जागतिक सायकल दिन🚲
सुलहर सहर्ष सादर करत आहे "विचार मंथन"
🌷 जागतिक सायकल दिन🌷
आज सहज कंपाउंडमध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकलवर नजर गेली, तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकलची किंमत अन् मजा यांची सर नाही. घरात आल्यावर रेडिओवर तेच ऐकू आले. आज म्हणजे मागच्याच आठवड्यात 3/6/21जागतिक सायकल दिनानिमित्त म्हणून मला पण लिहिण्याचा उत्साह आला.
पूर्वी सायकल ज्याच्याकडे आहे, त्या मुलांना श्रीमंत म्हणायचे. मध्यमवर्गीय लोकांकडे घरात दहा लोक. सायकल एकच! जो बाहेरचे सर्व काम करायचा ऑफिस बाजारहाट. एक विशेष म्हणजे पूर्वी लग्नामध्ये हुंड्यासोबत जावयाला सायकल, रेडिओ देण्याची पद्धत होती. ती पण ॲटलास कंपनीची हवी. देणारा पण श्रीमंत व घेणारा पण श्रीमंत असायचा. त्यावेळेस लग्नात नाव पण घ्यायचे "सोन्याची सायकल चांदीची चांदीची सीट चल चल राणी डबल सीट" 😀नंतर टू व्हीलर वर आला. नवरदेव मग फोर व्हीलर वर! असो... आम्ही लहान होतो त्यावेळेसची गंमत. 'सायकल शिकणे', म्हणजे एक चढाओढ असायची. कधी मित्रांची घेऊन तर दहा पैसे देऊन तासाने भाड्याने मिळायची. नंतर चार आणे झाली. त्याची किंमत तेव्हा अर्धा तास, एक तास. रोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर चालवायची किंवा दर रविवारी असे मित्र, किंवा वडील, भाऊ, बहीण सोबत घ्यायचे व त्यांना मागे सायकल पकडून ठेवायला सांगायची. ते बिचारे आपल्या मागे धावायचे. आपण पडायला नको म्हणून ,पाहिले तर एवढी मोठी वडिलांची सायकल असायची. छोटी सायकल भाड्याने मिळायची. ती पकडायला शिकवायचे मग बॅलन्स करून हाफ पायडल मारायचे, मग कैची मग पुढे फुल पायडल मारून चालवायची! साधारण तिसरी, चौथीत गेले की सायकल शिकायचे. शिकतांना एकदा तरी जोरदार गुडघ्यावर पडलेच पाहिजे, त्याशिवाय सायकल येत नाही म्हणायचे! शिवाय पडल्यावर घरी सांगायचे पण नाही, कारण परत सायकल हातात मिळणार नाही, चालवायला म्हणून! मुलींना तरी शिकूच द्यायचे नाहीत. चोरून शिकायचे. नंतर लेडीज सायकल निघाली. पण तीपण श्रीमंताच्या मुलींजवळ असायची. त्यावेळेस पाचशे रुपये सायकलची किंमत होती. सेकंड हॅन्ड दोनशे तीनशे रूपये होती. ज्याच्याजवळ होती त्याची किंमत फोर व्हीलर पेक्षा काही कमी नव्हती . कामगार लोक आपला डबा हँडलला लावला , टांग टाकली पोहोचले कामावर. सुट्टीच्या दिवशी बायकोला कॅरीयरवर, मुलं पुढे दांडीवर! अगदी लहान मुलं असतील तर त्याला बसायला पुढे एक जाळीची बास्केट मिळायची, मग त्याची दांडीयात्रा निघायची बाहेर फिरायला . सणावाराला त्याची पूजा करायचे. खूप मान होता तर सायकलीचा! त्यावेळी वाटायचे आपल्याकडे 'फोर व्हीलर', 'टू व्हीलर' पाहिजे. आता प्रत्येकाकडे 'फोरव्हीलर', 'टू व्हीलर' आहे तर ते लोक व्यायामासाठी सायकल विकत घेतात. किती विपरीत 😂 तिची मजा काही औरच आहे . पण आता त्याचे रंगरूप बदलले आहे. लहान मुलांच्या तर खूप रंगीबेरंगी छान छान सायकली मिळतात. आता मागे जायची गरज नाही. भाड्याने आणायची गरज नाही. कौतुकाने हौस म्हणून विकत घेतात. अगदी एक हजारा पासून ते पाच हजारापर्यंत. अजून थोडे मोठे झाले की 'बॅलन्स व्हील'ची सायकल येते. दोघे बाजूला दोन छोटे छोटे चाक असतात. मुलं ते सहज चालवू शकतात. पडत नाहीत. शाळा ,कॉलेजला केले कि, 'गिअरची सायकल रेस सायकल' असे अनेक प्रकार आहेत.