समई
सहर्ष सादर करत आहे " विचार मंथन"
🌷समई /निरांजन🌷
देवापुढे नमस्कार करायला गेले की आधी समईची ज्योत आपल्याला दिसते. लख्ख ऊजेड व मंद प्रकाश असलेली देवघरात आपले अस्तित्व कायम तेजोमय करणारी समई.
पूर्वी घरात अचानक लाईट गेले, तर याच समईच्या उजेडा मुळे घरात अंधार कधी होत नव्हता.
बालाजी मंदिरातल्या समय्या तर काही विशिष्ट पद्धतीने रचलेले, दोन्ही बाजूने असतात. त्यामुळे बालाजीचे किंवा इतर देवांचे चेहरा किती सुंदर आणि लोभस असं दर्शन घडते आणि अंतर्मन आशीर्वादासाठी प्रसन्न होते. त्या दिव्याचे सौंदर्य औरच आहे. विद्युत रोषणाईची चमक वेगळीच असते तर दिव्याच्या ज्योतीच्या तेलामुळे स्निग्धता आणि शांततेचा आभास वाटतो. सर्व मंदिरांमध्ये व देव्हार्यात व कोणत्याही आनंदी उत्साही क्षणाला समई प्रज्वलित करतात. त्याशिवाय पुढील कार्यक्रम सुरू होत नाही. ते असे की आपले कर्मफल सुद्धा समयी प्रमाणे सरळ उभे राहून अनंत काळ कार्यक्रमाचा उद्देश उजळून निघावा, आपल्या ज्ञानाचा सकारात्मकता विचारांचा प्रकाश दुसऱ्याच्या मनाचा अंधार दूर करण्यास मदत व्हावी असाच काहीसा अध्यात्माचा ईश्वराचा विचार असावा.
आता सम+ई = आई सारखी असणारी ती समई. आई जशी आपल्या मुलांची देवाजवळ आपल्या मुलांना सुख आरोग्य मागत असते ,चिंता करत असते तसेच देवघरात जळणारी समयी रात्रंदिवस आपल्यासाठी शुभचिंतन करत असते, जसे देवाला आपण आई म्हणतो. जसे विठाई माऊली, ज्ञानोबा माऊली ,असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.
समईचे एवढे महत्त्व आहे की कन्येला विवाहात, कन्यादानात प्रामुख्याने समई दिली जाते. आई थोर तुझे उपकार या भावनेने समई ची पूजा केली जाते .(मुलगी कृतज्ञता व्यक्त करते)
तसेच निरंजन म्हणजे पंचमहाभूतं तत्वांनी युक्त असा स्थूलदेह निरांजनातील साजूक तूप म्हणजे देह, कापसाची वात म्हणजे कर्म हे तेजोमय झाले म्हणजे देव आणि भक्त यामध्ये प्रकाश पडतो. निरांजनातील ज्योत स्वतः जळून इतरांना प्रकाश देण्याचे कार्य करते, तसे आपल्या हातून परोपकार घडावे हे दर्शवते.
समई चे प्रकार तरी किती आहे, - चांदीची समई, पंचधातूची समई, इलेक्ट्रिक दिव्याची तांब्याची समई, शो च्या समई पण भरपूर असतात. 3,4 इंचा पासून ते 4 ते 6फुटा पर्यंत मिळतात .प्रत्येक समईचे एक वेगळे सौंदर्य असते .पाहिजे त्या आकारात आणि पाहिजे तशा मिळतात. प्रत्येक समईची कारागिरी कोरीव आणि सुरेख असते. समई लावल्यावर त्या उजेडात त्याचे रूप खूपच सुंदर दिसते. देवळात वरून झाकण असलेल्या खूप मोठ्या मोठ्या अशा असतात. त्यावर मोर , नाग, कमळ असे मधल्या दांड्या वर असते तर खाली स्टॅन्ड पण खूप प्रकारचे असते वरती फिरकी म्हणजे वात लावतात ते पाच किंवा सात ज्योतीचे असते. दुसरे म्हणजे केरळ, कर्नाटक , महाराष्ट्र ,अशा ठिकाणी वेगवेगळ्या समईची पद्धत असते त्या वजनावर मिळतात. आता खूप प्रकार निघाले आहे, कोणाकडे पारंपारिक असतात. कोणी नव्या घेतात. सत्यनारायणाच्या पुढे तर त्या दिवशी त्याच्या शिवाय शोभाच नसते. लहान-मोठ्या कार्यक्रमात सुद्धा तिला फुलांच्या माळा मोत्यांच्या माळा लावून हळदी-कुंकू वाहून (डेकोरेट) सजवतात पूजा करतात.
अशी ही समई सर्वांच्या जीवनाचा समतोल राखते तिला वारंवार नमस्कार (दिपज्योती नमोस्तुभ्यम् ) हा ज्ञानदीप सर्वांच्या मनात तेजत राहो. " ज्याप्रमाणे समाईच्या दांडा ताठ असतो व वरती ज्योतीच्या उजेड लख्ख शांत असतो. त्याप्रमाणे आपण आपल्या पाठीचा कणा ताट ठेवून व जीवनात ज्ञानाचा उजेड पडावा व सातत्याने चांगले कर्म करत स्नेहाचा दीप उजळत राहो ."हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अशी शिकवण समई कडून घ्यावी.
सुलहर 🖋️
Wow sunder varnan.
ReplyDeleteVery nice 👌👌Description. Amarnath Jangale.
ReplyDeleteखरच खुप सुंदर समई
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल असेच वाचत प्रेमी रहा 👍🏻😊
ReplyDeleteअरुण चौधरी जळगाव... समई ..निरांजन बद्दल चां ज्ञानप्रकाश पोहचला.खरोखर लेखन उत्तम आणि वास्तव वादी आहे.निरांजनची पवित्रता आणि दिव्याचे अखंड प्रकाश बहाल करण्याचे कार्य.त्यांचे प्रकार आता क्या पिढीला माहिती होणे गरजेचे आहे आपण ते उत्तम कार्य केले त्याबद्दल आपले अभिनंदन
ReplyDelete