जागतिक अन्न दिवस
सहर्ष सादर करत आहे" विचार मंथन"
🌷16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस🌷
अन्न हे पूर्णब्रह्म🙏
मागच्या आठवड्यात जागतिक अन्न दिवस होता,
हे समजले. त्याचे असे की आमची ज्येष्ठ नागरिक ग्रेसफुल लिविंग संघाची मीटिंग होती तर त्यात हा विषय होता. मला तसे पहिल्यांदाच कळले की हा पण एक दिवस साजरा होतो म्हणून!
प्रो. मॅनेजर दामले व शमा मॅडम यांनी खूप छान प्रोग्राम अरेंज केला होता. प्रश्न उत्तराची मालिका, व आपल्या आवडीचा पदार्थ कसा करतात किंवा त्याविषयी अनुभव विचारले आणि दुसरे मजेशीर म्हणजे आता तुमच्याजवळ जे पण खाण्याचे पदार्थ असतील त्यापासून ऍक्टिव्हिटीज करा म्हणून सांगितले. प्रत्येकाने खूप छान आपले आपले कौशल्य प्रदर्शित केले. दीड -दोन तासाचा कार्यक्रम खूप छान झाला. नवीन काहीतरी माहिती मिळाली. हा दिवस कसा आणि केव्हा साजरा करतात. म्हणून मी पण या विषयी काही अजून माहिती मिळवून ती माहिती आपल्याला पुढे सादर करावी असे वाटले. आपल्यातल्या काही लोकांना माहितच असेल किंवा नाही ज्यांना माहित नाही त्यांना पण कळावी म्हणून मी हे लिहिले. आपल्याला आवडल्यास जरूर शेअर करा लाईक करा .
16 ऑक्टोबर हा 'जागतिक अन्न दिवस' म्हणून पहिल्यांदा रोम (इटली )ह्या ठिकाणी संस्थेच्या मुख्यालयात केला. आपल्या देशात दर मिनिटाला कुपोषणामुळे दोन बळी जातात, भारतात बऱ्याच लोकांना कडे वाजवीपेक्षा जास्त असल्यामुळे खूप अन्न वाया जाते.
डॉक्टर रोमानीने सगळ्यात पहिले या दिवसाची विचार मांडला. याला ( A.F.O. ) ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन म्हणतात. कॅनडासिटी मध्ये 2016 ऑक्टोबरला स्थापना झाली. मुख्यालय (रोम) मध्ये .
मुख्य उद्देश :- अन्नाची नासाडी थांबवणे, सेंद्रिय शेतीला प्राधान्य आणि कृषी संघटनेची स्थापना. 1979 पासून (वर्ल्ड फुड ) ज्यांना अन्न मिळत नाही, खाण्याचे पदार्थ मिळत नाही त्यांच्या बद्दल जनजागृत करणे. आपण एक अशा जगात राहतो की काही नशीबवान लोक आपल्या इच्छेनुसार हवे ते अन्न हवे तितके हव्या त्या प्रमाणात हव्या त्या वेळी पोटभर खातत. तीन अब्ज लोकसंख्येच्या 40% लोक निरोगी आहार घेऊ शकत नाही , भारातसरकार कृषी धोरण अवलंबण्याची किती गरज आहे जेणेकरून अन्न उत्पादन वाढेल व याबद्दल जनजागृत आव्हाने निर्माण करावे या महत्त्वाचे काम या दिवशी करतात. 150 पेक्षा जास्त देशात हा दिवस साजरा करतात.
प्रथम 7 जून 2019 रोजी हा साजरा करण्यात आला जागतिक अन्न दिवस हे संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर 2018 मध्ये अन्न कृषी संघटनेच्या सहकार्याने स्वीकारले होते 90 नंतर भारताने खूप सकल प्रगती केली तरी पण भारतात तीस कोटी लोक कुपोषित, व उपाशी पण आहेत. साठ-पासष्ट नंतर तृणधान्य गहू तांदूळ , यांचेउत्पन्न वाढवले तृणधान्य फळ,भाजी खूप पिकवले भारतात आपण या गोष्टीवर दोन नंबर वर आहे. या कार्यक्रमासाठी साठी आंतरराष्ट्रीय निधी सुद्धा उभारला जातो. अनेक व्यवसायिक देश यात सामील होतात. त्यामुळे यावर नवनवीन व्यवसायाला चालना मिळते शाळा-कॉलेज खाजगी संस्था यामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. प्रदर्शन, स्पर्धा जनजागृतीसाठी मॅरेथॉन काढतात.
