नूतन वर्ष 🎉👍🏻⏳

'सुलहर ' सहर्ष सादर करित आहे "विचारमंथन" -

तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन 🌹

नूतन वर्षाचे स्वागत करायचे पण त्याआधी जाणाऱ्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा. कारण जुने गेले म्हणून नवीन आले.

2020 हे वर्ष covid-19 करोना चे होते. त्याने गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांना एकसारखी वागणूक दिली. त्याच्या तडाख्यात जो आला त्याला सोडलेच नाही. हे जरी खरे असले तरी Corona ने सगळ्यांना आत्मनिर्भर राहण्यास शिकवले, नात्यातली ओढ निर्माण केली आणि एकमेकांशी प्रेमाने वागावे हे लक्षात आणून दिले. त्या संकटाला सर्वांनी धीराने तोंड दिले. 

असो, नूतन वर्षाचे स्वागत गेल्या वर्षीच्या कडू आठवणी डिलीट करून व गोड आठवणींना उजाळा देऊन करायचे. मागील वर्षी अपूर्ण राहिलेले काही प्लॅन किंवा उपक्रम नव्याने सुरु करून नवीन गोष्टी करायच्या त्या पण जिद्दीने. "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे "! आधी करा, नुसते साखर गोड आहे हे पेपरवर लिहून चालत नाही तर ती खावी लागते व पचवावी पण लागते.

नवीन वर्ष दरवर्षी येते पण प्रत्येक वेगवेगळ्या घटनांनी व प्रसंगांनी बनत जाते. सकाळच्या सुर्योदया प्रमाणे आपला प्रत्येक दिवस नवीन उगवत असतो. पहिले अशी कितीक वर्षे गेली पण हे हॅपी न्यू ईयर कधी मनवल नव्हत. जशी मुलं मोठी व्हायला लागली, पिढी बदलायला लागली, तसं तसं नवीन पिढीमध्ये बदल होत गेला आणि त्या नवीन वर्षाचे रूपांतर श्रीमंता पासून साधारण  मध्यमवर्गीय पर्यंत सगळेजण आपापल्या परीने साजरे करू लागले, आनंद लुटू लागले. आता तर अगदी एक दोन महिन्यांपासून प्रोग्राम ठरतात. घरात, बाहेर, ऑफिसमध्ये, ज्येष्ठ नागरिक संघ मंडळात, मित्र-मैत्रिणींमध्ये, सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असते. पण काही म्हणा आजकालची पिढी खूप भाग्यवान आहे. ते अगदी हट्ट करून, गोड बोलून, सर्व करून घेतात पालकांकडून व अनुभवतात. स्वतःबरोबर सगळ्यांना सोबत घेतात. प्रत्येक ग्रुप वाईज पार्ट्या करतात. त्या दिवशी 31 डिसेंबरला तर हॉटेल, मॉल मध्ये मेळ्या सारखी गर्दी असते. आधीपासून बुकिंग करावी लागते. लहानपासून वरिष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाची मजा लुटण्याची - आनंद साजरा करण्याची पद्धत व समज वेगवेगळी असते. कोणी देव दर्शनाला जातात , तर कोणी पर्यावरणाला भेट देतात. बारा वाजले की प्रत्येकजण एकमेकाला हॅपी न्यू इयर म्हणून संदेश देतात व देवाला दिवा लावून, साखर ठेऊन येणारे वर्ष चांगले जाऊ दे व सर्वांना सुखी आणि आनंदी ठेव अशी प्रार्थना करतात.  31 डिसेंबरला नाशिकला गंगेच्या घाटावरती रात्री बारा वाजता गंगेची आरती खूप छान होते. गंगेची ओटी भरून नदीला नारळ अर्पण करतात, प्रार्थना म्हणतात. खूप छान प्रसन्न वाटते. असे प्रत्येक शहरात आपापल्या रीती - रीवाजा प्रमाणे/धार्मिक कार्यक्रमाने नवीन वर्षाचे स्वागत करतात. शेवटी देवाशिवाय काय आहे? त्याच्या प्रार्थनेने, आशिर्वादाने येणारे वर्ष आपण बघू शकतो. त्याला शतशः नमन. अशा अनेक प्रकाराने नवीन वर्षाचे स्वागत होते. खूप आनंद वाटतो की उद्या नवीन वर्षाचे पदार्पण होणार म्हणून. पण एकदा का नवीन वर्षाची एक तारीख गेली की पुढची तारीख, वार, महिने - चक्राप्रमाणे कोणा करता न थांबता अविरत फिरतात. काळ खूप गतिमान आहे. 31 डिसेंबर येतो तेव्हा असे वाटते बापरे गेलं पण हे वर्ष? म्हणून प्रत्येक गोष्टीचा व प्रत्येक क्षणाचा आनंद अनुभवायला विसरू नये. आयुष्य हे "आइस्क्रीम सारखे असते "लगेच खाल्ले तर बेस्ट नाहीतर ते वेस्ट होते! मग परत तसे बनत नाही! आनंदी रहा,  आनंद अनुभवा! 

पुन्हा एकदा- हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचे आणि समृद्धीचे, भरभराटीचे आणि निरोगी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 

🖋 सुलहर

Comments

  1. Absolutely correct. Happy New year 2021.

    ReplyDelete
  2. Wish you a happy new year. Khup chaan leehile aahe.

    ReplyDelete
  3. Wish you a happy new year. Khup chaan leehile aahe.

    ReplyDelete
  4. Wish you a happy new year. Khup chaan leehile aahe.

    ReplyDelete
  5. आपण वेळ काढून वाचल्याबद्दल धन्यवाद 👍आपल्या प्रोत्साहन अभिप्रायामुळे पुढे जाण्यास उत्साह येतो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"