पडदे


सहर्ष सादर करत आहे" विचार मंथन"

🌷झीर्मिरी चिकाचे पडदे🌷

पडदे या शब्दा मागेच किती राज दडलेले आहे हा पडदा तसा पारंपारिक राजेरजवाडे पासून प्रचलित आहे पूर्वी महिलांना पुरुषांसमोर येण्याची अनुमती नव्हती. तेव्हा घरात चिकाचे बारीक काड्यांचे चे पडदे लावलेले असायचे त्यामागून त्या महिला संभाषण करत असंत पण तसा तो श्रीमंतांकडे जास्त बघायला मिळायचा श्रीमंती थाटच तो. 
आज-काल खिडकी आणि दरवाजाला खूप वेगवेगळ्या कपड्यात आणि डिझाईन मध्ये पडदे शिवून मिळतात. सर्व साधारण मध्यमवर्गातल्या कुटुंबाकडे हे नाटक नव्हते सदा सर्वकाळ दार सत्ताड तिन्ही त्रिकाळ उघडे असायचे. कोणी केव्हा या त्यामुळे कळत नक भळत एक फायदाच होत होता .तो म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश घरात यायचा ,लाईट लावायची गरज नसायची कोणी पडदा लावला तर तू कधीपासून पडल्यात राहिला लागली असा टोमणा द्यायचे .त्यावेळी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस लाईट लागायचे पण आता सध्या परिस्थिती चेंज झाली आहे . कारण घर लहान लहान आणि घरात कोणी नाही विभक्त कुटुंब आणि संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर लाईट लागतील .वडीलधारी माणसं घरात नसल्यामुळे हा प्रॉब्लेम असतो .
पडदे लावणे एक फॅशन झाली आहे किती आणि काय प्रकार असतात . उन्हाळ्याचे वगैरे डबल पडदा लावतात खास .त्याचे मोठे मोठे शोरूम असतात पण मला वाटते या पडद्याने सर्वांच्या मनाच्या नात्यावर चा पडदा जरूर सरकला आहे .कोणाच्या मनाच्या पडद्याआड काय घालमेल आहे हे कुणाला डोकावून बघण्याची फुरसत नाही मनाचे दार बंद, घराला  दाराला सतत पडदा असल्यामुळे सहसा कोणी मना च्या घरात या घरात जायचे धाडस करत नाही. घरात सूर्यप्रकाश अजिबात येत नाही त्यामुळे डोक्यात प्रकाश पडत नाही .घराघरात फक्त लाईट चालतो एसी. एक मात्र  डोळ्याचे पडदे सतत उघडे असतात. तेही कॉम्प्युटर ,मोबाईल, लॅपटॉप , डोळ्यावर त्यांची जवळीक असते नात्यातील माणसे दूर होत आहे ह्या डोळ्यावरच्या पडद्यामुळे ,मनामनात अंतर ठेवून वागतात . पण घरातील पसारा, मनातील उलघाल,या वर जर पडदा घातला तर सर्व झाकले जाते. 
तसे हवेची झुळूक, सूर्यप्रकाश, नेहमी आपल्या मनाचा पडदा सरकवून आत पडद्यातून डोकावत असतो.आत येण्यासाठी प्रयत्न करत असतो .पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व त्याचे पासून दूरच राहतो निसर्ग ही अनेक खिडक्या उघडतो . पण फक्त आपल्या मनाचे पडदे थोड्या बाजूला सारला तर मनामध्ये आनंदाची पावसाची सर जरूर पडेल आणि मनामध्ये मातीचा ओलावा निर्माण होऊन त्या पडद्या तला अंतर संपेल. आणि लख्ख प्रकाश पडेल असं मला वाटतं....

Comments

  1. Very nice 👌👌Information. Amarnath Jangale.

    ReplyDelete
  2. परदेमे रहने दो...गाण्याची आठवण झाली तुमच्या लिखित वाचनाने.लिखाण मनाला भावणारे आणि सौंदर्याला साजेशे आहे.डोळ्याच्या पड द्याच्या म्हणजे झा पड्या ..मनाचे पडदे म्हणजे अंतरंगाचा ठावा ..सर्व काही वैचारिक अन मस्त आहे..लिखाणाबद्दल शुभेच्छा...अरुण चौधरी

    ReplyDelete
  3. चौधरी सर 🙏नेहमीप्रमाणेच खूप सुंदर अभिप्राय दिला की लेखनाचे पूर्ण सार त्याच्यात येऊन गेल 👏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"