सहर्ष सादर करत आहे" विचार मंथन
                🌷 बस स्टॅन्ड 
                       बस डेपो🌷
बस स्टँड म्हटले की लगेच डोळ्यापुढे गर्दी असलेले लाल डब्याची गाडी उभी असलेले एक पटांगण दिसते असो.
तसे तर आम्ही  म्हणजे आमच्या कुटुंबात काका, वडील ,मी ,भाऊ, रेल्वेतच  सर्विस ला म्हणून  सर्वीकडे प्रवास रेल्वेचाच असतो. क्वचितच इमर्जन्सी  अथवा छोट्या गावाला जिथं रेल्वे जात नाही तर बसने जावे लागते तेव्हा जे काही प्रसंग व वस्तूतिथी आणि बसचा चेहरामोहरा व त्याचे ठराविक वास्तव्य मी अनुभवलेले व वाचलेल , सर्वांना ओळखीचे परिचित असे हे सत्य आपल्याला वाचायला आवडेल, अशी अपेक्षा व्यक्त करते. 
तसा बसचा प्रवास खूप खडतर व अनिश्चित असतो रेल्वेसारखा सुखकारक नसतो .असा हा बस डेपो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तिन्ही ऋतू व वेग वेगळी माणसे अंगावर  झेलत उभी असतात व वेगवेगळे निरपेक्ष दृष्टीने पहात प्रतीक्षेत उभे असतात प्रवासी.
हे असे वर्णन लिहायचे म्हणजे  मागील महिन्यात मी मुंबईला खोपट बसडेपो मध्ये ज्येष्ठ नागरिकाना काही सवलती चा पास मिळतो त्याची चौकशी करायला गेले होते . बऱ्याच वर्षानंतर बसडेपो मध्ये गेल्यावर हे बसस्टॅन्डवर मनामध्ये काही विचार डोकावत 
ते बघून आठवले की सगळेच बस डेपो असेच असता का? कारण मुंबईच्या बस डेपो पहिल्यांदाच पाहिला मला वाटलं की मुंबईचा जरा वेगळा असेल आणि गावाकडील वेगळे असतात अशी कल्पना होती तसे नाही थोड्याफार फरकाने तसेच आहे.
त्याचे थोडक्यात अनुभवले काही चित्र व काही वाचलेले वर्णन पुढे देत आहे_
महाराष्ट्रातल्या एसटी डेपोचा चेहरा एक सारखा असतो किंबहुना तो वेगळा नसतोच मोठे आवार, पटांगण त्याच्या एका बाजूने येणाऱ्या मार्ग दुसऱ्या बाजूने बाहेर जाण्याचा मार्ग व मध्यभागी डेपो ऑफिस येण्याच्या मार्गाच्या सुरुवातीलाच असा एक ऊसाच्या रसाचे मशीन (गुऱ्हाळ )त्याला बांधलेले वाजणारे घुंगरू रस्वंती गृहा चे नाव ठराविक असते रसवंती गृह आणि त्या च्या मालकाचे नाव असते त्याच्यात त्याच्या  बंधू नावाचा उल्लेख असतो  मला न  उलगडलेले कोडे आहे की सगळ्याच उसाच्या रसवंती यांचे नाव बंधू सोबत का असते? जाहीरातींची एक ठराविक जागाच असते एखाद्या युरिया खताची बॅग त्यावर  ट्रॅक्टरच्या जाहिराती, शेतीच्या अवजारांचा फोटो, एलआयसीचा फलक, आणी एखाद्या स्थानिक पुढाऱ्यांच्या वाढदिवसाचे फलक जोरदार झळकत असतात. त्याच्यापुढे एसटीच्या आगर असते तिथे बाहेरून आलेल्या बस उभ्या असतात. त्याच्या पुढे एस. टी. मंडळाने बांधलेले स्वच्छतागृह असते त्याला स्वच्छता गृह का म्हणायचे? हे एक कोडे असते कारण तिथे गेल्यावर स्वच्छ होऊन यायचे ऐवजी मन खराब  होऊन येण्याची शक्यता अधिक जास्त असते. नाही म्हणायला हल्ली सुलभ शौचालय बांधून थोडीफार सोय केलेली असते पण तरी बाथरूमला जाणे म्हणजे एक दिव्यच असते.
डेपोच्या मध्यभाग मोकळा असतो त्याला आठ ते दहा पाट्या असतात प्रत्येक फलाटावर नंबर त्यावर सुटण्याची गावाची नावे असतात. एका टोकाला नावापुरते रिझर्वेशन ची खिडकी असते खरंतर रिझर्वेशन ही कल्पना एसटी महामंडळाच्या पचनी पडत नाही वरच्या मजल्यावर कार्यालय व बदली ड्रायव्हर कंडक्टरची उतरायची सोय असते. खाली डेपो च्या मध्यभागी चौकशी व एसटीच्या माहितीची छोटी कॅबिन असते. त्यात बिचारा एक कर्मचारी खाकी कपडे घालून टोपी लावून आपली ड्युटी प्रामाणिक पणे करत असतो. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं माईक वरुन बस सुटण्याची माहिती ड्रायव्हर, कंडक्टर यांना सूचना शिताफीने हाताळत असतो . चौकशीच्या खिडकीवर विचारायला गेलो म्हणजे फक्त मला एवढेच काम आहे का? तिथे जाऊन विचारा... तिकडे जावा.. इकडे जा... असं फक्त सांगतो. व्यवस्थित पूर्ण कधीच सांगत नाही .
तसे मधूनच बाहेरून आलेल्या गाड्यांची माहिती देतो सातारा_ कोल्हापूर बस क्रमांक ४५६७  फलाट क्रमांक सहावर उभी आहे मुंबईहून आलेली सांगली बस थोड्याच वेळात फलाट क्रमांक ३ वर येत आहे. दुसरी गाडी फलाट नंबर एक वर येणार आहे. त्याच्या एका बाजूंनी लोकांची बसायची एक दगडी ओटा वजा बाक बसायचे लांबलचक दोन्ही बाजूने जागा असते. त्याच्या बाजूच्या भिंतीवर वेळापत्रक असते काही गाड्यांच्या बदललेल्या वेळा! त्याच्यावर जाहिराती त्याच्या बाजूला संभाजी बिडी हा पूर्वी जुन्या लावलेल्या ते अजूनपर्यंत तशाच. आता तंबाखू, सिगारेट आरोग्याला धोकादायक म्हणून त्याचा बोर्ड काढून टाकलेला. काही तसाच परंपरिक चाललेल्या आहेत. फलाटाच्या  आवारात  खेड्यातले वयस्कर लोक गप्पा मारत असतात. खिश्यातून चंची काढून पान लावत असतात. काही धोतर आवरून बिड्या ओढत