स्वप्न
'सुलहर ' सहर्ष सादर करित आहे "विचारमंथन" -जीवनातील स्वप्न 🌈👍
स्वप्न जरुर बघावी, स्वप्न सर्वांचीच असतात. कुणाची अचानक तर कोणाची कष्ट करून तर कोणाची कोणाच्या मदतीने पूर्ण होतात तर कोणाची स्वप्न स्वप्नच राहतात.
आपण कोणती ही गोष्ट करतो तेव्हा आधी त्याचे स्वप्नच बघतो. रोज रोज बघतो मग ती अमलात आणण्यासाठी त्याची क्रिया सुरू होते. म्हणून कोणतीही गोष्ट करण्याआधी स्वप्न जरूर बघावे लागते ते लगेच होत नसते.
स्वप्न हे एक अद्भुत रहस्यमय जग आहे. गुहे सारखे क्षणात काळोख - क्षणात प्रकाश. यात आपण कोणतेही रूप कोणतेही दृश्य बघतो आणि स्वप्न कधीही कोणीही अनुभवू शकतो. अगदी बाल, वृद्ध, गरीब-श्रीमंत. काळाचे बंधन नाही. स्वप्नात काहीही दिसते. तरुण, दुष्ट, सज्जन, वस्तू, निसर्ग, भयानक आक्राळ-विक्राळ रूप, परीकथा. कधीकधी उंच कडे वर पोहोचलो, वरून खाली नदीत पडलो, तर कधी नुसता काळोख. स्वप्न हे आपापल्या कुठेही घेऊन जाते. स्वप्नात स्वप्नातल्या गावाला जाण्यासाठी तिकीट लागत नाही , क्षणाचा विलंब होत नाही, आणि आपण कुठेही पोहोचतो कोणत्याही क्षणाला. पण हे खरे की खोटे ? हे ज्याचे त्याचे अनुभव असतात व आपले मनाचे खेळ पण होऊ शकतात. तर कधीकधी येणारा काळ ठरवतो आपल्याला पडलेले स्वप्न खरे की खोटे. स्वप्न कधी फक्त आपला भास असू शकतात किंवा डोक्यातील विचारांची गर्दी पण असू शकतात.
कधी कधी वारंवार पडणाऱ्या चांगल्या स्वप्नावर विचार करून अमलात आणले तर निश्चितच प्रयत्न करून प्रत्यक्ष होऊ शकतात. त्याच्यासाठी कधी कोणी ब्राह्मणाला सुद्धा विचारतात की, "मला असं स्वप्न पडलं याचा अर्थ काय ?". त्याच्याशी संदर्भ लावून कधी कधी ब्राह्मण सांगतात बरोबर, त्याला फक्त आपल्या विचारांची निश्चित मत हवे असते ! नाहीतर स्वप्न हे स्वप्नच राहतात - कधीही पुरे न होणारे. स्वप्न ही पाण्याच्या धबधब्या सारखी असतात किंवा नदीच्या प्रवाह सारखी धो-धो वाहणारी, तर कधी सतत संथ वाहणारी नदी तिचा मार्ग शोधतच राहते. पण आपल्याला काही निश्चित असे काम करायचे असेल किंवा काही ध्येय गाठायचे असेल तर स्वप्न ही पडायलाच पाहिजे त्या कामाची. जेव्हा एखादा उत्कृष्ट कलाकार, अभिनेता, नाटककार, लेखक, जन्माला येतो. तो आधी स्वप्नच पाहतो व ते स्वप्नपुरी करतो. तो सतत प्रयत्नशील असतो. पुढे पुढे जाण्यासाठीच. जो थांबला तो संपला असे म्हणतात. हे करताना आप आपल्या विचारसरणीची माणसे मिळतीलच असे नाही. मात्र आपल्याला मेहनतीने नेटाने तन-मन-धन सर्वस्व स्वाहा करावे लागते. तेव्हा यात अपेक्षित, काल्पनिक, पडलेले स्वप्न स्वतःला एक संशोधक बनवितात. काहीही नवीन करताना धाडस, ध्यास लागतो. प्रसंगी अपयशही पचवावे लागते. कोणतेही स्वप्न पूर्ण साकार होईस्तोवर एक साशंकता आपल्या मनात राहते. पण एकदा का ते साक्षात पुढे उभे राहिले की त्या माणसाचा जगण्याचा जीव का प्राण बनते .तसा माणसाच्या जगण्यातील आत्मविश्वास वाढतो आणि ते ज्याला साध्य होते त्याचे नवजीवन प्रयोगिकता आणि प्रवाहाचे कधी डबके होत नाही. तो फक्त स्वच्छंद वाहता झरा, ह्यात स्वतःला कर्तृत्वाच्या भट्टीत तावून ,सलाखून निघायचे असते .हे सर्व क्षेत्राच्या व्यक्तीला लागू पडते. फक्त निर्धार पक्का असावा व आपल्या स्वप्नांशी जागृत असावे. यात प्रथम तर विद्यार्थी, मग व्यावसायिक ,सामाजिक, इतर सर्व ज्यांच्या त्यांच्या विचारांती जीवन स्वप्नमय असावे आणि पूर्ण करावे. नाहीतर स्वप्नातल्या परीकथे सारखे होते व जाग आल्यावर आपण जमिनीवर आहोत असे समजते.
यावर एक सिरियल होती खूप मजेशीर "मुंगेरीलाल के हसीन सपने ". मग वडील धारी माणसं मुलांना व मित्रांमध्ये इतर सोबतीना म्हणायचे काही करतो का? की नुसते स्वप्न बघतो मुंगेरीलाल सारखे ? काही करण्यासाठी स्वप्न जरूर बघावे ,पण ते पूर्ण करण्यासाठी आपला जगण्यातील आत्मविश्वास वाढवावा. हे ज्याला साधले त्याचे जीवन सारथी लागते.
याच्या वरून आठवले - ध्रुव बाळ व प्रल्हाद यांनी जसे ठरवले की मला देव शोधायचा आहे आणि त्यांनी इतकी भक्ती करून देवाचे साक्षात दर्शन मिळवले. त्यांचे ध्येयाने ,श्रद्धा व निष्ठा ने स्वप्न जशी खरी झाली तशी तुमची आमची सुद्धा होवो. ध्येय ,निष्ठा ठेवल्यास प्रत्येकाचे स्वप्न साकार होतील. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!
🖋 सुलहर
Very nice. Amarnath Jangale
ReplyDelete🙏धन्यवाद 👍🏻
ReplyDeleteखरच खूप छान लेख.
ReplyDeleteKhupach chaan
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete