सशक्त मानाने जगण्याचा प्रयत्न करते कारण हीच तर वेळ आहे आपले राहिलेले छंद जोपासण्याची योग्य वेळ व वय!
दिनचर्या आपली आपण ठरवून ठेवावी सकाळी लवकर उठून जॉगिंग ट्रॅकला फिरायला जाणे. आल्यानंतर ज्यूस गोळ्या इत्यादी घेणे मग नाश्ता पाणी करणे, आंघोळ उरकून शांततेत देवपूजा, मानसपूजा, हे आनंदाने व स्वस्थ चित्ताने करणे ,मग देवाची स्तुती पुस्तके वाचणे हरिपाठ, राम रक्षा, व्यंकटेश स्तोत्र, इतर काही ठराविक औषध मग एक वाजता जेवण नंतर थोडा वेळ बसणे. आरामात तीन वाजता गीता पाठ जॉईन करणे, दोन तासांनी परत थोडा आराम मग पाच वाजता थोडं लाईट नास्ता व सहा वाजता परत फिरायला जाणे, सात वाजेपर्यंत! आठ वाजता जेवण. आवडत्या टीव्ही सिरीयल पाहणे. जेवण झालं की एखाद्या तासाने शतपावली. किती छान शांतता आणि आरामशीर जीवन जगण्याच्या चान्स मिळाला. आपल्याला याआधी ऑफिसमुळे येवढे शांततेत कधी  झालंच नाही. नेहमी तारेवरची कसरत त्यामुळे डायबिटीज( शुगर) झाले पण त्यांच्याशी थोडी दोस्ती करून शुगर निल करण्यास 'माधव बाग'ची ट्रीटमेंट घेऊन कमी करण्याचा प्रयत्न केला. दुसरे असे की करोना मध्ये सगळे लोक डाऊन झाले पण मन मात्र खुले होते त्यामुळे घरात बंदिस्त असूनही न कंटाळता लिखाणाची संगत करून एक दीड वर्षाचा काळ कसा आणि केव्हा लोटला समजलेच नाही म्हणूनच आपल्यातली सुप्त कला ओळखा, आणि त्याना जोपासा.
नातीच्या मार्गदर्शनाने मोबाईलवर इतर ॲप शिकली ज्येष्ठ नागरिक संघ जॉईन करून झूम मीटिंगा केल्या. मिट, गुगल, युट्युब मुळे खूप शिकायला मिळते. मेडिटेशन ग्रुप जॉईन केला. ऑनलाइन गीता, रामरक्षा, असे अनेक क्लास करून प्रशस्तीपत्रके ही मिळवली. खूप आनंद वाटतोय. ह्या जगण्याचा हे सर्व करतांना घरच्यांच्या मुलं ,सुना ,पण आपल्याला वेळ देतात व नातवंडे सोबत असतातच.
बाहेर ट्रीप ला जायचे म्हटले तर लॉकडाऊन. आधी सगळे चारीधाम झाले करून पहिला लॉकडाऊन जड गेला. पण दुसऱ्याला चांगले सरावलो होतो. वय वाढत होते पण मन मात्र तरुण होते. हिरव्या मनावर रोज मोगऱ्याचे, चाफ्याचे उत्तर मात्र जरूर फिरवत होते.
मैत्रिणींशी बोलायला त्यांच्याशी गप्पा टप्पा करायला त्यांची विचारपूस करायला खूप आवडते मला आणि चित्रपट, नाटक, कोणी सोबत नसले तरी ऑनलाईन बुक करून जाते, टाईमच्या आता. मार्केटिंग, मॉलखरेदी, हे सर्व पण मनापासून आवडते.
आजकाल अमेझॉन ॲपवरून ऑनलाईन जी वस्तू आवडली ती वस्तू  बुक करून मागवते. मला खूप छान वाटते. 'अभी तो मै जवा हुं!' हा मंत्र जोपासला गेला मग काय कशाला वाढत्या वयाची भीती? वय काही म्हणत नाही. ज्या लोकांना कधी  जमत नाही ते आपल्याला त्याची भीती घालवून डिसकरेज करत असतात.  पण आपण मात्र त्याला न घाबरता आपली ध्येय व पुढचे पाऊल पुढेच टाकले पाहिजे. माझ्यापेक्षा जास्त वयाच्या व माझ्या समवयस्कर  महिलांना माझा संदेश आहे_ 'हीच ती वेळ आहे जे, जे ,आपल्या मनात आहे काही करायचे राहिले आहे ते एकही क्षण वाया न घालवता वेळेचा वयाचा सदुपयोग करून आपली स्वप्न साकार करा.' 
वाढते वय नक्कीच लाभदायक आहे. नकारात्मक शक्ती बाजूला ठेवून समाज सकारात्मक विचार करा. हास्यक्लब, मेडिटेशन, जॉईन करा. आनंद वाटेल जीवन जगण्याचा व राहिलेल्या आयुष्य निसर्गाच्या आणि आपल्या माणसाच्या सहवासात घालवा हे जीवन खूप चांगले आहे जगा आणि जगू द्या.🤝🤚 