असतात. पान खाऊन झाल्यावर भिंतीच्या कोपर्‍यात पिचकाऱ्या मारत असतात. अगदी नकोसे वाटते पण प्रवास करायचा आहेना? सार्वजनिक जागा असल्यामुळे आपण फक्त उघड्या डोळ्याने बघायचे बस. कोणी टोपीवाले तर कोणी फेटेवाले कोणी लेंगा तर कोणी शहराचे वारे लागलेले शहरी कपड्यातले. बायकांची पण तेच कुणी नऊवारी व खणाचे परकर पोलका, चोळी घेतलेली बाई तिची सून साडी, कोणी मुलाला पदराखाली घेत असते तर कोणी एक कड्यावर एक हाताच्या बोटांना धरलेलं बसच्या मागे धावत असते. काही शहरातील साडीवाल्या बाया काही पंजाबी ड्रेसवाल्या काही शाळकरी मुली सर्वजण प्रत्येक बसचा बोर्ड बघत-बघत ही बस का ती बस बघण्या मध्ये व्यस्त आणि बावरलेली असतात. मध्येच एखाद्या फलाटावर बाहेरून आलेली एसटी उभी असते त्याचा ड्रायव्हर खाकी ड्रेस उतरून त्यातून खाली उतरतो. तंबाखूचा बार भरून ऑफिसला जातो. व त्याच्यामागे कंडक्टर उतरतो आत्तापर्यंत जमलेल्या पैशाचा हिशोब लावतो. त्याच्या मागे सर्व प्रवासी त्याला 'कोणती बस आहे?' 'ही कोणती येणार?, 'कोणती जाणार?' त्याला प्रश्नांचा भडिमार करतात. तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ऑफिस गाठतो.
काही प्रवासी पाय मोकळे करायला खाली  उतरले की तेवढ्यात  उभे असलेले प्रवासी तात्पुरते सीटवर बसून घेतात .एसटीच्या चारी बाजूने बोरवाले, काकड्या, खारे दाणे, भुईमुगाच्या शेंगा , संत्र्याच्या गोळ्या आणि पेपरमिंटच्या गोळ्या जरूर असतात .ज्याला बस लागते ले खिडकीची जागा शोधण्यात मग्न असतात. तर कोणाला उलटी झालेली असते ते पाणी शोधण्याचे शोधात असतात. विकणारे मुलं वडाला प्रदक्षिणा घालावी तसे बस भोवती फिरत असतात.जेणेकरून प्रत्येक सिट वल्याला घेता आले पाहिजेत. एखाद्या कोल्ड्रिंगवाला उसाचा रस वाला हप्ते दिलेले असतात म्हणून तो बसमध्ये येऊन विक्री करतो . 
बाजूला बुक  डेपो मध्ये स्थानिक वर्तमानपत्रे स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तके, मासिके असतात. गीतेचा स्थितप्रज्ञ कोणाला म्हटले आहे त्याची कल्पना नाही, पण बुक डेपो तरी आहे मला असं वाटतं कारण की पॉकेट बुक सत्य कहाणी सारखे आणि अध्यात्मिक पुस्तके निरपेक्ष बुद्धीने आजूबाजूला मांडून अवकाशात बघत बसलेला असतो. डेपोच्या एका टोकाला हॉटेल असते ते कायम गजबजलेले असते सगळ्या हॉटेलचा चेहरा सारखाच असतो . मालक  सारखा ओरडत रहतो उसको चाय उसको बडा दो उसका पैसा लो उसको पानी दो , सारखा कपबश्याचा आवाज, तळलेल्या पदार्थाचा वास, माशा बसलेले पदार्थ खूप मोठ्या आवाजात वेगवेगळे प्रकारचे गाणे चालू असतात.असे बरेच काही गोंधळ गडबड असते.
दारावर किंवा  भिंतीवर त्या माणसाच्या  पाठीमागे  आई-वडिलांचा किंवा मालकाचा किंवा एखाद्या देवाचा माळ लावलेला किंवा त्या वर लाइटिंग असा  फोटो असतो. बसायची जागा असते ती जरा उंच असते त्याच्या बसायच्या  बाजूला ज्याच्या कृपेमुळे हॉटेलचा ठेका असतो व त्याचे हॉटेलचे सर्टिफिकेट टांगलेले असते बसण्याच्या जागा वर उंच असते त्यावर लाडू, चॉकलेट, गोळ्या, बिस्कीटचे पुडे , यांच्या भरलेल्या  काचेच्या बरण्या असतात . मोठ्या ताटामध्ये जिलबी ,समोसे, एका बाजूला उंच काचेच्या दरवाज्याचे कप्पे असलेले लाकडी कपाट असते त्यात भजी, वडे, मिसळ व त्या वर  मोठा इलेक्ट्रिक बल्प असतो त्या मधील पदार्थ, गरम राहण्यासाठी  असतात.  पदार्थ ताजे असतात का ( देव जाणे) प्रश्न पडतो ? पण ते खाणाऱ्याला पडत नाही कारण तिकडे दुसरे काही नसते असो . 
मागच्या बाजूला भटारखान्यात समोर  पाण्याचा ड्रम असतो. त्यात आपली बोटे बुडवून तो वेटर टेबलवर पाण्याचे ग्लास समोर ठेवतो .नाही म्हणायला पुण्या-मुंबईच्या लोकांसाठी तिकडं एक काचेचे कपाट. त्यात सॉफ्ट ड्रिंक, बिसलेरी वॉटर, दही असे पॅकिंग असते . मालक सारखा ओरडत असतो. पोऱ्या त्याला काय पाहिजे बघ, त्याची काय ऑर्डर आहे, एकीकडे नजरेने कोणी काय खाल्लं आहे... त्याची दखल घेत त्याची बिले फाडत असतो. एकीकडे पैसे घेत असतो.
हॉटेलच्या एका टोकाला हात धुवायला एक तोडकेमोडके बेसिन त्यावर एक नळ तो पण एक मजेशीर नेहमीच गळणारा असतो. तो उघडला की तोटीतून पाणी येते  किंवा भस्कन तोंडावर नाहीतर अंगावर पाणी येते. असा हा तहान लागल्यावर भूक भागवण्याचं एकमेव ठिकाण. 
 आता ए.सी. बस  आहेत शिवशाही, शिवनेरी, वगैरे रात्री लांबच्या प्रवासासाठी झोपण्यासाठी बर्थ पण असतात. आरामदायी सिट पण असते पण तिकीट खूप असते रेल्वे पेक्षा जास्त दिवाळीत इतर सणामध्ये त्याचे रेट डबल होतात . 
बस बद्दल लिहिण्यासारखे खूप काही  आहे वेळ आणि पान कमी पडतील ज्याचे त्याचे अनुभव वेगळे असतात. पण हे एक सहज आठवले म्हणून लिहिले.