आता सायकलीचे ग्रुप सुद्धा बनले आहेत. मोठे वेगवेगळे जागतिक उपक्रम राबवतात. पहिले दहावी बारावी पास झाले की चांगले नंबर आले तर गिफ्ट म्हणून 'सायकल घेऊन देऊ' असे वडील सांगायचे. त्यांच्याकडे सायकल नसायची पण मुलासाठी ते सायकल नक्की घ्यायचे. सायकलापण खूप सजवायचे. घंटी असणे जरुरी. ती वाजवण्यात खूप मज्जा यायची. हँडलला तुरे, मागे नाव चाकांना मणी वगैरे लावलेले. प्रत्येक पिक्चरमध्ये सुद्धा हिरो हिरोईनचे एक तरी गाणे असायचे, पुढे दांड्यावर हिरोईन, मध्ये सीटवर हिरो आणि मागे कॅरी असे. ती कोणत्याही वयात शिकू शकतो. इंग्रजांच्या काळात यांचा अविष्कार झाला होता, त्यावेळी त्याला चेन नव्हती म्हणे. नंतर हळूहळू सुधारणा झाली आता तर त्याला एक मशीन मिळते ते बसवले तर लूना सारखी धावते .सायकलवर डबलसीट बसण्याची मजाच वेगळी. सर्कसीतसुद्धा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून दाखवत होते. शहरात आता जागोजागी ऑनलाइन सायकलचे स्टँड झाले आहेत. ऑनलाईन बुकींग करून तासाने सायकल मिळते. प्रत्येक दोन-तीन किलोमीटर अंतरावर ठेवलेले असतात. पांढऱ्या रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या लेडीज जेन्ट्स दोघेही प्रकारच्या आहेत. किती प्रगती झाली आहे आपल्या देशात! तसे पाहिले तर सायकल हे सर्वसामान्य लोकांचे वाहन आहे असे मानले जात असले, तरी सध्या जगभरात एकंदरीत श्रीमंतांमध्ये सायकलींची जास्त प्रमाणात आवड निर्माण झाली आहे. सायकल एक सुख वस्तू मानतात .चालवण्याचे प्रमाणही अधिक वाढले आहे मुख्य कारण त्या मुळे होणारे शारीरिक-मानसिक फायदे. पर्यावरणाच्या दृष्टीने तर सायकल एकमेव अशी कमी खर्चाचे वाहन आहे झिरो टक्के प्रदूषण करते. करोना काळात तर याचे महत्त्व अधिकच वाढले. आजही देशात सार्वजनिक वाहतुकीला कार मोठे मोठे वाहन रस्त्यावर प्रतिबंधित होते तरी सायकल मात्र उत्तेजनार्थ सर्वात पहिला नंबर क्रमांकाने पुढे बिनधास्त चालत होती. भारत सरकारही त्याला अपवाद नाही. मोठ मोठे प्रतिष्ठित लोकांमुळे त्याला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. हे आता गरिबी हटवून श्रीमंतांपर्यंत एक सुटसुटीत फिट ठेवणारे वाहन झाले आहे. सहज-सोपे पार्किंगची चिंता नाही ही सायकल तब्बल दोनशे वर्षांपासून प्रचलित आहे पण सध्या त्याला सुगीचे दिवस आले आहेत. याचे फायदे पाहूनच संयुक्त राष्ट्र संघाने एप्रिल 2018 .रोजी हा आंतरराष्ट्रीय सायकल दिवस म्हणून घोषित केला होता. आरोग्याविषयी याचे जास्त महत्त्व म्हणजे ही नियमित चालवल्यामुळे तुमचे हृदय मजबूत होते शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद वाढते यांची गतिशील ता वाढते मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते मुख्य शरीरातील चरबी कमी होते शरीर सुदृढ बनवते तुम्हाला शारीरिक क्षमतेने श्रीमंत बनवते याचे महत्त्व आता तरी सर्वांना कळलेच आहे. पण ही एके काळी गरीबाचे वाहन सायकल तिचे महत्त्व एवढे वाढेल हे कोणालाच लक्षात आले नव्हते.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या पेट्रोल च्या किमतीला आग लागलेली आहे. तर सायकल वापरली तर आपल्याला ना पेट्रोल भरायची चिंता फक्त हवा भरायची आणि पायडल मारायचं आणि पाहिजे तिथे गतीने फिरायचे. मॉर्निंग वॉक करा, ट्रेकिंग करा, पहाडावर जा, डोंगरावर जा. कुठेही जा. कुठेही त्याला अडथळा नाही आणि पार्किंगची तर चिंताच नाही.
