गोपालकाला
सहर्ष सादर करत आहे" विचार मंथन"
🌷गोपाळ -काला🌷
श्रावण महिन्यातील सर्वांना आवडणारा व धामधुमीत साजरा होणारा हा एक सण म्हणजे कृष्णजन्म किंवा जन्माष्टमी म्हणतात. कृष्ण जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याचा उत्सव अगदी कृष्णाच्या जन्मापासून साजरा केला जातो.
आत्ताच परवा दहीहंडीची 'वर्गणी द्या, काकू' म्हणून मुलांचे मित्र वर्गणी मागायला आले. त्यावरून एक डोळ्यासमोर दहीहंडीचे चित्र समोर उभे राहिले मुलं सर्व मुलं एकत्र येऊन हा सण साजरा करतात हिंदू धर्मात व उत्सव आहे
दहीहंडी म्हणजे एक गल्लीमध्ये उंच बिल्डिंगला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाड दोर बांधतात व मध्यभागी एक लाल रंगाच्या छोट्या मातीचे हंडी त्यावर एक झाकण त्याला माळा लावून सजवतात. त्याच्या आतमध्ये दही- लाह्याखोबरं-पैसे इतरही काही टाकतात. ती रात्री फोडली जाते. दहा वाजल्यापासून सुरुवात करतात. चौकात चौकात जाऊन फोडतात. मुलांच्या अंगावर, बघणारे लोक गच्चीवरून गॅलरीतून अक्षरश: पाणी फेकतात. अत्यंत आनंदाने ओलेत्याने वर चढतात... पडतात... तरी तितक्याच उत्साहाने वर चढतात आणि दहीहंडी फोडायचे लक्ष साधतात. मुलांमध्ये ती एक प्रकारची धुंदच असते.
श्रावण महिन्याचे सर्व सण करताना हे वर्ष कसे जाते हे कळतसुद्धा नाही .भारतीय संस्कृतीने गुणांचा गौरव केला आहे त्यात कोणत्याच प्रकारचा भेद ठेवलेला नाही पशुपक्षी, प्राणी वृक्ष ,यांच्या गुणांचा सुद्धा गौरव करून त्यांना सन्मानित केले आहे .यामध्ये महिलांचा जास्त सहभाग असतो परंतु गोकुळाष्टमी दहीहंडी हा मुलांचा जास्त आवडता उत्सव आहे. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाला विष्णूचा अवतार सुद्धा समजतात. कृष्ण भारतीयाचे आवडते दैवत आहे मथुरा पूरी, गोवर्धन, वृंदावन बनारस, या ठिकाणी जन्माष्टमीच्या उत्सव खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष बघावयास मिळतो. सर्वच लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात. कृष्ण मंदिराबरोबरच विष्णूच्या मंदीरातही हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळी पूजा, प्रवचन, भजन, कीर्तन ,अशा विविध कार्यक्रम करतात नवमीला 'गोविंदा आला रे... आला', म्हणत दहीहंड्या फोडल्या जातात .दहीहंडी तर खूपच सुंदर सण आहे. त्यामध्ये मुलांना गोल फेर करून एकावर एक असे एकमेकांच्या खांद्यावरती चढवले जाते. सर्वात शेवटी एकच मुलगा असतो तो, ती दहीहंडी फोडतो. ते थर कधी कधी सात -आठ -दहा असे पण असतात. उंच दहीहंडी बांधली जाते.फोडण्याची शर्यत लागते. दहीहंडीच्या दिवशी जो दहीहंडी फोडतो, त्याला बक्षीस ठेवलेली असतात. मुंबईला तर हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो .दहीहंडी बघायला ज्याप्रमाणे गणपती बघायला जातो तसे दहीहंडी प्रत्येक चौका-चौकात फोडली जाते. मोठमोठे मंडळसुद्धा आहे यामध्ये आता मुलीसुद्धा सहभाग घेतात. त्यांच्या पण शर्यती लागलेल्या असतात. त्यांना बक्षीस मिळतात. त्यांचे वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस घालून 'गोविंदा गोविंदा आला रे ... आला' म्हणून गाणे म्हणत फोडायला जातात. फोडताना खूप जणांना दुखापत पण होते. दहीहंडीच्या आत दही- साखर- खोबरे अशा वस्तू टाकल्या जातात. ते फोडले की सर्वजण त्याच्यातली दही अंगावर पडले तरी चाटून खातात. त्याच्यात एक विशेष म्हणजे त्या दहीहंडीच्या खापऱ्या जुने लोक घरी घेऊन जातात, त्याला स्वच्छ धुऊन वाळवतात. आणि आपल्या वर्षाच्या सठवणीच्या धान्यांमध्ये प्रसाद म्हणून सांभाळून ठेवतात. ज्यानंच्याकडे गायीचा गोठा असतो, त्या गाईच्या गोठ्यात खापऱ्या पुरून ठेवल्या जातात. त्यामुळे गाय जास्त दूध देते अशी समजूत आहे.
कृष्ण गोकुळात दह्या-दुधाने वाढला गोरगरीब लोकांच्या व सवंगड्यांच्या बरोबर खेळला. सुदामाचे पोहे आवडीने खाल्ले म्हणून नवमीला पोह्यांचा प्रसाद वाटला जातो. त्यावेळेस प्रत्येक मुलं आपापल्या घरून लोणचे, कोणी साळीच्या लाह्या, कोणी मुरमुरे कोणी दही-पोहे, मुरमुरे असे बरेच प्रकार एकत्र करून ते कालवतात म्हणून त्याला 'गोपाळ -काला' म्हणतात .त्याची टेस्ट कधीही विसरू शकत नाही अतिशय सुंदर चव लागते. मुलं दहीहंडी फोडल्यावर सगळ्यांच्या घरोघरी चौकाचौकात प्रसाद वाटतात. तो प्रसाद म्हणजे खाण्यासारखा असतो. वाजतगाजत मिरवणूक काढतात. भगवद्गीतेत हे जीवनाचे सार आहे पाच हजार वर्षे होऊन गेली तरी सुद्धा श्रीकृष्णाला कोणीही विसरू शकत नाही. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा श्रीकृष्णाची आठवण जरूर होते! दुर्जनांचा नाश सज्जनांचे रक्षण व मानवधर्माची स्थापना करणाऱ्या या भगवंतांना लोक मनोभावे नतमस्तक होतात. श्रीकृष्ण हा देव लहानमोठ्यांचा सर्वांचा लाडका आहे त्याच्या जीवनाच्या खूप कथा गोष्टीरूपात आहेत. छोट्या मुलांना त्यादिवशी लहान बाळांपासून पाच वर्षापर्यंत कृष्णाचे ड्रेस घालून सजवतात. फोटो काढतात मोराचे पीस लावता बासरी देतात खूपच सुंदर दिसतात. लहान मुलं खरंच कृष्णासारखे दिसायला लागतात .
सर्वजण अगदी कृष्णमय होऊन जातात; अशा या कृष्णाला साष्टांग दंडवत!
जय श्री कृष्ण!!
सुलहर🖋️
Nice description 👌.Amarnath Jangale. 👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद जंगले दादा 🙏
ReplyDelete