अशा कार्यक्रमातून विविध संदेश लोकांना मिळतात की अन्न वाया घालवू नका शिल्लक राहिले तर ते अशा प्रकारे साठवा जेणेकरून ते नंतर हवे तेव्हा वापरू शकाल. नेहमी आरोग्यदायी अन्नच निवडा शक्य असेल तेव्हा अन्न आणि साहित्याचे निवड करा.
बाहेरून आयात केलेले अन्न घेण्यापेक्षा स्थानिक लोकल अन्न खरेदी करा प्रक्रिया केलेले अन्न खाद्य पदार्थ टाळायचे कारण ते कमी पोषणयुक्त असतात .
हा दिवस दरवर्षी एका संकल्पनेने एखादी थीम धरून साजरा करतात 1920 मध्ये 'वाढवा, उपोषण करा, टिकवा, एकत्र या' आपली कृती हेच आपले भविष्य आहे. त्या आधीच्या वर्षी भूक मुक्ती , झिरो अंगर सकल जगण्याची संकल्पना होती .1916 मध्ये हवामान, बदलण्या बरोबर अन्न आणि शेती वर खूप परिणाम होतो. तेव्हा त्याच्या त्याच्यावर निरीक्षण करून त्याबद्दल किती आवशक्यता आहे या संकल्पनेला धरूनच कार्यक्रम राबवले होते. आणि यावर्षी म्हणजे 2021 मध्ये पण आपली कृती हेच आपले भविष्य आहे चांगले उत्पादन चांगले पोषण ,चांगले वातावरण ,आणि चांगले जीवन या संकल्पनेतूनच जागतिक अन्न दिवस साजरा केलेला आहे .या आधारित सगळ्यांना फूड हीरो म्हणजे अन्ननायक बनविण्याचे आव्हान केले जाणार आहे .म्हणजे काय? शेतातून आपल्या ताटा पर्यंत आपल्या जे शेतकरी धान्य ते कोणत्याही परिस्थितीत आपल्यापर्यंत पोहोचवतात.त्या साठी कामगार दुकानदार, कारखानदार, वाहतूकदार ,मोठ्या शिताफीने ,मेहनतीने काम करतात. म्हणून त्यांना (फुड हिरो) म्हणतात .त्याच प्रमाणे आपण सुद्धा कोणत्याही वयात (फुड हिरो) बनू शकतो .ते कसे बरे ?तर अधिक फळे भाज्या खाण्यापर्यंत ते अन्नाचा अपव्यय कमी करण्यापर्यंत. स्थानिक पातळीवर अन्न विकत घेण्यापासून घरच्या घरी अन्नधान्य पिकवण्या पर्यंत .कोणीही फुड हिरो बनण्याचा प्रयत्न करू शकतो . अशा प्रकारे (फुड डे) याचे उद्दिष्ट 2030 पर्यंत निरोगी आहाराला प्रोत्साहन देणे उपवासमारीची समस्या या जनजागरणातून जगातून कायमचे नष्ट करण्यात सर्वजण मदत करून या.
चला तर आपण यात खारीचा वाटा घेऊ या घरापासून सुरुवात करूया अन्न नासाडी होऊ नये म्हणून तेच अन्य कुपोषण बालकांना मिळावे म्हणून . मोठ्या मोठ्या शहरात स्थानिक लोक या वर काम करत आहे.
लग्नकार्यात छोट्या समारंभाच्या पार्टीत काही मोठ्या देवळांच्या अन्न गृहात छोटे छोटे फलक लावतात अन्नाची नासाडी करू नका जेवढे पोटाला लागते तेवढेच ताटात घ्या आणि उरलेल्या अन्न घेऊन गोर गरीब लोकांना वाटण्याची जबाबदारी घेतात .पुण्याला काही हॉटेलमध्ये तर ताटात उष्टे टाकले तर दंड ठोकत. काहीजण हॉटेलात जातात तीन लोक असले तरी जवळपास चार ,पाच लोक जेवतील एवढे पदार्थ मागवतात मग ते उरलेले अन्न तसेच पडून राहते ते फेकण्यात जाते. तर अशा वेळेस अशी एक विनंती आहे की त्यांना आपले उरलेले अन्न आपल्या सोबत पॅक करून घरी आणावे व घरी येऊन नवीन पदार्थ बनवा नाहीतर आपल्या कामवाल्याबाईला देऊन गरम करून घ्या म्हणजे अन्न वाया जाणार नाही. चला तर प्रत्येकाने असा विचार करुन पाऊल उचलले तर तो दिवस जवळ येईल की अन्न न मिळाल्याने 'कुपोषण' होण्यापासून बरेच गोरगरीब बालकं वाचू शकतील!
नवीन वर्षाचा नवीन संकल्प घ्यावा.
सुलहर🖋️
Very nice article 👍👍.Amarnath Jangale.
ReplyDeleteअप्रतिम लेख
ReplyDelete