'सुलहर' सहर्ष सादर करीत आहे "विचार मंथन" *लग्न - एक परिवर्तन* " शुभमंगल सावधान! " असे शब्द कानावर पडले की सर्व उपस्थित मंडळींना हायसे वाटते व "आटोपले एकदाचे लग्न" असे उद्गार निघतात. लग्न म्हणजे नक्की काय? असा प्रश्न लहानपणी जेव्हा मनात यायचा, तेव्हा लग्न म्हणजे नवीन साड्या, दागिने आणि नटायला मिळणार बस एवढेच वाटायचे. पण लग्न या शब्दात किती अर्थ लपलेला आहे हे लग्न झाल्यावर मुलींना कळते. हा एक सामाजिक व पारंपारिक शुभसोहळा व बंधन आहे व गोड स्वप्न देखील आहे. लग्न झाल्यावर, "सुखी आहे ना?" असे प्रत्येक विवाहीतेला विचारतात. कदाचित परिपूर्ण सुखी अाहे असे उत्तर ठराविक मुलींचे असते. आता सुख म्हणजे नक्की काय? पैसा खूप असणे, बंगला, गाडी असणे हेच सुख आहे की याव्यतिरिक्त अजून काही आहे? लग्न म्हणजे नशिबाची लॉटरी किंवा पत्त्यांचा डाव! तर ते कसे? लॉटरी म्हणजे एकदम अनपेक्षित, कल्पनेपेक्षा वेगळे मिळणे, नाही तर पत्त्यांच्या डावा प्रमाणे - त्यात कधी हुकमाचा एक्का असतो तर कधी साधेच पत्ते असतात. जसे असतील तसे खेळायचे असतात व जिंकायचा प्रयत्न करायचा असतो. कधी जीत तर कधी हार होते. पण शेवटपर्यंत खेळावा लागतो. जसे नव्याची नवलाई नऊ दिवस, त्याचप्रमाणे लग्न झाल्यावर काही दिवस सर्व सुरळीत चालते, पण काही कारणावरून वाद मतभेद झाले कि मग दोघांना प्रश्न पडतो -"आपण लग्न का केले?" उत्तर काही मिळत नाही. काही कुटुंबांमध्ये मुलांवरून वाद होतात तर काही वेळा घरातील नातेवाईकांवरून जसे सासू, नणंद, जाऊ, इ. पण असं काही झालं तरी संसार करावाच लागतो. प्रत्येक नात्याचा हसरा मुखवटा चढवून वावरावे लागते. कधीकधी असे वाटते मुले आहेत म्हणूनच पती-पत्‍नी एकमेकांना धरून आहेत. कारण प्रत्येक वेळेस असा विचार येतो की मुलांचे काय? त्यांचा काय दोष? शेवटी कुटुंब रेल्वे लाईन प्रमाणे असते. आयुष्यात शेवटपर्यंत सोबत असतात. रेल्वे रूळ जोडण्याच काम त्यांच्यामध्ये असलेल्या एक जाडजूड लाकडी कडपाचे (स्लीपर) असते, त्याच प्रमाणे मुलं संसारात उभयतांना प्रेमा पोटी जोडून ठेवतात.एकमेकांत पटत नसते याचे खरे कारण आवड-निवड, विचारांचे मतभेद असतात. ते नदीचे दोन किनारे एकमेकांना समांतर असून कुठेच मिळत नाही. ज्या वेळेस लग्न होते त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती स्वप्न बघतो. आपण, आपले घर, मुलं, हे स्वप्न असते. अर्थात बहुतांचे तसे नसते. कधीकधी लग्न ही जीवनातील तडजोड ठरते. कारण मुलींना चांगले जीवन जगण्यासाठी एक जोडीदार हवा असतो. पण तो सर्वांनाच मनासारखा मिळतो असे नाही, म्हणून सामाजिक बंधनात राहून एकमेकांना समजून घेण्याची एक सुसंगती आहे. थोडक्यात लग्न म्हणजे काय ? दोन जीवांनी थाटाने, समजुतदारपणाने व गोडीने करायचा संसार! पण हे प्रत्येकाच्या नशिबात असतेच असेही नाही. प्रत्येक मुलीला लग्नानंतर आईचा संदेश असतो की दिल्या घरी तू सुखी रहा व दोन्ही घराण्याचे नाव उज्वल कर, सर्वांशी प्रेमाने वाग तेच तुझे घर ,आणि ह्याच उपदेशाच्या शब्दावर मुलगी सासरी निघून जाते. तिच्या माहेरचे नाव उज्वल करते. यालाच समाजात संस्कार मानतात. सं ...संस्कार सा... सातत्याने र .... रहाणे, रमणे च.- 🖋️ सुलहर

Comments

  1. Khup sunder vichar. Agdi satya aahe sagle. Kharach lagna mhanje pattyancha dav aahe. Chaan lihile.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद
      आपण लेख वाचून मला प्रोत्साहित करतात
      त्याबद्दल आभारी आहे 👍

      Delete
  2. खूपच सुंदर लिहिले आहे ...हे जर प्रत्येक मुलीने आत्मसात केले आणि यावर विचार करून जर वागल्या आणि तशी त्या घरात ल्या लोकांनीही तसच वागवलं तर नक्की च सगळ्यांचे संसार सुंदर होण्यास कोणीही रोखू शकणार नाही

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद खूप छान अभिप्राय दिला असेच तुम्ही आमचे लेख वाचत राहिले म्हणजे आम्ही प्रोत्साहित होत राहू

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"