वानोळा

सहर्ष स्वागत करत आहे" विचार मंथन"
                        
                           
                        वानोळा
       आपल्याकडून दुसऱ्याला आपुलकीने दिलेली भेट ,म्हणजे वानोळा आम्ही लहान होतो तेव्हाची पद्धत होती ती. तर वानोळा ,म्हणजे ती एक माया च असायची हृदयातून पोटापर्यंत जाणारी, एकमेकांकडे , खाद्य पदार्थ ,देण्याचा एक संस्काराचा आणि वाटून खाण्याचा आनंद, खूप मज्जा यायची कारण गरीब-श्रीमंत असे काही नव्हते .हे एक जवळीक सधन्याचा व प्रेम टिकवून ठेवण्याचे माध्यम होते. आमच्या शेजारी दादा वहिनी ,मावशी काका, भाऊ दादा, असे प्रेमाचे नातेवाईक राहात असत . सांगायचे म्हणजे त्यांच्याकडे  शेती,फळबाग होती. तर त्यांच्याकडून गल्लीत सर्वांना फळ चिकू ,सीताफळ ,पेरू ,  केळी चा तर अख्खा घडच मिळायचा त्यात  पाच,दहा डझन तरी केळ असायचे ते पिकवायचे, केळांचे वेफर बनवायचे. तर कधी कच्च्या केळ्यांची भाजी ,तर कधी चकत्या करून वाळवून, त्याचे उपासासाठी पीठ तयार कराची आई , ज्यांच्याकडे शेती होती ते अगदी पहिला हंगाम आला की भुईमुगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा , हुरडा, भाजी म्हणजे मेथी, पालक भेंडी ,कांद्याची पात ,कारले ,असेच खुप काही. अगदी न चुकता  द्यायचे. आणि प्रेमाने हा घ्या वानोळा आमच्या शेतात ला म्हणून .  हे सगळं विकत घेत होतो सगळ्यांकडे, पण त्यांच्याकडून आले म्हणजे काय आनंद जसे काही आपल्या शेतातले च आहे. एवढ्यावर थांबायचे नाही तर अजून दुसऱ्या मावशींकडे गाई म्हशी होत्या त्या मावशी तर दर आठवड्याला ताक बनवले की आणून द्यायच्या. आणि गाय किंवा म्हैस व्याली, की तिचे पहिल्या आणि दुसर्‍या दिवशीचे दूध खरवस करायला देत होत्या. आई त्या दुधाच्या वड्या वाफवून बनवायची  सुंठ ,गूळ वेलची,टाकून खूप सुंदर लागायच्या त्या .अजून तोंडावर चव आहे .आणि हे  एकदाच देऊन भागायचे असे नाही, तर वर्षं न वर्ष एक पिढीपर्यंत चालत होते .उन्हाळा आला की घरचे आमराईतले आंबे ,कैऱ्या , अगदी गोड असायचा त्यांच्या झाडाचा आंबा, नंतर लगेच सगळ्यांकडे त्याच्या वानवळा पोहोचायचा. मग लोणच्याची तयारी , सगळी कडे, लोणचे झाले की प्रत्येकाकडे वाटी भरून द्यायचे . मग नातेवाईकांकडे , मैत्रिणीकडे, असा आमच्या आईचा नियम होता .आईच्या हातचे लोणचे खूपच चवदार आणि आणि टेस्टी असायचे अगदी वर्षभर टिकायचे. नंतर त्यावेळेस कोणाकड चे लोणचे संपले असले आणि खाण्याची इच्छा झाली, तर तुमच्याकडे लोणचे आहे का काकू, थोडे द्या आम्हाला, निसंकोच मागायचे आणि सोबत साखर आंबा,गुळांबा मेथांबा हे प्रकार पण बरेच असायचे, पुढे पापड ,कुरडया ,शेवया, उपवासाचे प्रकार साबुदाणा, भगर, बटाटे घालून पापड कुरडया. अगदी घरात उन्हाळाभर कारखानच चालायचा जसा. आमचे वडील म्हणायचे तुमचा कारखाना चालू द्या मला वेळेवर जेवण द्या . मग त्यात पाहुणे आले तरी जेवणाची वेळ कधी चुकवायचे नाही .पण हे सर्व सर्वांना घरोघरी वानोळा दिल्याशिवाय मन भरत नसे याला  अंत नाही .
तसेच दिवाळीच्या फराळाचे सुद्धा , प्रत्येकाकडे सारखे पदार्थ असायचे फार तर कुठे कमी कुठे जास्त एखादं  पण फराळ झाला की पहिले ताट शेजारी द्यायचे .मग नातेवाईकांकडे डबे भरायचे.
 हे सर्व आई सतत स्वयंपाक घरात राहून आनंदाने न थकता भरपूर करायची. आणि न चुकता द्यायचे, तसेच एक सांगायचे म्हणजे , माहेरी आलेल्या मुलींना सुद्धा हा वानोळा द्यायचा ,किती प्रेम होते दुसऱ्यांच्या मुली म्हणून बघितलेच नाही कधी. शेजारच्या मुली म्हणजे आपल्याच. कुठे गेला हा वानवळा ?नव्या पिढीला तर हा शब्द पण माहीत नसेल कदाचित. हळूहळू हरवत चालले आहे  हे सगळे .आता त्याचे गिफ्ट म्हणून रूपांतर झाले आहे. पण त्यात (तुपाचा) ओशटपणा नाही, फक्त एक व्यवहार ,याने दिलेले आपल्याला तर आपल्याला पण त्याला द्यावे लागेल बस एवढेच. कॅडबरी सारखे ,आईस्क्रीम चे प्रस्थ वाढले आहे, ते तर तोंडात टाकले की लगेच विरघळतात. तसेच माणसाच्या आपसातल्या प्रेमाचे पण होत आहे. लवकर विरघळणारे फार काळ न टिकणारे तसे अजून देणे-घेणे भरपूर असते. कधी रेडीमेड आणून सुंदर डेकोरेट करून देतात. पण काही अंतर ठेवूनअसते की काय असं  वाटाते. आजकाल माहेरुन जाताना आई म्हणते ,हे घेऊन जा ते घेऊन जा वानोळा म्हणून ,पण मुली म्हणतात आता असे काही राहिले नाही ,आमच्याकडे अशी पद्धत नाही वगैरे बोलतात. मग वाटते की
वानोळा वनातच हरवल्यासारखा वाटतो. पूर्वीच्या त्या मावशी, वहिनी ,ताई, दादा,भाऊ ,हे सगळे नात्याची नसून सख्खे शेजारचे  प्रेमाचेनाते होते . कधीही न तुटणा9रे न संपणारे .
                                                                
