" शब्दगंध"

'सुलहर ' सहर्ष सादर करित आहे "विचारमंथन" -

🌹मनसोक्त🌹
वा ! काय छान शब्द आहे हा मनसोक्त ! खरंच प्रत्येक गोष्टीचा आनंद मिळतो किंवा अनुभवतो तोच हा शब्द …!तृप्ती देणारा - निर्धास्त ! मला खूप जण म्हणतात की तुम्ही किती निर्धास्त आहात आणि मनसोक्त जीवन जगतात. तर मी त्यांना सांगते की आज मी जे आयुष्य जगत आहे ते खरंच निर्धास्त आहे, कारण मला कोणाची जबाबदारी नाही आणि हे मला माझ्या मुलांनी शिकवले आहे. जोपर्यंत मुलं माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तर अजिबात काळजी नाही. माझी दोन मुलं आणि दोन सुना व जोडीला नातवंड हे माझे आधारस्तंभ आहेत. उदाहरणार्थ मी ट्रीप ला जाते किंवा काही उपक्रम करते, काही निर्णय घेते, अशावेळी ते माझ्या सोबत असतात. ते सोबत आहेत म्हणून मी ट्रिप व इतर भटकंती करते. दैनंदिनी जीवनात मनसोक्त जगू शकते आणि आनंद घेते. दुःख तर आयुष्यभर असते पण आनंदाचे क्षण सुद्धा आनंदाने उपभोगायचे असतात. (काही नाखूश व्यक्तींनाही पचत नाही). आता मागे वळून पाहिले तर वयाच्या पंचविसाव्या वर्षात मी संसार क्षेत्रात एकटी झाले. पण माझी आई सोबत होती. सोबत दोन मुलं. त्या दिवसापासून तर आई गेल्यापर्यंत, आईचा प्रेमळ स्वभाव व भक्कम आधार तिने दिला व माझी वाटचाल चालू झाली मी फक्त चालत राहिली. आता जेव्हा कोणी म्हणते की तुम्ही भाऊ, बहिणी, मुलं यांना किती सांभाळले आणि सक्षम बनवले तर त्याचे कारण असे की मी यांना माझी जबाबदारी आहे असे कधी बघितलेच नाही. फक्त कार्य करत गेले. आता जरूर वाटते की ही माझी जबाबदारी मी पार पाडली. त्यांनीही माझी सोबत सोडली नाही. मी त्यांची होउन राहिले पण हे करताना पैसा आणि वेळ यांची सांगड कशी केली हे माझे मलाच माहिती. याचे आता आश्चर्य वाटते कारण माझ्याकडे माझा पैसा असा काहीच नव्हता. प्रत्येकाचे प्रत्येक वेळी योग्य तेवढ्या प्रयत्नाने शिक्षण, लग्न, कौतुकाने जबाबदारी पार पाडली एवढे मात्र खरे. पण तेव्हा मला किती जमवाजमव करावी लागली व कशी हे कोणालाही माहित नाही . तरीसुद्धा उसने पैसे घेतले , लोन काढले पण कधीही कमी पडू दिले नाही. तीन आकडी पगार पासून पाच आकडी पगार झाला! पण कधी पैसा नाही म्हणून रडले नाही. फक्त "आज" चांगला घडवायचा म्हणुन प्रत्येक अडचणीला तोंड दिले आणि प्रत्येक गोष्टी आनंदाने सर्वांना दिल्या व मनाने सगळ्यांनमध्ये मनसोक्त रमले. समाजात पण समरस झाले. खूप आनंद आणि आशीर्वाद मिळाला . मनसोक्त सर्वांनी मला प्रेम व वात्सल्य दिले आणि आता मी असे म्हणेन की काही ठराविक वेळेपर्यंत जसे मुलांना आईची व वडिलांची अत्यंत गरज असते तसेच काही ठराविक वयात आईलाही मुलांची अत्यंत आवश्यकता लागतेच. मुलांसाठी मी कधीही कुठेही कमी पडले नाही. 

कालाय तस्मै नमः

🖋 सुलहर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"