असा हा बस चा प्रवास आपल्या जीवनाचा एक  अविभाज्य आहे. तो गरीब असो वा श्रीमंत  प्रत्येकाला करावाच लागतो. अशा  बस डेपो चा आदर करूया आपण मधूनमधून प्रवासाला जात असतोच. अशा 'लाल डब्बा' म्हणणाऱ्या बस स्थानकाला सर्वांनाच निरपेक्षपणे भेट द्यावीच लागते. कारण जीवनाच्या प्रवासात हा पण एक 'प्रवास' खूप अत्यंत महत्त्वाचा ठरतो! चला निघू या आता गावाल🙋

                                          सुलहर 🖋️
                                                                   

Comments

  1. Very nice 👌 👌description. Amarnath Jangale.

    ReplyDelete
  2. अरुण चौधरी..प्रत्येकाला करावा लागणारा बसचा प्रवास आणि आजूबाजूची परिस्थिती उत्तमरीत्या रंगविली असून वस्तुस्थितीची जाणीव करून देते.बंधूचा उसरस.गोळ्या.पापरमिंत.संत्रा.खरे शेंगदाणे.तसेच शौचालयाची बिकट स्थिती.कोनाड्यात बुकिग ऑफिस..गावाच्या पाट्या आणि डोळे ताणून वाट पाहणारे प्रवासी खरोखर छान रेखाटले आहे..आपला लेखन प्रवास सुरू ठेवा

    ReplyDelete
  3. खुपच छान लेख

    ReplyDelete
  4. खूप खूप धन्यवाद चौधरी दादा🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"