                                                           सुलहर

Comments

  1. Kajal Chouhan
    Superb 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. ब्लॉग वाचताना लहानपणीच्या आठवणींमध्ये हरवले ��..सुंदर लिहिले आहे ��

    पुढील लिखाणासाठी शुभेच्छा ��
    .....

    ReplyDelete
  3. ब्लॉग वाचताना लहानपणीच्या आठवणींमध्ये हरवले ��..सुंदर लिहिले आहे ��

    पुढील लिखाणासाठी शुभेच्छा ��
    .....

    ReplyDelete
  4. ब्लॉग वाचताना लहानपणीच्या आठवणींमध्ये हरवले ��..सुंदर लिहिले आहे ��

    पुढील लिखाणासाठी शुभेच्छा ��
    .....

    ReplyDelete
  5. ब्लॉग वाचताना लहानपणीच्या आठवणींमध्ये हरवले 😇..सुंदर लिहिले आहे 😊

    पुढील लिखाणासाठी शुभेच्छा 👍
    .....

    ReplyDelete
  6. खूप छान, लहानपणी गावी गेलो की, शेजारच्या काकु काहीतरी वानोळा घेऊन यायच्या आणि म्हणायच्या शहरात कुठे मिळतं
    ग पोरीनो, खूप माया असायची त्यात👍 लहानपणीची आठवण झाली.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद,
      आवडीने वाचले आणि आठवणीने अभिप्राय दिला त्याबद्दल👍

      Delete
  7. जे.के .चौधरी
    वानोळा आता नविन पिढिला माहितच नाही आपण आपल्या लहानपणिच्या खठवणित तसेच जीवनात अनुभवलेल्या आठवणित रमण्यासाठि चाळत रहातो एवढेच लग्नाबाबतच्या वास्यव टिपण्याचा प्रयत्न छानच आहे

    ReplyDelete
  8. अप्रतिम लेख👌🏻👌🏻👍🏻🥰

    ReplyDelete
  9. ]Urmila Joshi:
    छान माहिती दिली आ
    वाचले खुप छान आहे. खरच वानोळा हा शब्दच इतिहासात जमा झाला आहे. लहानपणी आपण जी मजा केली ती आता नाही. कारण पण आहेत त्याला जागेचा अभाव. बंद संस्कृती मुळे संभाषण कमी मोजकेच बोलणे. हे वाचल्यावर बालपण आठवले.नविन पदार्थ चाखायला मिळायचे.पण खरच अप्रतिम लेख आहे. आईच्या हातचे पदार्थ खुप छान असायचे.👌👌👍

    ReplyDelete
  10. खूप खूप छान व मस्तच हाेता वानाेऴा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"