ते पूर्ण होत नाही शब्द संख्या हे कुठे ऍड करू शकते.
नवीन शिकायला वयाची अट नसते व्यक्ती💻 शेवटपर्यंत विद्यार्थीच राहते. विद्या कधीही चोरून होऊ शकत नसेते. विद्या हे वैचारिक धन आहे. 'विद्या विनयेन शोभते!'👩‍🎓
आम्ही नर्मदा परिक्रमाला गेलो होतो. तिथे आम्ही एकशे तीन वर्षांच्या साधूंना भेटलो. त्यांनी बारा वर्ष नर्मदेत एका पायावर उभे राहून तपश्चर्या केली होती .👏अजूनही ते पायी भ्रमण करतात. त्यांना आम्ही दक्षिणा म्हणून वीस रुपये दिले होते पण त्यांनी त्यातले फक्त दहाच रुपये प्रत्येकाची घेतले. बाकी परत केले म्हणजे काय म्हणावे? ते दहा रुपये फक्त त्यांचा मठ बांधत आहे. त्याला मदत म्हणून घेतात असे सांगण्यात आले. प्रत्येक  यात्रेकरूंना
स्वतः फळ सोलून प्रत्येकाला त्याचा प्रसाद स्वतःच्या हाताने दिला जातो. जेवढे यात्रेकरू येतील त्यांना जवळ जवळ प्रत्येकालाच जरुरी अशा वस्तू म्हणून दिल्या. उदाहरणार्थ डाळ-तांदूळ, फुलवाती, आगपेटी, बिस्किट अजून इतर काही वस्तू असे क्वचित पाहायला मिळतात .1️⃣
एकदा आम्ही नाशिकला (सुला वाईन) बघायला  गेलो होतो. मी माझे दोघे भाचे व बहीण , सर्व बघता बघता अचानक माझ्या खांद्यावर ती एक हात पडला. मला आदरपूर्वक हाक दिली व मला म्हणाल्या मला तुम्हाला बघून खूप आनंद वाटला ! छान वाटलं तुम्हाला बघून! त्यांच्याशी काही ओळख नसताना त्या मॅडम माझ्याशी बोलल्या की इथे सर्व यंग जोडी आणि यंग मुलं दिसत आहे, पण तुम्ही एवढ्या उत्साहपूर्वक हे बघायला आल्या. मला खूप छान वाटले नाहीतर पहिले मला असं वाटलं मी उगाच आले की काय? मग मी म्हणाले, 'अहो इथे वयाचा काय प्रश्न? आपल्याला काय मन नाही का? आणि चांगली गोष्ट चांगली माहिती मिळवायला चांगली गोष्ट बघायला वयाची अट नसते ! तेव्हा तुम्ही चांगले केले की छान जागा बघायला आल्यात ( ती सुला वाईन फॅक्टरी होती म्हणून) असे त्यांच्या मनात आले. असो.' 
तर मुलं मला हसून म्हणाले, 🌝
'आत्या, मावशी तुम्ही खरंच डॉन आहे . इथे कोणी ओळखीचे नसताना एक अनोळखी व्यक्ती तुम्हाला उत्साही मूर्ती बघून आनंदी होते. अरे मग इथे🙋
वयाचा काही एक प्रश्न येत नाही? मनाने नेहमी उत्साही राहून फुलपाखरा सारखे बागडणारे  असावे!😊🌟


                                      सुलहर🖋️

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"