गेले ते दिवस...
राहिल्या त्या आठवणी......
असा काळ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी उपभोगला असेल .
अशा हा या सायकलीला व सायकल चालकाला विनम्र आव्हान!
काळ वेळेची गरज आणि भूतकालीन स्मृतींना उजाळा देणारा सायकली बद्दलचा तुमचा लेख वाचण्यात आला.आमच्याही स्मृती जागृत झाल्यात.वास्तव तिक्तेची जाणीव लेखतींघडते.उत्तम लेखनाबद्दल अभिनंदन..
ReplyDeleteप्रा. अरूण चौधरी
खूप खूप धन्यवाद आपण एवढ्या आवडीने आणि सवडीने लेख वाचला त्याबद्दल 🙏👍🏻
Deleteलेख खूप छान आहे👌👌🙏🙏
ReplyDeleteसायकलची अजून एक गम्मत अशी कि ज्या वेळेस किराणा घेऊन येत असत त्या वेळेस हॅण्डलला किराणा पिशव्या आणि डबल सीट बसलेली व्यक्ती कधी ट्रॅफिक मध्ये उतरून जायची ते कळायचेच नाही.कधी तरी लक्षात यायचे कि आपल्या मागच्या सीट वर कोणीच नाही ये मग शोधा शोध 😆😆 . लहानपण आठवले. बाबाची सायकल गुपचूप काढून राऊंड मारून यायचो.
मंगला 👍🏻
Deleteतुझा अभिप्राय नेहमीच छान राहतो पूर्वी खरच ना मुलीना चोरून सायकल चालवावी लागायची घरी ओरडा बसायचा पण मजा यायची सायकल चालवण्यात😀🙋
सायकल.... लिला ताई तुमचं सायकल चा लेख वाचला अतिशय उत्तम आहे.सायकल ही जीवनोपयोगी असून आज व्यायामासाठी तिची गरज आहे.गरीब व श्रीमंत सर्वांचे मनोबल वाढते.चारचौघात प्रतिष्ठा लाभलेल्या सायकल लेखन बद्दल तुमचे मनस्वी अभिनंदन..अर्चना चौधरी
ReplyDelete🙏 अर्चना ताई आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण माझा लेख वाचतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Deleteवासुदेव सोनार
ReplyDeleteपूर्वी चे सायकल चे दिवस आठवले खूप खूप मजा यायची.त्यावेळी सायकल ला लायसन्स घ्यावे लागत नव्हते
आज श्रीमंत व्यक्ति आपले शरीर निट राहण्यासाठी सायकल विकत घेताएत.
मस्त झाला लेख👍👌
खूप खूप धन्यवाद लेख वाचू न
ReplyDeleteरिप्लाय दिल्याबद्दल 👍🏻
मुग्धा
ReplyDeleteमावश,तुझे लेख वाचले कि, मन नेहमी च कुलकर्णी प्लॉट मध्ये एक चक्कर मारून येते. छान वाटते, आठवणींना उजाळा द्यायला....
छान माहिती मिळाली......असेच लिहीत रहा.......खूप खूप शुभेच्छा.😊💐🙏
मुग्धा
ReplyDeleteतू नेहमी माझे लेख आवडीनेआणि सवडीने वाचतेस खूप खूप धन्यवाद 🌷
लेख सुंदर लिहिला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
ReplyDeleteरेखाताई खोले
ReplyDeleteखूप छान.नाविन्यपूर्ण विषय आणि आशयपूर्ण लेखन.👍👌👌
पुरंदरे वहिनी
ReplyDeleteखुप छान वर्णन केले सायकल चालवत असताना पडलो होतो त्या खुणा अजुन असतील कारण एकदा का सायकल चालवायला आली की रेस लावायची 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻लीला मँडम धन्यवाद लेख नेहमीप्रमाणेच उत्तम 💐💐
वहिनी तुम्ही खूप आवडीने आणि सवडीने लेख वाचतात आणि अभिप्राय सुद्धा आठवणीने देतात धन्यवाद 👍🏻
ReplyDeleteशोभा वानखेडे
ReplyDeleteपरत. एकदा जुन्या आठवणी ना उजाळा लिला ताई 🙏, छान च सायकली चे दिवसांच्या आठवणी सुंदर लेख 🙏🙏
खूप खूप धन्यवाद शोभा
ReplyDeleteजुन्या आठवणी ताज्या झाल्या छान वाटले ऐकून 👍🏻