झोपाळा

सहर्ष सादर करत आहे 
* विचार मंथन*

                   🌷" झोपाळा"🌷
आपले आयुष्य हे साधारण झोपाळा  सारखे हेलकावे खात कधी मागे कधी पुढे दुःख तर कधी सुख: मागे ! बंगळी पण  म्हणतात ,त्याला जेव्हा नवीन घर किंवा बंगला बांधतात तेव्हा इतक्या हौसेने यांची खरेदी करतात. याचे पण किती प्रकार असतात. लाकडी, सागाची, स्टीलची, लोखंडाची एक नाही अनेक प्रकार व रंगीबेरंगी सारंगखेडा गावाचे लाकडी बंगळी, पाळणे ,खूप प्रसिद्ध  आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि ऐपतीप्रमाणे घेतात. तो कुठे ठेवायचा कुठे बांधायचा याची प्रत्येकाची विशेष जागा ठरलेली असते. कोणी गच्चीत, तर कोणी बाल्कनीत, अंगणात, हॉलमध्ये. त्याला विशेष म्हणजे त्याच्या कड्या खूप वेगवेगळ्या  धातूच्या आकाराच्या आणि प्रकाराच्या मिळतात. त्याच्याने तर बंगळीची  शोभा अजून वाढते. एक साखळी सारखी सरळ असते , काही कड्या,कड्या एकत्र असतात. विशेष म्हणजे पितळेच्या छोट्या छोट्या भावल्या, राधाकृष्ण, छोटे छोटे पक्षी चिमणी काही मुर्त्या बनवून एकत्र करून पूर्ण साखळी बनवतात. खूप सुंदर वाटते ते. हौसेला मोल नसते म्हणतात तेच खरे हे ,पितळी पांचाळ तांबट  कडून करून घेतात. 
जेव्हा माणूस रिटायर होतो तेव्हा तो अगदी आरामशीर एक घटकाभर बसतो, तेव्हा तो  विचार  करत भविष्याच्या काही आठवणी आठवतो, तेव्हा  तो झोका मागे जातो तेव्हा भूतकाळात जातो जेव्हा झोका पुढे जातो तेव्हा तो भविष्यकाळ आठवतो. आणि स्थिर राहतो तेव्हा वर्तमानकाळ बघतो .तसे बंगळी कधीच स्थिर राहत नाही. नेहमी हलत राहते व विशिष्ट आवाज येतो आपल्या मना सारखेच डोलते. कधी हा विचार कधी तो विचार तर कधी जून्या आठवनी, पण बंगळी म्हणजे घराचे सौंदर्य च असते खूप प्रशस्त वाटते ती जागा.
बंगला बघितला की त्यांचेकडे कसा छान झुला बांधलेला आहे असे सांगतो आपण, आता तर खूप छान तयार मिळतात. वरती छत् झालर लावलेलं शेड सुद्धा असते त्याला. कधी गोल कधी चौरस कधी सोप्या सारखा  आडवा  घ्याल तसे जागे अभावी जसे ज्याला सोयीस्कर तसे तो ऍडजेस्ट करून लावतात . पांढऱ्या दोरीचे पण मिळतात, खुर्ची टाईप पण मिळतात , जाळीचा पण असतो बाहेर बागेत आडवे या टोकापासून त्या टोकापर्यंत बांधता येतो  खूप प्रकार असतात.

खेडेगावात झाडाला दोरीचे झोके बांधतात. अक्षयतृतीयेला मुलींनकरता खास माहेरी आल्यावर माहेरवाशीण मुलींसाठी खास बांधले जातात. उंच माझा झोका त्यात बसून आखाजीचे गाणे म्हणतात, खूप मज्जा येते. पारंपारिक सण झोक्यावर झोके घेऊन साजरा करतात. तो जितका उंच जाईल तेवढी मजा पैज लावतात तुझा झोका वर का माझा  वर असा झोका बघितला तर मनात डोलायला लागते त्याच्यासारखे झुलायला लागते.  तसेच बाळाला सुद्धा झोक्यात खूप आरामशीर झोप लागते .काही मुलं तर त्याच्या शिवाय झोपत च नाही . सोबत मायेची आई ची अंगाई गीत  ऐकल्यावर झोपतो .

आपल्या जीवनाचा पण विचारांचा असा झोका मनात सतत चालू असतो. जुने लोक कोणी मुलींनी काम केले नाही तर तिला म्हणायचे तिला बंगळी बांधा काम नको तिला डोहाळे लागले तिला, असे म्हणून वाक्प्रचार आहे. डोहाळे जेवणाच्या दिवशी तर याच खास  महत्त्व असते वेगवेगळ्या पद्धतीने सजवतात. वेगवेगळ्या रंगीबेरंगी  फुलांनी सजवून त्याचे शोभा वाढवता तसेच बारशाला पण पाळणा, झोका , खूप सजवतात तो स्टॅन्ड चा पण असतो उंच बांधलेला झोका, कोणा कडे पिढीजात सुबक सुंदर नक्षी चा लाकडी पाळणा असतो. त्याला खालून छोट्या छोट्या घंट्या लावलेल्या असतात .
 तसेच भगवान श्रीकृष्णाच्या पण झोपाळा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकाराने मिळतो आणि सर्वजण खूप हौशीने गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्णाला पाळण्यात घालतात. त्याला रेशमाची दोरी लावतात.

सुंदर गोजिर्‍या बाळासाठी पाळणा सजवला जातो, किती महत्त्वाचे आहे आपल्या जीवनात झोपाळ्या चे स्थान. “दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे” असे कितीतरी सुंदर सुंदर गाणी आहे.

 असा आहे हा झोपाळा जगप्रसिद्ध सर्वांचा आवडता आणि सर्वांनी अनुभवलेला.

                                      सुलहर🖋️

Comments

  1. Very nice 👌👌article. Amarnath Jangale.

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद 🙏
    असेच आनंदाने अभिप्राय दिल्याने
    खूप प्रोत्साहन मिळते 👍🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"