"मुंबई आणि जगण्याची जीवन शैली"
'सुलहर ' सहर्ष सादर करित आहे "विचारमंथन" -
🌹"मुंबई आणि जगण्याची शैली"🌹
हि मुंबई आहे इथे असेच असते.
सकाळी उठणे हे सुद्धा एक कामच आहे,
रात्रीची झोप हा फक्त काल्पनिक आराम आहे.
दात घासणे आंघोळ करणे यासाठी पुरेसा वेळ नाही, नाश्ता करत असताना तयारी करणे यापेक्षा मजेशीर खेळ नाही.
देवासमोर एक मिनीट हिच सर्वांची देवपुजा असते.
हि मुंबई आहे इथे असेच असते.
बिल्डींगचे गेट सोडले कि रांगच रांग लागते,
रिक्षा, बस, ट्रेनचे टिकीट अगदी काहिहि कारण चालते.
रस्त्यावरून चालणारा प्रत्येक माणुस धावत असतो, मिनीटाला शंभर पाऊले असा इथे नियम असतो.
लोकल ट्रेन सतत सर्वांसाठी धावत असते न थकता न रुकता,
लोकल म्हणजे प्रत्येक व्यक्तीची लाईफ लाईन असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.
शिव्या देत शिव्या खात प्लॅटफॉर्मवर पोहोचायचे असते, मुंग्यांमधली साखर शोधावी तसे मित्रांना शोधायचे असते.
ट्रेनमधील मित्र मैत्रीला जागणारे असतात.
एकामुळे दुसऱ्याला जागा मिळेल असे जागा अडवून बसतात.
रिझर्वेशन नसुनही प्रत्येकाची जागा फिक्स असते,
ही मुंबई आहे इथे असेच असते.
आत्तापर्यंत मुंबई सर्व भीषण कठीण अपघातातून बाहेर निघाली आहे,
न घाबरता न डगमगता त्यातून सहीसलामत कसे बाहेर पडावे हे शिकवते.
तिच्यावर कितीही कठीण संकटे आली तरी ती लढण्यास सदैव सज्ज असते.
ही मुंबई आहे इथे असेच असते.
घरी पोहोचण्याचा विचारच फार आनंददायी असतो,
पण पुन्हा ट्रेन, बस हा विचारच मनाला टोचत असतो.
आईच्या/बायकोच्या हातचा चहा हेच घरी पोहोचल्याचे समाधान,
तिची सिरीयल माझी मॅच यासाठी रिमोटची ताणाताण.
ब्रेक वगळून एकाच वेळी तीन सिरीयल बघायचे असते.
ही मुंबई आहे इथे असेच असते.
जेवणानंतर लगेच झोप एक वाईट सवय आहे,
म्हणूनच बाहेर फेरफटका आता आमची गरज आहे.
एका तासात चाळीतल्या नव्या जुन्यांची खबर घेत आपणही याचा एक भाग आहोत याची गोड जाणीव होत असते.
ही मुंबई आहे इथे असेच असते.
झोपण्यासाठी नव्हे तर सकाळी उठण्यासाठी घरी परततो,
असाच हा नित्यक्रम सोमवार ते शुक्रवार असतो.
पण बाकिचे दोन दिवस मात्र दिनक्रम बदलतो.
खूप दिवसात मित्र भेटले नाहीत असे मित्र भेटतात, मग थिएटर, पब, बिचेस, टेरेस सगळी ठिकाणे गाजवतात.
आईला एक दिवस आराम हे बाहेर जेवणाचे कारण असते,
असा हा आठवडा त्याचेच महिने घडावे असे वाटत असते.
हि मुंबई आहे इथे असेच असते.
सगळे आहे इथे फक्त वेळेची कमतरता असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.
तर अशी ही मुंबई !!! दिवसाचे 24 तासही इथे कमी पडावेत अशी हि श्रमाची बँक आहे. जिथे तक्रार काउंटर नाही. मैत्रीचे व्याज मिळत राहते पण जास्त नोटा मात्र नाहीत. शोधणाऱ्यासाठी आणि कष्ट करण्यासाठी मुंबई आपले दोन्ही हात पसरवून उभी आहे. फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे. मुंबईत सगळ्या जातीचे आणि सर्व धर्म - पंथाचे लोक सामाविष्ट आहेत पण कोणीच कोणा मध्ये नाक खुपसत नाही. प्रत्येक जण आपला राजा बनून राहतो.
ही मुंबई सगळ्यांना सामावून घेते. समुद्राप्रमाणे तिचे मन मोठे आहे आणि समुद्रा सारखीच जनताही आहे. समुद्र त्याच्या पोटात गाळ - घाण ठेवत नाही. सगळा कचरा किनाऱ्याला लावतो. तसेच काही चांगल्या माणसांचे चांगले होते आणि वाईटाचे वाईट होते. मुंबई परदेशातल्या शहरापेक्षा काही कमी नाही. इथे ऐतिहासिक पासून आधुनिक पर्यंत सर्व बघायला मिळते. प्रदेशापासून गावापर्यंत सगळे लोक मुंबई बघण्यासाठी उत्सुक असतात. इथे एक रुपया पासून ते हजार रुपयांपर्यंतची वस्तू मिळते. मुंबईचे कितीही वर्णन केले तरी कमीच पडते. शब्दात न सांगता येणारे. सर्व क्षेत्रात पुढे आणि सर्वगुणसंपन्न अशी आदर्श मुंबई !!!
🖋 सुलहर
Very nice.Amarnath Jangale
ReplyDelete🙏 खूप खूप धन्यवाद आपण आवडीने वाचल्याबद्दल 👍🏼
ReplyDeleteWah wah Mumbai meri jaan. Chaan varnan kele aahe.
ReplyDeleteWah wah Mumbai meri jaan. Chaan varnan kele aahe.
ReplyDeleteWah wah Mumbai meri jaan. Chaan varnan kele aahe.
ReplyDeleteखूप छान वर्णन केले तुम्ही मुंबई चे.....अगदी तशीच जशी आहे....आमची मुंबई आपली मुंबई.... शितल दिघावकर
ReplyDelete